Monday, 31 January 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.01.2022 रोजीचा लढा भारतीय स्वातंत्र्याचा

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 31.01.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 January 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जानेवारी २०२ सायंकाळी ६.१०

****

देशाच्या अनेक भागात कोविडचा वेगानं प्रसार होत आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वर्षातल्या सर्व मुलांसह इतरांना कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. कोरोना विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप चिंताजनक आहे. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड संबंधी अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक ०११ - २३ ९७ ८० ४६ आणि १ ० ७ ५ वर संपर्क करा.

****

·      देशाचा आर्थिक विकास दर साडे आठ टक्के राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त.

·      राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ; उद्या अर्थसंकल्प.

·      दहावी तसंच बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णया विरुध्द विद्यार्थ्यांचं राज्यभरात आंदोलन.

आणि

·      पंतप्रधान आवास योजनेत शासकीय पैशांचा गैरवापर तसंच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा केल्याचा खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप.

****

चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर साडे आठ टक्के राहण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पहिल्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा तसंच राज्यसभेसमोर आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्यात देशाचा आर्थिक विकास दर आठ ते साडे आठ टक्के राहणार असल्याचं म्हटलं आहे. हा अहवाल लोकसभा सदस्यांनी संसदेच्या डिजिटल ॲपवर पाहण्याचं आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं आहे.

 

त्यापूर्वी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ झाला. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झाल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं.

कोविड-19 लसीकरण कार्यक्रमाने साथ रोगाविरुद्धच्या लढ्यात भारताची क्षमता सिद्ध केल्याचं सांगत, संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात भारतीय लस महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं, राष्ट्रपती म्हणाले.

या लढ्यात आरोग्यसेवा आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं राष्ट्रपतींनी कौतुक केलं.

दरम्यान, उद्या एक फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही संसदेच्या अधिवेशनाचं कामकाज दोन सत्रांमध्ये होणार आहे. आगामी २ ते ११ फेब्रुवारी या पूर्वार्धात दोन्ही सभागृहांचं प्रत्येकी ५ तास कामकाज होईल. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी २ तर लोकसभेचे कामकाज दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे.

 

अधिवेशनापूर्वी संसद परिसरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचं असून, लोकांसाठी जास्तीत जास्त फलद्रुप करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं.

****

देशात कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १६६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या लसीच्या १६६ कोटी तीन लाख ९६ हजार २२७ मात्रा देण्यात आल्या आहेत. तर एक कोटी १८ लाख ५८ हजार १९० पात्र नागरिकांनी आतापर्यंत कोविड लसीचा बूस्टर डोस घेतला आहे.

****

राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर १५ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. ते आज कराड इथं पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर राज्यात कोविडचा आढावा आणि कुलगुरूंशी चर्चा करून पुढील परीक्षांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लस घेतलेल्या नाहीत. त्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी सांगितलं.

****

राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या निर्णया विरुध्द आज औरंगाबाद, उस्मानाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, अकोला इथं विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. कोविड काळात ऑनलाइन शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीण तसंच मागास भागातल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेता आलेलं नसल्यानं, दहावी तसंच बारावीच्या परीक्षा यंदा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुढील वर्षी ऑफलाईन शाळा सुरू केल्यानंतरच परीक्षा घ्यावात, असं या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

****

शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी १५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची मुदत आज संपणार होती, मात्र कोविड काळात कोणताही विद्यार्थी सदर अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार कोविड संसर्गातून मुक्त झाले आहेत. पवार यांनी आज ट्वीट करून ही माहिती दिली. आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांचे पवार यांनी आभार मानले आहेत.

****

पंतप्रधान आवास योजनेत शासकीय पैशांचा गैरवापर तसंच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. मार्च २०२२ ला मुदत संपत असलेल्या या योजनेसाठी औरंगाबाद शहरातल्या ८० हजार ५१८ गोरगरीब नागरिकांनी २०१६ मध्ये प्रस्ताव सादर केले होते, गेल्या सात वर्षामध्ये जिल्हा प्रशासनाने फक्त ३५५ लाभार्थी म्हणजे एक टक्क्यापेक्षा कमी अर्जदारांना या योजनेचा लाभ दिला, ही बाब शहरासाठी लाजीरवाणी असल्याचं खासदार जलील म्हणाले. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून, प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची चेष्टा होत आहे. याचा लोकसभेत थेट पंतप्रधानांना जाब विचारणार असल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं आहे.

 

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात एकाही किराणा दुकानात, सुपर शॉपी किंवा मॉल्समध्ये वाईनची विक्री करु देणार नसल्याचा इशारा खासदार जलील यांनी राज्य सरकारला दिला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी घेत असल्याचा राज्य सरकारचा दावा असेल, तर सरकारने गांजाच्या शेतीलाही परवानगी द्यावी, अशी उपहासात्मक मागणी खासदार जलील यांनी यावेळी केली.

****

वीज महावितरणच्या कृषीपंप वीज देयकात ५० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता फक्त दोन महिने उरले आहेत. येत्या ३१ मार्चला या सवलत योजनेची मुदत संपणार असून, एप्रिलपासून थकीत देयकात फक्त ३० टक्के माफी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या कृषिपंपाची थकबाकी तसंच चालू देयकं भरून ५० टक्के माफी मिळवावी, असं आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात आलं आहे.

****

लातूर तालूक्यातील भिसे वाघोली शिवारात काल शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत जवळपास ७० एकरावरचा उभा ऊस खाक झाला. जवळपास २० शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

दरम्यान, बाधित शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळावी यासंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

****

नंदुरबार जिल्ह्यातल्या २६ पपई उत्पादक शेतकऱ्यांची उत्तर प्रदेश इथल्या व्यापाऱ्यानं ४६ लाख रुपयांची फसवणुक केली आहे. शेतकऱ्यांकडून पपई खरेदी केल्यानंतर आठ दिवसात पैसे देण्याच सांगत हा व्यापारी पसार झाला आहे. सरफराज चौधरी असं या व्यापाराचं नाव असून त्याच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

****

सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं अडीच कोटीचं रक्त चंदन पोलिसांनी जप्त केलं आहे. एक टन रक्त चंदन बंगळूरुहून कोल्हापूरला नेलं जात असताना, पोलीसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, यामुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे

****

मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. नंदकुमार पांचाळ स्मृती पत्रकारिता पुरस्कार आष्टी इथले पत्रकार सचिन पवार यांना तर मौलाना मुश्ताक हुसेन स्मृती पुरस्कार परळी वैद्यनाथ इथले पत्रकार प्रवीण फुटके यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्न आणि एक हजार रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

परभणी जिल्ह्यात जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि टेक्नोस्पर्ट ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवशीय प्रशिक्षण शिबीर घेण्यात आलं, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थ्यांना पाण्याची गुणवत्ता, जलस्त्रोतांची देखरेख तसंच सर्वेक्षण, लोकसहभाग समीक्षण, आदी प्रशिक्षण देण्यात आलं.

****

राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची शक्यता आहे. वातावरणातल्या या बदलामुळे शेतीचं नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 31.01.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 ‘आजादी का अमृत महोत्सव’ गाथा स्वातंत्र्यसेनानींची.

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2022 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2022

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ जानेवारी २०२ दुपारी १.०० वा.

****

सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था बनली असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने झाली, त्यावेळी ते बोलत होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात भारताने ४८ अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित केली असून, जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या विकासाची खात्री असल्याचं ते म्हणाले. कोविड-19 महामारीच्या काळात भारतानं केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना राष्ट्रपतींनी, लसीकरण कार्यक्रमाने साथीच्या रोगाविरुद्धच्या लढ्यात भारताची क्षमता सिद्ध केली असल्याचं नमूद केलं. संपूर्ण जगाला महामारीपासून मुक्त करण्यात आणि कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्यात भारतीय बनावटीच्या लसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगून, राष्ट्रपतींनी, कोविड-19 महामारीविरुद्धच्या लढ्यात आरोग्य आणि आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं यावेळी कौतुक केलं. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, जन औषधी केंद्र, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, जनधन, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन यासारख्या सरकारच्या अनेक योजनांचा राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केला.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज २०२१-२२ या वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करणार आहेत. तर उद्या एक फेब्रुवारी रोजी त्या २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

अधिवेशनापूर्वी संसद परिसरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, संसदेचं हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्वाचं असून, लोकांसाठी जास्तीत जास्त फलद्रुप करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सर्व कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास सर्व पक्षाच्या सदस्यांचं सहकार्य मिळावं, यासाठी सरकारनं देखील आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

****

देशात कोविड प्रतिबंधातत्मक लसीकरण मोहिमेनं १६६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २८ लाख ९० हजार ९८६ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १६६ कोटी तीन लाख ९६ हजार २२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत एक कोटी १८ लाख ५८ हजार १९० पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

****

देशात रेडी टू ईट अर्थात खाण्यास तयार वस्तूंच्या निर्यातीत २४ टक्के इतकी वाढ झाली आहे. मागील वित्त वर्षाच्या तुलनेत ही वाढ ३९ कोटी ४० लाख डॉलर एवढी आहे. अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, कॅनडा आणि श्रीलंका या देशांना प्रामुख्यानं अशा वस्तूंची निर्यात करण्यात आली आहे. अशा वस्तूंच्या निर्यातीत मागील दहा वर्षात लक्षणीय वृद्धी झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे.

****

राज्यातल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं परवानगी दिली आहे. या परवानगीच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं देखील प्रवेश क्षमतेत वाढ केली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबईच्या कुलाबा इथल्या आय एन एच एस अश्विनी इन्स्टिट्यूट ऑफ नेवल मेडिसिन या संस्थेमध्ये मरीन मेडिसीन पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दोन जागा, ठाणे इथल्या राजीव गांधी आणि शिवाजी महाराज रुग्णालयातल्या एमबीबीएस या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ८० वरुन १००, तसंच अमरावतीच्या पंजाबराव देशमुख रुग्णालयात पदवी अभ्यासक्रमासाठी दोन जागा वाढवायला राज्य सरकारनं मान्यता दिली असल्याचं देशमुख यांनी सांगितलं.

****

राज्यात सध्या नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधे कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. याठिकाणी चाचणीला दिलेल्या नमुन्यांपैकी सुमारे ४५ टक्के नमुने कोरोनाबाधित आढळत आहेत. पुण्यात हे प्रमाण ४० टक्के, तर नाशिक आणि वाशिममध्ये ३८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. औरंगाबाद, वर्धा, अकोला, चंद्रपूर, सांगली, नांदेड, नंदूरबारमध्ये रुग्ण आढळण्याचा दर ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. परभणी, रायगड, बुलडाणा, बीड, ठाणे, रत्नागिरी, पालघर, मुंबई शहर आणि उपनगर या नऊ जिल्ह्यांमधला रुग्ण आढळण्याचा दर देशाच्या सरासरीपेक्षा कमी असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं अडीच कोटीचं रक्त चंदन पोलिसांनी जप्त केलं आहे. एक टन रक्त चंदन बंगळूरुहून कोल्हापूरला नेलं जात असताना, पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, यामुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रातल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं होत आहे. या अधिवेशनात सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तसंच अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सर्व कामकाज सुरळितपणे पार पाडण्यास सर्व पक्षाच्या सदस्यांचं सहकार्य मिळावं, यासाठी सरकारनं देखील आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. २०२१-२२ या वर्षासाठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवालही आजच संसदेत मांडण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

****

राष्ट्रीय महिला आयोगाच्या ३०व्या वर्धापन दिनानिमित्त आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार असलेल्या कार्यक्रमाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. ‘ती - एक परिवर्तक’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव केला जाणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या शिवराई फाट्याजवळ दोन आयशर ट्रक मध्ये झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री हा अपघात झाला.

****

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या ठेपणपाडा इथं पोलिसांनी अफुच्या शेतीवर छापा टाकून सुमारे आठ लाख रुपयांची अफू जप्त केली आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

****

ऊसाच्या बिलातून शेतकऱ्यांची थकीत वीज बिल वसुली होऊ देणार नाही, असं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. राज्य शासनाच्या अशा प्रकारे वीज बिल वसूल करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत, शेतकऱ्यांकडून ही वीज बिल वसुली केली तर भाजपतर्फे आंदोलन केलं जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४७४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ३२२ तर ग्रामीण भागातले १५२ रुग्ण आहेत. तर जिल्ह्यात काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ جنورئ 2022 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 31 January 2022

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:  ۳۱  ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍ جنوری۲۰۲۲ء؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


ملک کے بیشتر مقامات پر کووِڈ متاثرین کی تعداد میں تیزی سے اضافہ ہورہا ہے۔اس لیے ہماری سامعین سے گذارش ہے کہ محتاط رہیں اور 15 تا 18 برس کے نوجوانوں اور دیگر اہل شہریوں کو کووِڈ تدارُکی ٹیکے لینے میں تعاون کریں۔ کورونا وائرس کی نئی قسم اومائیکرون کا پھیلائو تشویشناک ہے۔ اس سے محفوظ رہنے کیلئے تین سہل احکامات پر عمل کریں۔ ماسک لگائیں‘ دو میٹر کا فاصلہ رکھیں‘ ہاتھ اور چہرہ صاف رکھیں۔کووِڈ 19- سے متعلق کسی بھی مدد یا معلومات کیلئے مرکزی ہیلپ لائن نمبر011-23 97 80 46  یا  1075  پر اور ریاستی امدادی مرکز کی ہیلپ لائن نمبر 020- 26 12 73 94  پر رابطہ کیا جاسکتا ہے۔


چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے...


٭ پارلیمنٹ کے مالی بجٹ اجلاس کا آج سے آغاز‘ کَل وزیر مالیات نِر مالا سیتا رمن 2022 - 23 ؁  سال کے لیے مالی بجٹ پار لیمنٹ میں پیش کریں گی

٭   با با ئے قوم مہاتما گاندھی کی74؍ ویں بر سی کے ضمن میں تمام ملک میں خراج عقیدت

٭ ملک کی ثقافت تمام عالم کے لیے انمول وراثت ‘ وزیر اعظم نریندر مودی

٭ ریاست میں او مائیکرون وبا کے 5؍ تاہم کووِڈ وبا کے22؍ ہزار444؍ نئے مریض‘

مراٹھواڑہ میں4؍  افراد  فوت تاہم ایک ہزار885؍ متاثرین

٭ ریاست کو ماسک سے نجات دِلا نے کا کوئی بھی خیال نہیں ‘ وزیر صحت راجیش ٹو پے

٭ دسویں  -   بارہویں کے امتحا نات مقررہ تواریخ میں لینے کی حکو مت کی کوشش‘ 

اسکولی تعلیمی وزیر ورشا گائیکواڑ

اور

٭ اسپین کے رافیل نڈال نے آسٹریلین اوپن ٹینس مقابلے میں فتح حاصل کر تے ہوئے 

ریکارڈ21؍ واں گرینڈ سلم  خطاب حاصل کر لیا


  اب خبریں تفصیل سے....

پارلیمنٹ کا مالی بجٹ اجلاس آج سے شروع ہو رہا ہے ۔ سینٹرل ہال میں دِن میں11؍ بجے صدر جمہوریہ رامناتھ کووِند کے پارلیمنٹ کے دو نوں ایوانوں سے خطاب کے ساتھ اجلاس کا آغاز ہو گا ۔ اِس کے بعد دو نوںایوانوں میں صدر جمہوریہ کے خطبے کی نقل پیش کی جا ئے گی ۔ آج ہی پارلیمنٹ میں 2021 - 22 ؁  کا اقتصا دی جائزہ پیش کیا جا ئے گا ۔ وزیر خزا نہ نِر ملا سیتا رمن یکم فروری کو  لو ک سبھا میں2022-23 ؒ؁ کے لیے مرکزی بجٹ پیش کریں گی ۔ جس کے فوراً بعد راجیہ سبھا میں اِس کی نقل پیش کی جا ئے گی ۔ اِس مرتبہ بجٹ پیش کیے جانے میں کاغذات کا استعمال نہیں کیا جا ئے گا ۔ پارلیمنٹ کے بجٹ اجلاس کے پیش نظر حکو مت نے آج سبھی پارٹیوں کی ایک میٹنگ بلائی ہے تا کہ بٹ اجلاس کو خوش اسلو بی سے چلا ئے جا نے کے لیے سبھی سیا سی پار ٹیوں کا تعا ون حاصل کیا جا سکے ۔

کووِڈ19؍ کی صورتحال کے پیش نظر یہ میٹنگ سہ پہر 3؍ بجے ورچوئل طریقے سے ہو گی ۔ راجیہ سبھا  اور  لوک سبھا میں سیا سی پارٹیوں کے ایوان کے رہنمائوں کو میٹنگ کے لیے مد عو کیا گیا ہے ۔ آج ہی راجیہ سبھا کے چیئر مین ایم وینکیا نائیڈو نے بجٹ اجلاس کے ایجنڈے پر تبادلۂ  خیال کے لیے شام 5؍ بجے پارٹیوں اور  گروپوں کے رہنما ئوں کی ایک میٹنگ ورچوئل بلائی ہے ۔

***** ***** ***** 

ملک میں کَل با با ئے قوم مہاتما گاندھی کو اُن کی74؍ ویں بر سی پر خراج عقیدت پیش کیا گیا ۔  یوم شہدا کے طور پریہ دِن منا یا جا تا ہے ۔ صدر جمہوریہ رامناتھ کووِن نے قومی راجدھانی میں راج گھاٹ پر مہا تما گاندھی کی سما دھی پر گُل دائرہ نذر کیا ۔ وزیر اعظم نریندر مودی نے بھی گلہائے عقیدت نذر کیے ۔ راج گھاٹ پر با با ئے قوم کو خراج عقیدت پیش کرنے والے دیگر سر کر دہ لوگوں میں لوک سبھا کے اسپیکر اوم بِر لا شامل ہیں۔ مہا تما گا ندھی کی74؍ ویں بر سی پر کَل شام نئی دلّی میں  سبھی مذاہت کاایک دعائیہ جلسہ منعقد کیاگیا تھا۔

وزیر اعظم نریندر مودی ‘ لوک سبھا کے اسپیکر اوم بِر لا  اور  دوسری اہم شخصیات نے اِس دعائیہ جلسے میں شر کت کی ۔ جلسے میں موجود اہم شخصیات نے بابا ئے قوم مہاتما گاندھی کو احترام سے خا موش رہ کر خراج عقیدت پیش کیا گیا۔

نائب صدر جمہوریہ ایم وینکیا  نائیڈو ‘  وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے ‘  نائب وزیر اعلیٰ اجیت پوار نے بھی گاندھی جی کو خراج عقیدت پیش کیا ۔

***** ***** ***** 

اورنگ آ باد میں مہا تما گاندھی مِشنMGM یو نیور سٹی میں ’’عدم تشدد کا فلسفہ ‘‘ اِس عنوان پر پر وفیسر جئے دیو ڈو ڑے کا لیکچر ہوا ۔ اِس موقعے پر تمام مذاہب کا دعائیہ جلسہ بھی ہوا ۔ اِسی کے ساتھ مہاتما گاندھی کی تعظیم میں تمام دنیا کے119؍ ممالک نے جا ری کیے گئے ڈاک ٹکٹوں کے مشتر کہ پوسٹر کو اِس موقعے پر شائع کیا گیا ۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


ملک کی ثقافت صرف ہما رے لیے نہیں بلکہ تمام عالم کے لیے انمول وراثت ہے ۔ یہ بات وزیر اعظم نریندر مودی نے کہی ہے ۔ آکاشوانی پر من کی بات اِس پروگرام کے ذریعے سے وہ مخا طب تھے ۔

وزیر اعظم نے کہا کہ بھارت بڑی کامیابی کے ساتھ کووِڈ کی نئی لہر سے مقا بلہ کر رہا ہے۔ نریندر مودی نے کہا کہ یہ بڑے فخر کی بات ہے کہ ملک میں اب تک تقریباً ساڑھے 4؍ کروڑ  بچوں کو  کووِڈ سے بچائو کا ٹیکہ لگا یا جا چکا ہے ۔ انہوں نے کہا کہ محض تین -چار  ہفتوں میں ہی15؍ سے18؍ سال تک کی عمر کے

لگ بھگ60؍ فیصد نو جوانوں کو ٹیکہ لگا دیا گیا ہے ۔ مودی نے زور دے کر کہا کہ اِس سے نہ صرف نوجوانوں کو ڈھال فراہم ہو گی بلکہ اُنہیں اپنی پڑ ھائی جا ری رکھنے میں مدد ملے گی ۔ وزیر اعظم نے اِس بات کو اُجا گر کیا کہ

20؍ دن کے اندر ہی ایک کرورڑ افراد نے احتیا طی ٹیکہ بھی لگوا لیا ہے ۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل او مائیکرون سے متاثرہ 5؍ مریضوں کی شنا خت ہوئی ۔ یہ پا نچوں مریض پونے شہر کے ہیں۔ ریاست میں او مائیکرون سے متاثرہ مریضوں کی جملہ تعداد اب تک3؍ ہزار130؍ ہو گئی ہے ۔اِس میں سے ایک ہزار674؍ مریض اِس بیما ری سے نجات حاصل کر چکے ہیں۔

***** ***** ***** 

ریاست میں کَل کووِڈ وبا سے متاثرہ نئے 22؍ ہزار444؍ مریضوں کی تصدیق ہوئی ۔اِس کی وجہ سے تمام ریاست میں کووِڈ متاثرین کی جملہ تعداد 77؍ لاکھ5؍ ہزار969؍ ہو گئی ہے ۔ کَل50؍ مریض دوران علاج چل بسے ۔ ریاست میں اِس وبا سے مر نے والوں کی جملہ تعداد ایک لاکھ42؍ ہزار572؍ ہو گئی ہے ۔ شرح اموات ایک اعشا ریہ 8؍ فیصد ہو گیا ہے۔ کَل39؍ ہزار15؍ مریض شفا یاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک 73؍ لاکھ31؍ ہزار806؍ مریض کورونا وائرس وبا سے نجات حاصل کر چکے ہیں ۔ کووِڈ نجات کی شرح 

95؍ اعشا ریہ14؍ فیصد ہو گئی ہے ۔ریاست میں فی الحال 2؍ لاکھ27؍ ہزار711؍ مریضوں کا علاج جاری ہیں۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل ایک ہزار885؍ کورونا وائرس متاثرین منظر عام پر آئے ۔ تاہم چار مریض دوران علاج لقمہ ٔ اجل بن گئے ۔ مر نے والوں میں اورنگ آ باد  اور  ناندیڑ اضلاع کے فی کس 2؍ مریض شامل ہیں ۔ اورنگ آ باد ضلعے میں کَل474؍ مریضوں کا اندراج ہوا ۔ اِس میں میونسپل کارپوریشن حدود کے322؍  اور  دیہی علاقوں کے152؍ مریض ہیں ۔ لاتور ضلعے میں350؍ ناندیڑ305؍ عثمان آ باد 194؍کووِڈ سے متاثرہ پائے گئے۔

***** ***** ***** 

ریاست کو ماسک سے آزاد کرنے کا کسی قسم کا خیا ل نہیں ہے ۔ یو رپی ممالک میں ماسک کے سلسلے میں جو فیصلہ لیا ہے ۔ اِس پر اسٹڈی کر نے کے بعد ہی فیصلہ کیا جا ئے گا ۔ یہ بات وزیر صحت راجیش ٹو پے نے کہی ۔ پنڈھر پور میں وِٹھل رُکمنی کا درشن لینے کے بعد وہ صحا فیوں سے مخا طب تھے۔ فی الحال ریاست میں کورونا وائرس متاثرین کی تعداد میں کمی واقع ہوئی ہے ۔ اِس کی اطلاع اُنھوں نے دی ۔ بھارت رتن لتامنگیشکر کی صحت ٹھیک ہو رہی ہے ۔ وہ کورونا سے نجات حاصل کر چکی ہے ۔ یہ بات ٹو پے نے کہی  ۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ کے کئی علاقوں میں آج سے اسکولس شروع ہور ہے ہیں ۔ اورنگ آ باد ضلعے میں کووِڈ اصو لوں کی پا بندی کر تے ہوئے اسکولس شروع کیے جا رہے ہیں۔ ناندیڑ ضلعے میں تمام میڈیمس کے تمام اِداروں کے جماعت پانچویں سے آٹھویں کی کلاسیس آج سے شروع ہو رہی ہیں۔ جماعت پہلی سے چو تھی کی کلا سیس 7؍ فروری سے شروع کرنے کی اجازت دی گئی ہے ۔ اِس کی اطلاع ہمارے نما ئندے نے دی ۔ پر بھنی ضلعے میں جما عت پہلی سے آٹھویںکی کلا سیس آج سے شروع کی جا رہی ہیں ۔ ضلع کلکٹر آنچل گوئل نے اِس کی اجازت دی ہے ۔

***** ***** ***** 

ریاست میں دسویں  اور  بارہویں کے امتحانات مقررہ تواریخ میں لینے کی حکو مت کی کوشش ہے ۔ یہ بات اسکو لی تعلیمی وزیر ور شا گائیکواڑ نے کہی ہے ۔ وہ کَل ممبئی میں مخا طب تھیں ۔ دسویں  اور  بارہویں کے امتحا نات منعقد کرنے کے سلسلے میں غلط خبریں پھیلا ئی جا رہی ہیں۔ طلبا ‘ سر پرست  اور اسکولس اِن افواہوں پر یقین نہ کریں ۔ یہ بات وزیر موصوفہ نے کہی ہے ۔ کووِڈ وبا کے حا لات کا15 ؍ فروری تک جائزہ لے کر امتحانی بورڈ SERT  اور  صدر مدرسین ‘ اسا تذہ تنظیموں سے گفت و شنید کر کے آئندہ فیصلہ کیا جا ئے گا ۔ یہ بات ورشا گائیکواڑ نے کہی ہے ۔

***** ***** ***** 

ٹینِس میں رافیل نڈال نے آسٹریلین اوپن کے مردوں کے سنگلزکے فائنل میں ڈینیل میدویدو کو ہرا کر 21؍ واں گرینڈ سَلَیم خطاب جیت لیا ہے جو ایک ریکارڈ ہے ۔ نڈال نے کَل میلبرن میں Rod Laver Arena    کے مقام پر عالمی نمبر دو میدویدو کو 5؍ سیٹوں میں 6-2  ‘7-6 ‘4-6 ‘5 -  7 '  4-6   ؍  سے ہرا یا ۔ اِس جیت کے ساتھ اسپن کے کھلاڑی 21؍ گرینڈ سَلَیم خطاب جیتنے والے پہلے شخص بن گئے ہیں ۔

***** ***** ***** 


اِسی کے ساتھ علاقائی خبریں ختم ہوئی

٭ ٭ ٭ ٭ ٭



आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 31 ؍ جنورئ 2022 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक जानेवारी २०२२ सकाळी ७.१० मि.

****

देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.

****

·      संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ, उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२२- २३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार

·      राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या स्मृती दिनानिमित्त देशभर आदरांजली 

·      देशाची संस्कृती संपूर्ण विश्वासाठी अनमोल वारसा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

·      राज्यात ओमायक्रॉन संसर्गाचे पाच तर कोविड संसर्गाचे २२ हजार ४४४ नवे रुग्ण, मराठवाड्यात चार जणांचा मृत्यू तर एक हजार ८८५ बाधित

·      राज्य मास्कमुक्त करण्याचा कोणताही विचार नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

·      दहावी - बारावीच्या परिक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न- शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

आणि

·      स्पेनच्या राफेन नदालनं ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकत मिळवलं विक्रमी २१वं ग्रँड स्लॅम

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सकाळी ११ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं, या अधिवेशनाला सुरुवात होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाची प्रत दोन्ही सभागृहांच्या पटलावर ठेवली जाईल. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन, २०२१-२२ या वर्षाचं आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर करतील. उद्या मंगळवारी त्या २०२२- २३ वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. यंदाचा अर्थसंकल्प कागदविरहीत असेल.

