आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० जुलै
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं आयर्लंडचा एक - शून्य
असा पराभव केला.
भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेन हिनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला
आहे. आज झालेल्या सामन्यात तिने चीनी तैपेईच्या चेन निन चेन हिचा चार - एक असा पराभव
केला.
तिरंदाजीत दिपीका कुमारीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारतची दूती चंद सातव्या स्थानावर
राहीली.
भारताच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टिपलचेस मध्ये नवा राष्ट्रीय
विक्रम नोंदवत सातवं स्थान मिळवलं आहे. मात्र अविनाश ला अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात
अपयश आलं.
नेमबाजीत महिलांच्या २५ मीटर एअर पिस्टल प्रकारात मनु भाकेर १५व्या स्थानावर
राहीली.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा इयत्ता बारावीचा निकाल आज
जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल,
असं कळवण्यात आलं आहे.
****
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्त भागाची पाहणी
करणार आहेत. त्यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं असून, नरसिंह वाडी इथं ते पाहणी
करुन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
****
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदाच्या
शैक्षणिक वर्षापासून, अखिल भारतीय कोट्यात इतर मागासवर्गीयांना २७ टक्के, आणि आर्थिकदृष्ट्या
दुर्बल घटकांना, १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं घेतला आहे.
****
अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक संकटामुळे महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीच्या
यंत्रणेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी, ऊर्जा विभागात आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापन
करण्यात येणार असल्याची माहिती, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. रत्नागिरी
जिल्ह्यात चिपळूण इथं ते काल बोलत होते.
****
विमुक्त जाती आणि भटक्या जमाती वर्गातल्या लोकांना विकासाच्या प्रवाहात
आणण्यासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यात याव्या, अशा सूचना, केंद्रीय विमुक्त
जाती आणि भटक्या जमाती विकास आयोगाचे अध्यक्ष, भिकू रामजी इदाते यांनी दिल्या. ते काल
नांदेड इथं बोलत होते.
****
No comments:
Post a Comment