Wednesday, 28 December 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.12.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ डिसेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशातला ८० टक्के भूभाग पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये फाईव्ह जी सेवांद्वारे व्यापला जाईल, असं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. आकाशवाणीला दिलेल्या एका मुलाखतीत, फाईव्ह जी सेवा पुढील वर्षात उपलब्ध करुन दिल्या जातील असा विश्वास व्यक्त केला. 

****

कोविड-19 वरील नाकावाटे घ्यावयाची इन्कोवॅक ही लस सर्वसामान्य लोकांना जानेवारीच्या चौथ्या आठवड्यापासून उपलब्ध होईल, असं भारत बायोटेक या कंपनीनं सांगितलं आहे. खासगी बाजारात या लसीची किंमत ८०० रुपये, तर सरकारी रुग्णालयांसाठी ३२५ रुपये राहील असं हैदराबाद-स्थित या कंपनीनं म्हटलं आहे. 

****

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेनं जोखीमेवर आधारित औषध निर्मात्या घटकांची संयुक्त तपासणी राज्यांच्या औषध नियंत्रण प्रशासनासोबत करण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या निर्देशानुसार ही तपासणी देशभरात करण्यात येत आहे.

****

राज्यातल्या इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यासाठी, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शासनाकडून मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं. त्यामुळे केंद्र सरकारने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती फक्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईने दहावी तसंच बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा दोन जानेवारी ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहेत.

****

राज्यभरात विभागीय कार्यालय पातळीवर कृत्रिम उपग्रह केंद्र उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठानं घेतला आहे. त्यानुसार नाशिकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात हे केंद्र उभारलं जाणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर सांगितलं. विद्यापीठ यापुढे औद्योगिक संस्थांसोबत अभ्यासक्रम तयार करणार आहे.

****

No comments: