Tuesday, 26 April 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.04.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ एप्रिल २०२ सकाळी ११.०० वाजता

****

सरकारच्या अथक प्रयत्नामुळे देशात सर्वांना सहज आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत सातव्या आंतरराष्ट्रीय औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरण परिषदेच्या उद्धाटन सोहळ्यात बोलत होते. रुग्णालयं तसंच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मार्फत सर्वांना पायभूत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करत आहे असं ते म्हणाले. देशाच्या कोविड-19 विरोधी लढ्यात औषध निर्मित कंपन्यांनी दिलेल्या योगदानाचा मांडवीय यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.

****

१४३ वस्तूंवरचे वस्तू आणि सेवा कराचे दर वाढवण्याच्या सूचनेबाबत राज्यांकडून अभिप्राय मागवण्यात आल्याचं वृत्त अर्थ मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे. ही निव्वळ दिशाभूल असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. 

****

संरक्षण क्षेत्रात ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी, संरक्षण संपादन प्रक्रिया-२०२० मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तिन्ही सैन्य दलं आणि भारतीय तटरक्षक दलाच्या आधुनिकीकरणाची गरज लक्षात घेऊन स्वदेशी साहित्याची खरेदी केली जाईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.

****

सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. प्रत्यक्ष उपस्थितीत होत असलेल्या या परीक्षा १५ जून रोजी संपतील. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला होता.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या इथं बाळापूर दूरक्षेत्र डोंगरकडा इथला पोलिस हवालदर भगवान वडकीले याला चार हजार रुपये लाच घेतांना काल अटक करण्यात आली. तक्रारदाराची गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सायकल सोडण्याकरता आवश्यक कागदपत्रं न्यायालयात दाखल करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

खेलो इंडिया स्पर्धेत काल जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी करत, सहा नवीन विक्रम नोंदवले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुभम ध्यायगुडेनं ४०० मीटर फ्री स्टाईलमध्ये, तर शिवाजी विद्यापीठाच्या ऋजुता खाडेने महिलांच्या ५० मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णपदक पटकावलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...