कोविड नियमांमुळे दोन्ही सभागृहांच्या कामाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दोन फेब्रुवारीपासून राज्यसभेचं कामकाज सकाळी १० ते दुपारी तीन या वेळेत, तर लोकसभेचं कामकाज, दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ११ फेब्रुवारीपर्यंत चालेल, तर दुसरा टप्पा १४ मार्चला सुरू होईल, तो आठ एप्रिलपर्यंत चालेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्यासाठी सरकारनं आज दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशनाशी संबंधित बाबींवर चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी पाच वाजता, राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७४ व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना काल देशभर आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत राजघाटावर गांधीजींच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांधीजींना पुष्पार्पण करुन आदरांजली वाहिली. नवी दिल्लीत ३० जानेवारी मार्गावर गांधी स्मृती इथं सर्वधर्मिय प्रार्थनासभाही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर मान्यवर या प्रार्थनासभेला उपस्थित होते. हा दिवस हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो. त्यानिमित्त सर्वांनी दोन मिनिटं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहिली.

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गांधीजींना आदरांजली वाहिली.

****

औरंगाबादमध्ये महात्मा गांधी मिशन-एमजीएम विद्यापीठात 'अहिंसेचे तत्वज्ञान', या विषयावर प्राध्यापक जयदेव डोळे यांचं व्याख्यान झालं. यावेळी एमजीएमच्या संगीत विभागाच्या गायकवृंदानं, सर्वधर्म प्रार्थना आणि भजनांच्या माध्यमातून, हुतात्म्यांना सांगीतिक आदरांजली अर्पण केली. त्याचबरोबर महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ, जगभरातल्या ११९ देशांनी जारी केलेल्या टपाल तिकिटांच्या संकलित पोस्टरचं प्रकाशनही, यावेळी करण्यात आलं.

****

देशाची संस्कृती केवळ आपल्यासाठीच नाही, तर संपूर्ण विश्वासाठी अनमोल वारसा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना काल ते बोलत होते. निसर्गाविषयीचं प्रेम आणि प्रत्येक जीवाविषयी करुणा, ही आपली संस्कृती आणि स्वभाव वैशिष्ट्य आहे, भारतीयांच्या मनातल्या निसर्ग आणि जीवसृष्टी विषयीच्या प्रेमाचं संपूर्ण जगात कौतुक होत असतं, असं ते म्हणाले. भारत ही कायमच शिक्षण आणि ज्ञानाची तपोभूमी राहिली आहे. देशातल्या शिक्षण क्षेत्राचं सक्षमीकरण करण्यासाठी, देशभरात माजी विद्यार्थी, सामान्य व्यक्ती तसंच संस्थात्मक अशा विविध पातळ्यांवर होत असलेल्या प्रयत्नांची दखल, त्यांनी मन की बातमध्ये घेतली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, देश आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची पुनर्स्थापना करत असल्याचं पंतप्रधान महणाले.

****

देशातल्या ६० वर्षावरील ७५ टक्के पात्र लाभार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण झालं असून, सबका साथ सबका प्रयास या मंत्रामुळे भारताला हे उद्दिष्ट गाठता आलं, असं ट्विट, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी केलं आहे. जनतेनं कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करावं आणि शक्य तितक्या लवकर लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल देशातल्या नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्वांबद्दल आपल्याला अभिमान वाटतो, असं त्यांनी ट्विटर संदेशामध्ये म्हटलं आहे.

****

राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेले पाच रुग्ण आढळले. हे पाचही रुग्ण पुणे शहरातील आहेत. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता तीन हजार १३० एवढी झाली असून, यापैकी एक हजार ६७४ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २२ हजार ४४४ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७७ लाख पाच हजार ९६९ झाली आहे. काल ५० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४२ हजार ५७२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ३९ हजार १५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७३ लाख ३१ हजार ८०६ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९५ पूर्णांक १४ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या दोन लाख २७ हजार ७११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल एक हजार ८८५ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात काल ४७४ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये महानगरपालिका क्षेत्रातले ३२२ तर ग्रामीण भागातले १५२ रुग्ण आहेत. लातूर जिल्ह्यात ३५०, नांदेड ३०५, उस्मानाबाद १९४, बीड १७७, जालना १४७, हिंगोली १३६, तर परभणी जिल्ह्यात १०२ रुग्णांची नोंद झाली.

****

राज्य मास्कमुक्त करण्याचा कोणताही विचार नाही, युरोपमधल्या राष्ट्रांनी मास्क बाबत जो निर्णय घेतला आहे, त्यावर अभ्यास करून नंतर पुढचा  निर्णय घेण्यात येईल, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पंढरपूर इथं काल विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतल्यानंतर, ते वार्ताहरांशी ते बोलत होते. सध्या राज्यातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या कमी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, त्या कोरोना विषाणू मुक्त झाल्या असल्याचं टोपे यांनी सांगितलं.

****

राज्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा ठरलेल्या तारखेलाच घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. त्या काल मुंबईत बोलत होत्या. दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या आयोजनासंदर्भात चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असून, विद्यार्थी, पालक आणि शाळांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असं त्या म्हणाल्या. कोविड संसर्ग स्थितीचा १५ फेब्रुवारीपर्यंत आढावा घेऊन, परिक्षा मंडळ, एसईआरटी आणि मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

****

मराठवाड्यातल्या अनेक भागात आजपासून शाळा सुरु होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात कोविड नियमांचं पलन करत शाळा सुरु होणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग आजपासून सुरु होत आहेत. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग सात फेब्रुवारी पासून सुरू करण्यास परवानगी दिली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

परभणी जिल्ह्यात इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग आजपासून सुरु करण्यास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परवानगी दिली आहे. 

****

लातूर जिल्ह्यात तोंडारच्या विलास सहकारी साखर कारखान्यात उत्पादित सहा लाख ११ हजाराव्या साखर पोत्याचं पूजन, पालकमंत्री अमित देशमुख आणि कारखान्याच्या अध्यक्ष वैशाली देशमुख यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलतांना पालकमंत्री देशमुख यांनी, कारखाना परिसरात लवकरच विविध प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असून, भविष्यात हा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन प्रकल्पांमुळे कारखाना परिसरातील उदगीर, जळकोट, चाकूर, अहमदपूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, नळेगाव या भागातील शेतकऱ्यांना कामं मिळण्यास नदत होईल, असं देशमुख यांनी यावेळी नमूद केलं.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत, प्राथमिक स्तर पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तर आठवी परीक्षेसाठी, नव्यानं प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज, एक फेब्रुवारीपासून  २८ फेब्रुवारी पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. मंडळानं काल ही माहिती दिली.

****

रेल्वे रूळाच्या नविनीकरणाच्या कामामुळे आज, तसंच दोन, पाच आणि सात फेब्रुवारी रोजी, मराठवाडा एक्स्प्रेस औरंगाबाद ते मनमाड दरम्यान धावणार नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं ही माहिती दिली आहे.

****

जालना जिल्ह्यात परतूर तालुक्यातल्या दैठणा गावात शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे चार एकर ऊस जळून खाक झाला. ऊसाच्या शेतात लोंबकळणाऱ्या तारा एकमेकांवर घासल्यामुळे ही आग लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

****

येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातलं हवामान कोरडं राहील, असा वेधशाळेचा अंदाज आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची लाट येण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे

****

स्पेनच्या राफेन नदालनं रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला दोन-सहा, सहा-सात, सहा-चार, सहा-चार, आणि सात-पाच असं पराभूत करत, ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा जिंकली आहे. त्याचं हे २१वं ग्रँड स्लॅम असून, जगात सर्वाधिक ग्रँडस्लॅम मिळवणारा तो पहिला टेनिसपटू ठरला आहे. यापूर्वी रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोविच या दोघांना प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपदे मिलालेली आहेत.

****

राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये वाईनची विक्री करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा, पुणे जिल्ह्यातल्या शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे शाहीर हेमंतराजे मावळे यांनी निषेध केला आहे. त्यांना २०१७ मध्ये व्यसनमुक्तीबाबत शासनानं महात्मा गांधी यांच्या नावानं पुरस्कार दिला होता, काल महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला मावळे यांनी हा पुरस्कार  परत केला.

****

राज्यातल्या यांत्रिकी मासेमारी नौकांना डिझेल परताव्याचे १२ कोटी रुपये वितरित करण्यास, वित्त विभागानं सहमती दर्शवली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी ४८ कोटी रुपयांचा निधी याआधी वितरीत करण्यात आला असल्याचं, त्यांनी सांगितलं. सध्या १६० मच्छीमार सहकारी संस्थांच्या नऊ हजार ६४६ यांत्रिकी नौकांना डिझेल परताव्याची रक्कम मिळणार असल्याची माहितीही, शेख यांनी दिली.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.01.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र