Sunday, 30 January 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महात्मा गांधी यांची आज ७४ वी पुण्यतिथी. या निमित्तानं पाळण्यात येण्याऱ्या हुतात्मा दिनानिमित्त आज देशभरात सकाळी ११ वाजता दोन मिनिटं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली.

****

 हुतात्मा दिनानिमित्त आज फिल्म्स डिव्हिजनचं संकेतस्थळ आणि यूट्यूब वाहिनीवर “गांधी रिडिस्कव्हर्ड” हा माहितीपट दाखवला जाणार आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून होत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत या चित्रपटाचं विशेष प्रक्षेपण केलं जाणार आहे. फिल्म्स डिव्हीजन डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर आज २४ तास या माहितीपटाचं प्रक्षेपण होणार आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे. गांधी यांच्या उदात्त आदर्शांना अधिक लोकप्रिय करण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न असल्याचं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

****

देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना विषाणू संसर्ग झालेले २ लाख ३४ हजार नवे रुग्ण आढळून आले. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २१ शतांश टक्के असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. सध्या देशात १८ लाख ८४ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात आतापर्यंत १६५ कोटी ७० लाख लोकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. काल चोवीस तासात देशभरात ६२ लाख अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब तालुक्यातील २८ गावांतील ३० किलोमीटर लांबीच्या शेत-पाणंद रस्त्यांच्या कामांना राज्य सरकारच्या नियोजन विभागानं मंजुरी दिली आहे. अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली. मातोश्री गामसमृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गंत ही काम केली जाणार आहेत.

****

आईसीसी १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारतीय संघानं बांग्लादेश संघाचा ५ गडी राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. येत्या बुधवारी सुपरलीग उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे.

****

No comments: