Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशभर त्र्यहात्तरावा
प्रजासत्ताक दिन आज कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत उत्साहात
साजरा करण्यात येत आहे. नवी दिल्लीमध्ये राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या
हस्ते मुख्य ध्वजवंदन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यावेळी प्रमुख उपस्थित होते. देशाच्या सैन्यदलांचं सामर्थ्य तसंच
देशाच्या संस्कृतीचं संचलन सोहळ्यात पाहायला मिळालं. महाराष्ट्रातर्फे राज्यातल्या
जैवविविधतेचं प्रदर्शन सादर करणारा रथ या संचलनात सहभागी झाला होता. सैन्यदलांसह विविध
राज्यांचे २५ चित्ररथ संचलनात सहभागी झाले होते. यंदा प्रथमच वायूदलाच्या ७५ विमानांच्या
भव्य पथकानं संचलनात सहभाग घेतला. या विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं संचलनाचं
वैशिष्ठ्य ठरली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी त्र्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या
आहेत. प्रजासत्ताक दिन सर्वांना आनंदाचा जाओ अशा शुभेच्छा मोदी यांनी सर्वांना दिल्या
आहेत.
****
मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं.
****
औरंगाबाद
इथं पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. औरंगाबाद जिल्हा
लवकरच कोविड लसीकरण युक्त होईल असा विश्वास पालकमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात कोविड लसीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. त्याची दखल राज्य मंत्रिमंडळानं
घेतली असल्याचं सांगत देसाई यांनी प्रशासनाचं कौतुक केलं. विविध विकासात्मक कामांमुळं
जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचं देसाई यावेळी म्हणाले. औरंगाबाद जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. देवगिरी
किल्यावर नायब तहसिलदार प्रशांत देवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. महावितरण
प्रादेशिक कार्यालय आणि महावितरण परिमंडल कार्यालय इथं महावितरण प्रादेशिक कार्यालयाचे
सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.मंगेश गोंदावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी
घटना उद्देश पत्रिकेचं गोंदावले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी सामुहिक वाचन
केलं.
****
जालना इथं
पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते मुख्य
शासकीय ध्वजरोहण करण्यात आलं. नांदेड इथं पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या कवायत मैदानावर
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण
यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. बीड इथं पोलिस मुख्यालय मैदानावर
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी
उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलिस दलातले अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक यांचा
सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद इथं पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते तुळजाभवानी
क्रीडासंकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झालं. उस्मानाबाद जिल्हा आकांक्षीत जिल्हा
म्हणून केंद्र सरकारनं जाहीर केला असून विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती करण्यासाठी
केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून प्रयत्न होत असल्याचं गडाख यांनी यावेळी सांगितलं.
हिंगोली शहरात संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर राज्याचे शिक्षण मंत्री आणि जिल्ह्याच्या
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी उपस्थितांना
तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली. कोविडमुळं आनाथ झालेल्या बालकांना पाच लाख रुपये
ठेवीचं प्रमाणपत्र देण्यात आलं. वीर मातेला सरकारच्या वतीनं चार एकर जमीन दिल्याचं
प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
****
पंढरपूर
इथं श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमीत्त विठ्ठल रूक्मिणीमातेच्या
गाभाऱ्यात तसंच मंदिरात आकर्षक अशी झेंडू आणि शेवंतीच्या फुलांपासून ‘तिरंगा’ रंगाच्या
फुलांची आरास करण्यात आली.
****
यवतमाळ इथं
पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नागरिकांनी कुठलीही
भिती न बाळगता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं. याप्रसंगी गुणवत्तापूर्ण
सेवा पोलीस पदक प्राप्त अधिकारी आणि हुतात्मा वीर पत्नींचा सत्कार करण्यात आला. धुळे
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते
धुळे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ध्वजारोहण करण्यात आलं. कोरोना विषाणू संसर्ग
प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करत मोजक्या निमंत्रीतांच्या उपस्थितीत मुख्य ध्वजारोहण
झालं. यावेळी धुळे पोलीस दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध पथसंचलन केलं. सातारा इथं जिल्हा
क्रीडा संकुलाच्या मैदानावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय
ध्वजारोहण करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment