आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मार्च २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
युक्रेनहून भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यासाठी सुरु असलेल्या ऑपरेशन
गंगा मोहीमेंतर्गत बुखारेस्टहून सातवं विमान आज मुंबईत दाखल झालं. यामध्ये १८२ भारतीय मायदेशी परतले
असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रवाशांचं स्वागत केलं.
****
महाशिवरात्र
आज सर्वत्र भक्तिभावानं साजरी होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळ इथलं घृष्णेश्वर
मंदीर, बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ मंदीर आणि हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नगनाथ
इथं भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारानं सन्मानित
करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते हे पुरस्कार
प्रदान करण्यात आले. उस्मानाबाद जिल्ह्याच्या कडोदरा तालुक्यातल्या जगदंबानगर इथल्या
जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक उमेश खोसे यांचा यात समावेश
आहे.
****
गाईच्या दूध खरेदी दरात दोन ते तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आजपासून सरसकट प्रतीलीटर ३० रुपये खरेदी दर आकारण्यात येणार आहे. राज्यातल्या सहकारी आणि खासगी दूध संघांचं नेतृत्व करणारी दूध उत्पादक प्रक्रिया आणि व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक
संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
****
औरंगाबाद शहरातल्या चौदा हजार ९८ पथविक्रेत्यांना, लवकरच कायद्यातील तरतुदीनुसार विक्रेता ओळखपत्र आणि प्रमाणपत्र देण्याचा निर्णय
महापालिकेनं घेतला आहे. शहर पथविक्रेता समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहीद
भगतसिंग हॉकर्स युनियन संलग्न आयटक आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशननं, गेल्या पाच वर्षांपासून यासंदर्भात आंदोलन केलं होतं.
****
पिक कर्ज वाटपास टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून परभणी जिल्ह्यात सेलू इथल्या
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेसमोर, शिवसेनेनं
उपजिल्हाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रणजीत गजमल यांच्या नेतृत्वाखाली
आंदोलन केलं.
****
No comments:
Post a Comment