आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ एप्रिल २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
मशिदीवरील भोंगे
हटवण्याच्या मागणीवरून राज्यात निर्माण झालेल्या वादासंदर्भात तोडगा काढण्यासाठी आज
मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या दीक्षांत समारंभानंतर
वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. गृह विभागाच्या
बळकटीकरणासाठी कुठल्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून, यावर्षीच्या अर्थसंकल्पात
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी, एक हजार २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे, असं पवार
यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रासह
सहा राज्यांच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळलेले माजी राज्यपाल आणि कॉँग्रेसचे
ज्येष्ठ नेते के.शंकरनारायणन यांचं काल केरळमधल्या पालघाट इथं निधन झालं, ते ९० वर्षांचे
होते. महाराष्ट्रातल्या आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी उच्च शिक्षण, मागास
भागांचा विकास आणि आदिवासी विकास या विषयांमध्ये प्रामुख्यानं लक्ष घातलं. त्यांच्या
निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे.
****
केंद्रीय आरोग्य
मंत्री मनसुख मांडवीय यांनी काल नंदुरबारमधल्या सेन्ट्रल किचन प्रकल्पाची पाहणी केली.
केंद्र शासनानं नीती आयोगाच्या माध्यमातून सुरू केलेली ही सेंट्रल किचन योजना आदिवासी
विद्यार्थ्यांना, सकस आणि ताजं अन्न पुरवठा करत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमधलं
कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यास मदत होत असल्याचं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं.
****
खेलो इंडियाच्या
विद्यापीठस्तरीय दुसऱ्या स्पर्धेचं उद्घाटन काल उपराष्ट्रपती एम. व्यकंय्या नायडू यांच्या
हस्ते बंगळुरू इथं झालं. या स्पर्धेत देशभरातली २०० विद्यापीठं सहभागी होत असून, २०
क्रीडा प्रकारांमध्ये चार हजार ५०० खेळाडू भाग घेणार आहेत. या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये
पहिल्यांदाच योगा आणि मल्लखांब या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
****
मराठवाड्यात
काल बीड जिल्ह्यात एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला. औरंगाबाद, नांदेड, जालना, हिंगोली,
लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.
****
No comments:
Post a Comment