आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
हवामान बदलविषयक
कॉप-ट्वेंटीसिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्लासगोला पोहोचले आहेत. या दौऱ्यात
पंतप्रधान ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची भेट घेणार आहेत. ही परिषद १२ नोव्हेंबरपर्यंत
आयोजित करण्यात आली आहे. २०१५ च्या पॅरिस करारानंतर सदस्य राष्ट्रांनी जागतिक तापमान
वाढ कमी करण्यासाठी केलेल्या उपायांवर या परिषदेत चर्चा होईल.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी परवा तीन नोव्हेंबरला कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत
आढावा बैठक घेणार आहेत. महाराष्ट्र, झारखंडसह काही राज्यांच्या जिल्ह्यांमध्ये लसीकरण
अपेक्षित प्रमाणात झालेलं नसल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यात औरंगाबाद, हिंगोली नांदेडसह नंदुरबार, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचं
प्रमाण कमी आहे.
****
देशात सध्या
सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १०६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला
आहे. आतापर्यंत १०६ कोटी ३१ लाख २४ हजार २०५ नागरीकांना लस देण्यात आली. यापैकी ७३
कोटी ३६ लाखांहून अधिक पहिल्या मात्रा, तर ३२ कोटी ९५ लाखांपेक्षा अधिक दुसऱ्या मात्रा
देण्यात आल्या आहेत.
****
दिपावलीच्या
सणाला आजपासून वसुबारसेनं प्रारंभ झाला. आजच्या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. दिवाळीच्या
पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, ठीकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी
गर्दी दिसून येत आहे.
****
आरोग्य विभागाची
गट- तीन ची परीक्षा बीड जिल्ह्यात सुरळीत पार पडली. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं वेणुताई
चव्हाण हायस्कुल मधल्या केंद्रावर दोन परीक्षार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचं निदर्शनास
आलं, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून, दोन्ही परीक्षार्थींना अटक करण्यात
आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्याच्या
औंढा नागनाथ तालुक्यात काल जीप उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर १६ प्रवासी जखमी
झाले. लोहरा इथं कापूस वेचणी करून काही शेतमजूर परत येत असताना पिंपळदरी जवळ संध्याकाळी
साडे सहाच्या वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
****
No comments:
Post a Comment