आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० एप्रिल २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
नवी दिल्ली इथं राज्यांचे मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयांच्या मुख्य
न्यायाधीशांच्या संयुक्त परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज
झालं. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू, सरन्यायाधीश एन व्ही रमणा यावेळी उपस्थित
होते. सहज आणि सोप्या पद्धतीने न्याय मिळवून देण्याची व्यवस्था विकसित करणं आणि न्याय
प्रणालीसमोर असलेली आव्हानं दूर करण्यासाठी प्रशासन आणि न्यायपालिकेला एकत्र चर्चा
करण्याची संधी देण्याचा या परिषदेचा उद्देश आहे.
****
लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे आज सेवानिवृत्त होत आहेत. लेफ्टनंट
जनरल मनोज पांडे देशाचे २९वे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. देशाच्या लष्करप्रमुखांची
जबाबदारी सांभाळणारे ते कोअर ऑफ इंजिनिअर्समधले पहिले अधिकारी असतील.
****
कोरोना विषाणू संसर्गाची तीव्रता वाढल्यास खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना
प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रा घेण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. मात्र या
वर्धक मात्रेला राज्यातल्या पात्र नागरिकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. संपूर्ण
राज्यात आतापर्यंत ७५ हजार नागरिकांनी ही मात्रा घेतली आहे. मुंबई, पुण्यामध्ये लसीच्या
वर्धक मात्रा घेणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प आहे, तर जालन्यासह १८ जिल्ह्यांमध्ये अद्याप
एकाही नागरिकानं ही मात्रा घेतलेली नाही, असं आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट
होतं.
****
ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या बहुराष्ट्रीय खरेदीच्या संकेतस्थळांना
पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी स्वदेशी विकसित केलेलं इ-कॉमर्स चं नेटवर्क शंभर शहरांमध्ये
सुरू करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल
यांनी काल मुक्त स्त्रोत यंत्रणेची चाचणी करण्याची घोषणा केली.
****
मनिला इथं सुरू असलेल्या आशियाई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरित
भारताच्या पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरित तिनं
चीनच्या हे बीग जिओला २१-९, १३-२१ आणि २१-१९ असं पराभूत केलं.
****
मराठवाड्यात काल केवळ नांदेड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळला. तर एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
****
No comments:
Post a Comment