आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जागतिक एड्स दिन आज
पाळला जात आहे. ‘आपली एकता, आपली समानता,
एचआयव्हीसह जगणाऱ्याकरीता’ ही यंदाच्या एड्स दिनाची
संकल्पना आहे.
****
भारत आज औपचारिकरित्या जी - 20 देशांच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारत आहे. या
निमित्तानं देशभरातल्या शंभर
ऐतिहासिक स्मारकांना भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाच्या बोधचिन्हाची रोषणाई, तसंच
विविध कार्यक्रम आयोजित करण्यात
आले आहेत. वसुधैव कुटुंबकम् असा भारताच्या अध्यक्षपदाच्या
कार्यकाळाचा मुख्य विषय आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँक आजपासून प्रायोगिक तत्त्वावर किरकोळ व्यवहारांसाठी त्यांचं डिजिटल
चलन बाजारात आणणार आहे. काही निवडक भागांमध्ये ग्राहक आणि व्यापारी यांच्या
एका मर्यादित समूहासोबत डिजिटल चलनाचा हा प्रयोग होईल.
****
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या
टप्प्यासाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. विधानसभेच्या ८९
जागांसाठी एकूण ७८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्यांदाच
५० टक्के मतदान केंद्रांमधलं वेबकास्टींग होणार आहे.
****
देशात गेल्या काही वर्षात माता मृत्यूदरात झालेली घट ही उल्लेखनीय बाब असून, आरोग्य धोरणाच्या अंमलबजावणीमधील हा मैलाचा दगड आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. २०१८ ते
२० दरम्यान हा दर ९७ झाला
आहे. या संदर्भात स्थिर विकास दर गाठण्यात आठ राज्यांनी यश मिळवलं असून यामध्ये केरळ
सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूनं स्थान पटकावलं आहे.
****
औरंगाबाद शहरात काल गोवरबाधित सहा बालकं आढळून आली. याशिवाय गोवर संशयित सहा बालकंही आढळल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय
अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. त्यामुळे
पालिकेने सतर्क होत प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद शहरात विद्युत खांबांवरून टाकण्यात आलेल्या खासगी केबल्स काढण्याची मोहीम
सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत या मोहिमेत २३ हजार ३७० मीटर लांबीच्या केबल्स काढून जप्त करण्यात आल्या. या मोहिमेनंतर पुन्हा नव्याने केबल्स विद्युत खांबांवर टाकल्यास संबंधितांवर
थेट गुन्हे दाखल होणार आहेत.
//*********//
No comments:
Post a Comment