Saturday, 30 April 2022

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक – 30.04.2022 रोजीचे- कोरोना वृत्त विशेष

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 30.04.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३० एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      महाराष्ट्र स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनी सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन.

·      शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांत राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ.

·      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्वत्र अभिवादन.

आणि

·      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सिंथेटिक ट्रॅक उभारण्यास परवानगी.

****

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या १ मे रोजी सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्या सकाळी ८ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

दरम्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील हिरवळीवर सकाळी सव्वा नऊ वाजता ध्वजारोहण होणार आहे.

****

कोविड महामारी, महापूर, चक्रीवादळे अशा विविध आपत्तींना तोंड देत राज्य शासनाने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांची माहिती देणाऱ्या ‘दोन वर्षे जनसेवेची: महाविकास आघाडीची’ या मोहिमेअंतर्गत उद्या १ मे रोजी राज्यात विभागीयस्तरावर सचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्‌घाटन होईल.

 

औरंगाबाद इथं जिल्हा परिषद कार्यालयासमोर सिमंत मंगल कार्यालयात हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्या सकाळी साडे दहा वाजता या प्रदर्शनाचं उद्‍घाटन होणार आहे. हे प्रदर्शन नागरिकांसाठी उद्यापासून पाच मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

****

राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या स्थापनेस उद्या १ मे रोजी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्यातल्या जिल्हा परिषद अंतर्गत हीरक महोत्सव समारंभ साजरा करण्यात यावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार उद्या नांदेड जिल्हा परिषदेत सकाळी साडेआठ वाजता हीरक महोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदअंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे.

****

विद्यार्थ्यांना क्रमिक शिक्षणासोबतच सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांचं शिक्षण देऊन, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या पापरी जिल्हा परिषद शाळेत स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. शिक्षक हे उद्याची पिढी घडवत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, गुणवत्तेबाबत सातत्य ठेवावं असंही पवार म्हणाले.

****

व्यंकटेश्वराचं मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचं पत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज तिरुपती इथं जाऊन देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केलं. आज पहाटे त्यांनी बालाजीचं दर्शन घेऊन पूजा केली आणि आपल्यासमवेतचं पत्र चरणी अर्पण केलं. नवी मुंबईतल्या उलवे नोड इथली जागा देवस्थानला देण्यात येणार आहे.

****

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकडोजी महाराजांना अभिवादन केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्र उभारणीतील ग्राम विकासाचं महत्व सहज सोप्या पद्धतीने समजावून दिलं. समाजातील वाईट प्रथा, चालीरितींना त्यांनी कठोर शब्दांत विरोध केला. तुकडोजी महाराज यांचे ग्राम कल्याणाचे विचार प्रत्यक्षात यावेत यासाठी प्रयत्नशील राहूया, हेच त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तुकडोजी महाराजांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आज सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली.

****

शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यत ५७ हजार ९९ प्रवेश निश्चित झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या खासगी शाळांमधील प्रवेशाची ही प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाइन सोडत ३० मार्च रोजी काढण्यात आली. या सोडतीनुसार ९० हजार ६८८ विद्यार्थ्यांची निवड यादी तसंच ६९ हजार ८५९ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी १० मे ही अंतिम मुदतवाढ असणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी दिली आहे.

****

केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परिसरात सिंथेटिक अॅथेलेटिक ट्रॅक उभारण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटींच्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेचं पत्र विद्यापीठाला प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. उपलब्ध जागा, निविदा, काम करणारी संस्था आदी बाबतची कामं आगामी तीन महिन्यांच्या आत करून तसा अहवाल मंत्रालयाला पाठवण्याची सूचना करण्यात आली आहे. हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला. खेलो इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून एकूण ३८ प्रस्ताव आले होते. त्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची निवड झाली आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या एक मे रोजी औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सभेसाठी राज ठाकरे आज सकाळी पुण्याहून औरंगाबाद इथं दाखल झाले. त्यांनी वढू बुद्रुक तुळापूर इथं छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन केल्याचं, मनसेकडून सांगण्यात आलं.

****

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक चित्रपट महर्षी आणि नाशिकचे भूमीपुत्र दादासाहेब फाळके यांच्या १०९ व्या जन्मदिनानिमित्त आज नाशिक इथं त्यांना अभिवादन करण्यात आलं. महर्षी चित्रपट संस्थेच्या वतीने लघुपट महोत्सवाचा शुभारंभ त्यानिमित्ताने करण्यात आला. कार्यक्रमाला सहायक शिक्षण संचालक सरोज जगताप, नाशिकच्या वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राजक्ता बसते आणि महर्षी चित्रपट संस्थेचे निशिकांत पगारे यावेळी उपस्थित होते.

****

अमेरिकेतून कुरियरमधून मुंबईत आलेलं सुमारे २७ किलो अंमलीपदार्थ तस्करी कस्टम विभागाने जप्त केलं आहे. दरम्यान या प्रकरणातल्या आरोपीला कस्टमकडून अटक करण्यात आली आहे. अमेरिकेतून मुंबईत कुरियरमधून ड्रग्सची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून कस्टमने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

****

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं अभिनेत्री जॅकलीन फर्नांड़ीसच्या ७ कोटींच्या मुदत ठेवी जप्त केल्या आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांच्याशी केलेल्या व्यवहारांच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.04.2022 रोजीचा सायंकाळी 06.35 वाजेचा वृत्तवि...

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 30.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 03.05.2022 ‘आजादी का अमृत महोत्सव - गाथा स्वातंत्र्यसेनानींची’.

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.05.2022 ‘आजादी का अमृत महोत्सव - गाथा स्वातंत्र्यसेनानींची’.

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.05.2022 ‘आजादी का अमृत महोत्सव - गाथा स्वातंत्र्यसेनानींची’.

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 – सोलापूर जिल्हा वार्तापत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

नवी दिल्ली इथं राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू, सरन्यायाधीश एन व्ही रमणा यावेळी उपस्थित होते. सहज आणि सोप्या पद्धतीने न्याय मिळवून देण्याची व्यवस्था विकसित करणं आणि न्याय प्रणालीसमोर असलेली आव्हानं दूर करण्यासाठी प्रशासन आणि न्यायपालिकेला एकत्र चर्चा करण्याची संधी देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे. 

****

लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आज सेवानिवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे देशाचे २९वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. देशाच्या लष्करप्रमुखांची जबाबदारी सांभाळणारे ते कोअर ऑफ इंजिनिअर्समधले पहिले अधिकारी असतील.

****

कोरोना विषाणू संसर्गाची तीव्रता वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रा घेण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. मात्र या वर्धक मात्रेला राज्यातल्या पात्र नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण राज्यात आतापर्यंत ७५ हजार नागरिकांनी ही मात्रा घेतली आहे. मुंबई, पुण्यामध्ये लसीच्या वर्धक मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे, तर जालन्यासह १८ जिल्ह्यांमध्ये अद्याप एकाही नागरिकानं ही मात्रा घेतलेली नाही, असं आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

****

ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बहुराष्ट्रीय खरेदीच्या संकेतस्थळांना पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी स्वदेशी विकसित केलेलं इ-कॉमर्स चं नेटवर्क शंभर शहरांमध्ये सुरू करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल मुक्त स्त्रोत यंत्रणेची चाचणी करण्याची घोषणा केली.

****

मनिला इथं सुरू असलेल्या आशियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरित भारताच्या पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरित तिनं चीनच्या हे बीग जिओला २१-९, १३-२१ आणि २१-१९ असं पराभूत केलं. 

****

मराठवाड्यात काल केवळ नांदेड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 30 ؍ اپریل 2022 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 30 April 2022

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:  ۳۰ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  اپریل  ۲۰۲۲ء؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 

 چند اہم خبروں کی سر خیاں سماعت کیجیے...

٭ ایم پی ایس سی  کا نتیجہ ظاہر‘ سانگلی کا پر مود چَوگُلے ریاست میں سرِ فہرست 

٭   ٹیکس دہندگان کو ساز گار  اور  شفاف ٹیکس انتظا میہ کی ضرورت‘ نائب صدر جمہوریہ

٭ 5؍ لاکھ مکانوں کا ہدف مکمل کرنے کے لیے مہا آواس اِسکیم میں جون تک توسیع

٭ ریاست میں کووِڈ وباء کے نئے148؍ مریض‘ مراٹھواڑہ میں ناندیڑ میں ایک مریض کا اندراج

٭ پدم شری ڈاکٹر رمن گنگا کھیڑ کر کو  ڈاکٹر شنکر رائو چو ہان جیون گورو ایوارڈ

٭ لاتور ضلعے کے 4؍ کِسان ریاستی سطح کے زرعی ایوارڈس کے لیے منتخب

٭ اورنگ آ باد میں اِلیکٹرِک گاڑیوں کے شعبے میں سر مایہ کاری لانے کے لیے کوشش‘ مرکزی مملکتی وزیر مالیات ڈاکٹر بھاگوت کراڑ

اور

٭ بیڑ ضلعے میں44؍ فیصد پانی کا ذخیرہ ‘ پینے کے پانی کو مختص کرنے کی سر پرست وزیر کی ہدایت 

 


اب خبریں تفصیل سے....

مہاراشٹر ریاستی پبلِک سر وِس کمیشنMPSC کا نتیجہ کَل ظاہر کیا گیا ۔ اِس میں سانگلی کے پر مود چَو گُلے نے اوّل مقام حاصل کیا ۔ نِتیش کدم نے دوسرا  اور  روپالی مانے  نے تیسرا مقام حاصل کیا ہے ۔ 597؍ اُمید واروں کی میرٹ لِسٹ کمیشن نے ویب سائٹ پر ظاہر کی ہے ۔ 15؍ زمرے کے  200؍ نشستوں کے لیے 

اپریل2020؁ء میں مجوزہ یہ امتحان کووِڈ کے پھیلائو کی وجہ سے 2021؁ءمیں لیا گیا ۔ انتخا بی عمل میں کَل اِنٹر ویو ہونے کے بعد چند گھنٹوں میں نتیجہ ظاہر ہو جانے کی وجہ سے اُمید واروں نے اطمینان کا اظہار کیا ۔

***** ***** ***** 

ٹیکس دہندگان کوساز گار ‘ شفاف  اور  با مقصد ٹیکس کی انتظا میہ کو ضرورت ہے ۔ یہ بات نائب صدر جمہو ریہ ایم  وینکیا نائیڈو نے کہی ہے ۔ وہ کَل ناگپور میں نیشنل اکیڈ می آف ڈائریکٹ ٹیکس NADT بھارتیہ محصول خد مات IRS  افسران کے74؍ ویں رجِمنٹ کی اختتامی تقریب میں بطور مہمان ِ خصو صی مخا طب تھے ۔ گور نر بھگت سنگھ کو شیاری ‘ وزیر نا توا نائی ڈاکٹر نِتن رائوت ‘ مرکزی ٹیکس بورڈ کے صدر جے بی مہو پاتّرا سمیت کئی معزیزین اِس موقعے پر موجود تھے ۔

***** ***** ***** 

ریلوے مملکتی وزیر رائو صاحب دانوے نے ممبئی کے ایئر کنڈیشن مضا فاتی ریلوے گاڑیوں کے ٹیکس کے نرخ میں 50؍ فیصد تخفیف کرنے کا اعلان کیا ہے ۔169؍ سال کے قدیم بھائے کُلہ ریلوے اسٹیشن کی جدید کاری کی گئی عمارت کا افتتاح کر تے ہوئے وہ مخا طب تھے ۔ ممبئی ریلوے اسٹیشن مسا فروں کی سہو لت کے لیے طیران گاہوں کی طرح بنائے جا ئیں گے ۔ یہ بات ریلوے مملکتی وزیر دانوےنے کہی ۔

***** ***** *****  

غریب ‘ مستحق ‘ بے گھر اور  بے زمین مستحقین کو موسمِ باراں سے قبل گھر کُل کا فائدہ دینے کے مقصد سے 5؍ لاکھ مکا نات کی تعمیرات جنگی پیما نے پر مکمل کرنے کے لیے مہا آ واس اسکیم کی5؍ جون 2022؁ء تک توسیع کی گئی ہے ۔ دیہی تر قیاتی وزیر حسن مُشرِف نے اِس کی اطلاع دی ۔

***** ***** ***** 

بد عنوا نی کے معاملے میں جیل میں قید ریاست کے سابق وزیر داخلہ انیل دیشمکھ کی عدالتی تحویل میں13؍ مئی تک اضا فہ کر دیا گیا ہے ۔ ممبئی کے خاص عدالت نے دیشمکھ کو ظاہر کی گئی ۔ عدالتی تحویل کی مدّت کَل ختم ہو ئی ۔ اِس پر عدالت نے اُن کی عدالتی تحویل میں14؍ یوم کی توسیع کر دی ۔

***** ***** ***** 

رکن پارلیمنٹ نو نیت رانا  اور  رکن اسمبلی روی رانا کی ضما نت کی در خواست پر ممبئی سیشن کورٹ میں کَل سماعت نہیں ہو سکی۔ عدالت کے نظام الاوقات کے مطا بق دیگر اہم مقد مات کی سماعت کَل ہونے والی تھی ۔ اِس کی وجہ سے رانا جوڑے کی ضمانت کی در خواست پر آج سماعت ہو گی ۔ 24؍ اپریل سے رانا جورا بغا وت کے الزام میں جیل میں قید ہے ۔

***** ***** ***** 

مہا راشٹر نو نِر مان سینا کے صدر راج ٹھا کرے کا مجوزہ اجلاس منسوخ کر نے کا مطا لبہ کرنے والی عرضداشت ممبئی ہائی کورٹ کی اورنگ آباد بینچ نے مسترد کر تے ہوئے در خواست گذار کو ایک لاکھ روپیوں کا جر ما نہ عائد کیا ۔ راج ٹھا کرے کَل یکم مئی کو اورنگ آباد میں جلسۂ  عام ہو رہا ہے ۔ اِس جلسۂ  عام کو پولس انتظامیہ نے مشروط اجازت دی ہے ۔ اجلاس کے لیے راج ٹھا کرے آج صبح پو نے سے روانہ ہو ں گے ۔ اِس سفر کے در میان وہ چھتر پتی سنبھا جی مہا راج کی سما دھی کا درشن کر کے اُنھیں خراج عقیدت پیش کریں گے ۔ منسے کی  جانب سے اِس کی اطلا ع دی گئی ۔


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 

 

ریاست میں کَل کووِڈ وباء سے متاثرہ نئے 148؍ مریضوں کی تصدیق ہوئی اِس کی وجہ سے تمام ریاست میں کووِڈسے متاثرین کی جملہ تعداد78؍ لاکھ 77؍ ہزار577؍ ہو گئی ہے ۔ کَل2؍ مریض دوران علاج چل بسے ۔ ریاست میں اِس وباء سے اب تک مر نے والوں کی جملہ تعداد ایک لاکھ47؍ ہزار842؍ ہو گئی ہے ۔ شرح اموات ایک اعشا ریہ 87؍ فیصد ہے ۔ کَل128؍ مریض صحت یاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک77؍ لاکھ

28؍ ہزار756؍ مریض اِس وباء سے نجات حاصل کر چکے ہیں۔ کووِڈ سے نجات کی شرح98؍ اعشا ریہ 11؍ فیصد ہے ۔ ریاست میں فی الحال979؍ مریضوں کا علاج جاری ہے۔

***** ***** ***** 

مراٹھواڑہ میں کَل ناندیڑ ضلعے میں ایک کورونا وائرس متاثرہ مریض کی شناخت ہوئی۔ اورنگ آ باد ‘  بیڑ ‘  جالنہ ‘ ہنگولی  ‘ لاتور ‘ عثمان آ باد   اور  پر بھنی اضلاع میں کَل ایک بھی نیا مریض نہیں پا یا گیا۔

***** ***** ***** 

کووِڈ  دور میں مُلک گیر سطح پر اہم رول ادا کرنے والے مراٹھواڑہ کے سپوت پدم شری ڈاکٹر رمن گنگا کھیڑ کر کو کَل ڈاکٹر شنکر رائو چو ہان جیون گو رو ایوارڈ دے کر استقبال کیا گیا ۔ ناندیڑ -واگھا لہ میونسپل کارپوریشن کے سِلوَر جُبلی تقریب میں رابطہ وزیر اشوک چوہان کے ہاتھوں یہ ایوارڈ دیا گیا ۔

***** ***** ***** 

لاتور ضلعے کے4؍ کسانوں کو ریاستی سطح کے زرعی ایوارڈس کے لیے منتخب کیا گیا ۔ ناگناتھ پاٹل

  ‘ دِنکر پاٹل  ‘  اوم کار مسکلّے  اور  مُر لی دھر ناگ ٹِڑک  ایوارڈس پانے والوں میں شامل ہیں ۔ 2؍ مئی کو ناسک میں گور نر بھگت سنگھ کوشیاری کے ہاتھوں  اور  وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کی صدارت میں منعقدہ تقریب میں سن2017؁ء  ‘  2018؁ء  اور  2019؁ء  اِن تین سال کے ایواڈرس تقسیم کیے جا ئیں گے ۔

***** ***** ***** 

بھارت کو الیکٹرک گاڑیوں کے پرو ڈکشن مرکز بنا نے کا حکو مت کا ہدف ہے ۔ اورنگ آباد میں اِس شعبے کی سر مایہ کاری لانے کے لیے کوشش جاری ہیں ۔ یہ بات مرکزی مملکتی وزیر خزا نہ ڈاکٹر بھاگوت کراڑ نے کہی ہے ۔ وہ کَل اورنگ آباد میں2؍ روزہ توانائی کانفرنس کا افتتاح کرنے کےبعد مخاطب تھے ۔

***** ***** ***** 

بیڑ ضلعے میں44 ؍ فیصد پانی کا ذخیرہ موجود ہے ۔ یہ بات ضلع انتظامیہ نے کہی ہے ۔ یہ ذخیرہ ماہِ جو لائی کے آخر تک کا فی ہو ۔ اِس مقصد سے تدابیر کی گئی ہیں ۔ پانی قِلّت جائزہ میٹنگ میں رابطہ وزیر دھننجئے منڈے نے پینے کے پانی کو مختص کرنے کی ہدایت دی ۔

***** ***** ***** 

ریاست میں شدید گر می کی لہر جاری ہیں ۔ محکمہ موسمیات نے آج اور کَل وَردھا ‘ آکو لہ  ‘  چندر پور  اور  ایوت محل اضلاع کے لیے  Orange Alert  جاری کیا ہے ۔ زیادہ درجۂ  حرارت کی وجہ سے لو لگنے کے واقعات میں اضا فہ ہو سکتا ہے ۔ اِس نظر یہ سے سب خاص توجہ دیں ۔ ضعیف العمر ‘ معصوم بچے اور  مریضوں کا خاص خیال رکھیں ۔ جار ی کر دہ مکتوب میں یہ بات کہی گئی ہے ۔

***** ***** ***** 



آخر میں چند اہم خبروں کی سر خیاںدوبارہ سماعت کیجیے ...


٭ ایم پی ایس سی  کا نتیجہ ظاہر‘ سانگلی کا پر مود چَوگُلے ریاست میں سرِ فہرست 

٭   ٹیکس دہندگان کو ساز گار  اور  شفاف ٹیکس انتظا میہ کی ضرورت‘ نائب صدر جمہوریہ

٭ 5؍ لاکھ مکانوں کا ہدف مکمل کرنے کے لیے مہا  آواس اِسکیم میں جون تک توسیع

٭ ریاست میں کووِڈ وباء کے نئے148؍ مریض‘ مراٹھواڑہ میں ناندیڑ میں ایک مریض کا اندراج

٭ پدم شری ڈاکٹر رمن گنگا کھیڑ کر کو  ڈاکٹر شنکر رائو چو ہان جیون گورو ایوارڈ

٭ لاتور ضلعے کے 4؍ کِسان ریاستی سطح کے زرعی ایوارڈس کے لیے منتخب

٭ اورنگ آ باد میں اِلیکٹرِک گاڑیوں کے شعبے میں سر مایہ کاری لانے کے لیے کوشش‘ مرکزی مملکتی وزیر مالیات ڈاکٹر بھاگوت کراڑ

اور

٭ بیڑ ضلعے میں44؍ فیصد پانی کا ذخیرہ ‘ پینے کے پانی کو مختص کرنے کی سر پرست وزیر کی ہدایت 


علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭


आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ : 30 ؍ اپریل 2022 وَقت : صبح 09.00 سے 09.10 ؍ بجے

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 April 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० एप्रिल २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      एमपीएससीचा निकाल जाहीर; सांगलीचे प्रमोद चौगुले राज्यात प्रथम

·      करदात्यांना अनुकूल आणि पारदर्शक कर प्रशासनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त

·      पाच लाख घरकुलांचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाआवास अभियानाला पाच जूनपर्यंत मुदतवाढ

·      राज्यात कोविड संसर्गाचे नवे १४८ रुग्ण; मराठवाड्यात नांदेड इथं एका रुग्णाची नोंद

·      पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान

·      लातूर जिल्ह्यातल्या चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड

·      औरंगाबाद इथं इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न - केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड

आणि

·      बीड जिल्ह्यात ४४ टक्के पाणी शिल्लक; पिण्याच्या पाण्याचं आरक्षण करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

****


सविस्तर बातम्या

महाराष्ट्र राज्य लोक सेवा आयोग - एम पी एस सी चा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये सांगलीचे प्रमोद चौगुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. नीतेश कदम यांनी द्वितीय तर रुपाली माने यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी आयोगानं संकेतस्थळावर जाहीर केली आहे. १५ संवर्गातल्या २०० जागांसाठीची एप्रिल २०२० मध्ये नियोजित असलेली ही परीक्षा कोविड प्रादुर्भावामुळे मार्च २०२१ मध्ये घेण्यात आली होती. निवड प्रक्रियेत काल प्रत्यक्ष मुलाखत झाल्यानंतर अवघ्या काही तासांत निकाल जाहीर झाल्याने, उमेदवारांमधून समाधान व्यक्त होत आहे.

****

करदात्यांना अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अशा कर प्रशासनाची गरज, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते काल नागपुरात नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस-एन ए डी टी इथं, भारतीय महसूल सेवा-आय आर एस अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीच्या समारोप समारंभ प्रसंगी, प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. महोपात्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. करप्रणाली सुलभ करण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपतींनी, ऐच्छिक कर अनुपालनाच्या दिशेनं ‘अपडेट रिटर्न सादर करण्यासारख्या आयकर विभागाच्या निर्णयाचं कौतुक केलं.

****

रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी मुंबईतल्या वातानुकुलित उपनगरी रेल्वे गाडीच्या तिकीटदरात ५० टक्क्यांनी कपातीची घोषणा केली आहे. गॉथिक वास्तुरचना यादीत असलेल्या आणि एकशे एकोणसत्तर वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी, ते काल बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई रेल्वे स्थानक प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी विमानतळांसारखं अद्ययावत केलं जाणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितलं.

****


गरीब, गरजू, बेघर आणि भूमिहीन लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देण्याच्या उद्देशानं पाच लाख घरकुलांचं बांधकाम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी महाआवास अभियानाला पाच जून, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. राज्यात केंद्र पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांची गतिमान अंमलबजावणी आणि गुणवत्तावाढीसाठी २० नोव्हेंबर, २०२१ ते एक मे २०२२ या कालावधीत महाआवास अभियान राबवलं जात आहे. त्यात पाच लाख घरं पूर्ण करण्याचा मानस असल्याचं ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं.

****

भ्रष्टाचार तसंच काळा पैसा वैध प्रकरणी कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत, येत्या १३ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयानं देशमुख यांना सुनावलेल्या कोठडीची मुदत काल संपली, त्यावर न्यायालयानं त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे.

****

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात काल सुनावणी होऊ शकली नाही, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात येईल, असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितलं. गेल्या २४ एप्रिलपासून राणा दांपत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नियोजित सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावत, याचिकाकर्त्याना एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. ठाकरे यांची उद्या एक मे रोजी औरंगाबाद इथं जाहीर सभा होणार आहे. या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. सभेसाठी राज ठाकरे आज सकाळी पुण्याहून रवाना होणार आहेत. या प्रवासादरम्यान ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन करणार असल्याचं, मनसेकडून सांगण्यात आलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १४८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७७ हजार ५७७ झाली आहे. काल दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८४२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १२८ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २८ हजार ७५६ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल नांदेड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

****

कोविड काळात देशपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे मराठवाड्याचे भूमिपूत्र पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांचा काल नांदेड इथं, डॉ.शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. समाजातली असमानता आणि आरोग्याच्या प्रश्नावर नेटाने काम करण्यासाठी पुरस्कारातून प्रेरणा मिळते अशी भावना, डॉ.गंगाखेडकर यांनी पुरस्कारला उत्तर देताना व्यक्त केली.

****

लातूर जिल्ह्यातल्या चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यामध्ये लिंबाळवाडी इथले नागनाथ पाटील, मोहनाळचे दिनकर पाटील, महादेववाडीचे ओमकार मसकल्ले आणि मुरुड बुद्रुक इथले मुरलीधर नागटिळक यांचा समावेश आहे. राज्यातल्या कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, तसंच कृषीउत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या दोन मे रोजी नाशिक इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

भारताला इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन केंद्र करण्याचा सरकारचा निर्धार असून औरंगाबाद इथं या क्षेत्रातली मोठी गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं दोन दिवसीय ऊर्जा परिषदेचं उद्‌‌घाटन केल्यानंतर बोलत होते. यासंदर्भात इलेक्ट्रिक बस आणि बॅटरी उत्पादनात अग्रेसर असलेल्या कंपन्यांशी चर्च सुरू असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.

****

अवैध सावकारी लूट थांबवण्यासाठी तसंच अवैध सावकारांनी हडपलेल्या जमिनी मूळ मालक शेतकऱ्यांना परत करण्यासाठी कायदाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश, राज्याचे सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत. ते काल नांदेड इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यातल्या अतिरिक्त ऊसाचं गाळप २५ मे पूर्वी पूर्ण होण्याबाबत योग्य ती दक्षता घेण्याची, तसंच नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी केली. बाजार समितीच्या निवडणुका या वेळेवर झाल्या पाहिजेत, बाजार समित्यांनीही उत्पन्न वाढवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना सहकार मंत्री पाटील यांनी दिल्या.

****

बीड जिल्ह्यात ४४ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलं आहे. हा पाणी साठा जुलै महिन्याच्या अखेपर्यंत पुरेल, यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पाणी टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पिण्याच्या पाण्याचं सर्वप्रथम आरक्षण करण्याच्या जीवन प्राधिकरणास सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात दोन मोठ्या प्रकल्पात सरासरी ५३ टक्के पाणीसाठा आहे, तर दहा मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात गाळप अभावी शिल्लक उसाला प्रतिएकर ८० हजार रुपये, तर जळालेल्या उसाला प्रतिएकर ४० हजार रुपये अनुदान देण्याची मागणी, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलं. पुढील वर्षी अशी परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी यंदाच्या हंगामातल्या ऊसतोड आणि गाळप प्रक्रियेतल्या उणीवांचा बारकाईने अभ्यास करून पुढील हंगामात योग्य नियोजन करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.

****

औरंगाबाद इथल्या नगररचना विभागातला प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्षप्रमुख संजय चामले याला तीन लाख रुपये लाच घेताना काल रंगेहात पकडलं. बांधकामाचा नकाशा मंजूर करुन देण्यासाठी चामले याने तक्रारदाराकडे सहा लाख रुपयांची मागणी केली होती, त्यातला पहिला हप्ता घेताना काल त्याला अटक करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई ग्रामीण पोलिस स्थानकातले सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सेंगर आणि पोलीस नाईक नितीन चौरे या दोघांना १५ हजार रुपयांची लाच घेताना पडकण्यात आलं. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक झाली. पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं, उस्मानाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील नाट्यशास्त्र आणि लोककला विभाग, तसंच विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं, नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. उपकेंद्राचे संचालक डॉ.डी.के.गायकवाड यांच्या हस्ते काल कार्यशाळेचं उद्घाटन झालं. येत्या ६ मे पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे.

****

राज्यात उष्णतेची लाट तीव्र असून हवामानशास्त्र विभागाने आज आणि उद्या वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. उच्च तापमानामुळे उष्माघाताची शक्यता वाढली असून त्यादृष्टीनं सर्वांनी विशेषतः वृद्ध, लहान मुलं, आणि रुग्णांची काळजी घ्यावी असं वेधशाळेच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

****

बीड जिल्ह्यात एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद झालेली बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. अवघ्या एका आठवड्यात महामंडळाच्या महसुलात ३७१ लाख रूपयांची वाढ झाली आहे, तर जवळपास दोन हजार ८०० कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झाले आहेत.

****

औरंगाबाद - रेणीगुंठा ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी आता तिरुपती रेल्वेस्थानकापर्यंत धावणार आहे. हा बदल सहा मे पासून करण्यात येणार आहे. तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.04.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Friday, 29 April 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.04.2022 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 28.04.2022 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

आकाशवाणी औरंगाबाद - दिनांक 29.04.2022 रोजीचा ‘आझादी का अमृत महोत्सव - व्...

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.04.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 April 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ एप्रिल २०२ सायंकाळी ६.१०

****

·      करदात्यांना अनुकूल आणि पारदर्शक कर प्रशासनाची गरज उपराष्ट्रपतींकडून व्यक्त.

·      महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून पर्यटकांसाठी विविध सोयी-सवलती जाहीर.

·      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा राज्यभरात ७५ हजार वृक्षारोपणाचा संकल्प.

आणि

·      लातूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी निवड.

****

करदात्यांना अनुकूल, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ अशा कर प्रशासनाची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. ते आज नागपुरात नॅशनल अॅकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस-एनएडीटी इथं भारतीय महसूल सेवा-आयआरएस अधिकाऱ्यांच्या ७४ व्या तुकडीच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष जे.बी. महोपात्रा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. करप्रणाली सुलभ करण्याच्या गरजेवर भर देताना उपराष्ट्रपतींनी ऐच्छिक कर अनुपालनाच्या दिशेने ‘अपडेट रिटर्न’ सादर करण्यासारख्या आयकर विभागाच्या निर्णयाचं कौतुक केलं.

****

रेल्वे राज्यमंत्री राबसाहेब दानवे यांनी मुंबईतल्या वातानुकुलित उपनगरी रेल्वे गाडीच्या तिकीटदरात ५० टक्क्यांनी कपातीची घोषणा केली आहे. गॉथिक वास्तुरचना यादीत असलेल्या आणि एकशे एकोणसत्तर वर्ष जुन्या भायखळा रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी दानवे बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईतली रेल्वे स्थानकं प्रवाशांच्या सोयीसुविधांसाठी विमानतळांसारखी अद्ययावत केली जाणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितलं.

****

मनी लाँड्रिग प्रकरणी कारागृहात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या १३ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. मुंबईच्या विशेष न्यायालयाने देशमुख यांना आज २९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली होती,त्यात आता १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

****

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी होऊ शकली नाही, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या शनिवारी सुनावणी घेण्यात येईल असं न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितलं. गेल्या २४ एप्रिलपासून राणा दांपत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहे.

****

केंद्र सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी वाटेल तसे निर्णय घेत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते. केंद्र सरकार महाराष्ट्र अस्थिर करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे, मात्र महाराष्ट्र याला बळी पडणार नाही असं पटोले यांनी स्पष्ट केलं

****

मे महिन्याच्या सुट्यांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ-एमटीडीसीने पर्यटकांसाठी विविध सोयी-सवलती जाहीर केल्या आहेत. ऐतिहासिक स्थळं, समुद्रकिनारे, आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक निवासांमध्ये ग्रूप बुकिंगला सवलत, शालेय सहलींना सवलत, तसंच मोफत नाष्टा मिळणार आहे. याशिवाय पर्यटनस्थळांवर लग्नसोहळे, विवाहपूर्व छायाचित्रण, तसंच स्वागत समारंभही आयोजित करता येणार असून याला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं, एमटीडीसीकडून सांगण्यात आलं आहे. या हंगामामध्ये पर्यटकांसाठी अनुभवात्मक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्थानिक कलाकार, पर्यटन उद्योगाशी निगडीत व्यावसायिक यांना प्रोत्साहन मिळेल. योगा आणि वेलनेसची शिबिरंही प्रस्तावित असून स्थानिक सहली, ट्रेक, गडभ्रमंती यासारखे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. विविध छंद, पारंपरिक खेळ, इत्यादी बाबींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. यासाठी एमटीडीसीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग सुरू असल्याची माहिती एमटीडीसीचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली आहे.

****

नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयात ७५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. या वृक्षारोपण मोहिमेला परवा एक मे रोजी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते वृक्षारोपणाने प्रारंभ होईल. विद्यापीठ परिसरात यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते एकाच वेळी ७५० रोपं लावली जाणार आहेत. ही झाडं विशिष्ट पध्दतीने लावली जाणार असून याद्वारे रुची उद्यान, गंध उद्यान, श्रवण उद्यान, दृष्टी उद्यान आणि स्पर्श उद्यान तयार करण्यात येत आहेत. वृक्षांच्या सानिध्यात मानवी शरिरातील पाचही ज्ञानेंद्रिय उल्हासित होतील अशी त्यामागे कल्पना असल्याचं कुलगुरू कानिटकर यांनी सांगितलं. या झाडांची काळजी घेण्यासाठी विविध गट तयार करण्यात आले आहेत, झाडांना नियमित पाणी, सावली मिळावी यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचं, विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे.

****

लातूर जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषि पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यामध्ये लिंबाळवाडी इथले नागनाथ पाटील, मोहनाळचे दिनकर पाटील, महादेववाडीचे  ओमकार मसकल्ले आणि मुरुड बुद्रुक इथले मुरलीधर नागटिळक यांचा समावेश आहे.  राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसंच कृषीउत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या २ मे रोजी नाशिक इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात सन २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

****

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे परवा एक मे रोजी औरंगाबाद इथं नियोजित सभेसाठी उद्या शनिवारी सकाळी पुण्याहून रवाना होणार आहेत. या प्रवासादरम्यान ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन अभिवादन करणार आहेत. मनसे नेते बाबू वागस्कर यांनी ही माहिती दिली. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद इथल्या सभेला पोलिस प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे.

****

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक झाली. पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

औरंगाबाद - रेणीगुंठा ही साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वेगाडी आता तिरुपती रेल्वेस्थानकापर्यंत धावणार आहे. हा बदल सहा मे पासून करण्यात येणार आहे. तिरुपतीला जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे हा बदल करण्यात आला असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात सध्या १५ पूर्णांक ८१ शतांश दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उजनी धरणाच्या वर असलेल्या पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण कोरडे पडले असून पानशेत आणि वरसगाव या धरणातील पाण्याचीही वेगाने घट सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****