Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 December 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
देशाला प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून
मुक्त होणं आवश्यक; पहिल्या वीर बाल दिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन.
·
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर विधीमंडळात विरोधक आक्रमक;
राज्य सरकार उद्या ठराव मांडणार.
·
व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना सीबीआयकडून
अटक.
आणि
·
कचनेर इथून पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणारी टोळी
जेरबंद.
****
देशाला
प्रगतीच्या मार्गावरुन पुढं न्यायचं असेल तर मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक
असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद
स्टेडियमवर आयोजित पहिल्या वीर बाल दिवस समारंभात ते बोलत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या
४ पुत्रांच्या बलिदानाचा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय
केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं
सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
साथियों
भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो अतीत से प्रेरणा
ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज
की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है।
दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया
जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल
दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक
पुरानी भूल को सुधार रहा है।
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे या कायर्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध
मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले –
क्रांतीकारियों
के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली
तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा
रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद
सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे।
इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती
शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले
पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
दरम्यान,
मुख्यमंत्री आज दिल्लीत असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर सरकारकडून ठराव
मांडण्यात आला नाही. विधीमंडळाच्या दोन्ही सदनात हा मुद्दा गाजला. विधानपरिषदेत विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनी ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला,
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश
हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या
मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले
–
हा
जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे.
माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण
असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड
भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं
आज कर्नाटक सरकार, तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय,
मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या,
काठ्या खायच्या?
विधानसभेतही
विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून,
सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी करत, सरकारने ठोस
भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. ते म्हणाले –
उपमुख्यमंत्री
महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहात. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी
कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये
गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत
आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक
लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
महाराष्ट्राची
एक इंचही जमीन कोणाला देणार नसल्याचं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर उद्या प्रस्ताव मांडणार असल्याचं सांगितलं. अधिवेशनात
आजचं काम सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी
विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी
मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त
विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं.
****
राज्याचे
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा
झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं
केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला,
मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार
यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान
परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
आय
सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे
अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय
सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक
कोचर यांना अटक केली होती. व्हिडीओकॉन उद्योगसमूहाला २०१२ मधे सुमारे तीन हजार कोटी
रुपयांचं कर्ज देताना अनियमितता झाल्याच्या आरोपांविषयी सीबीआय ही चौकशी करत आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात
आली आहे. सदरील आरोपी मध्य प्रदेशातील असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या
आरोपींकडून मुर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये
किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
राज्यातील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन ४०
रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा
यांनी विधान परिषदेत आज ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात
येईल असंही त्यांनी सांगितलं. १९८२ पासून विद्यार्थ्यांना ४० रुपये विद्यावेतन मिळत
असून विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्नही सरकार करत असल्याची माहिती
त्यांनी यावेळी दिली.
****
ग्रामविकास
विभागातील १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश
महाजन यांनी आज विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही महाजन
यावेळी म्हणाले. नांदेड जिल्ह्यात हंगरगा आणि दापका या दोन गावच्या ग्रामपंचायतींमध्ये
भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलं होतं, या विरोधात आंदोलन करणाऱ्या
४० ग्रामसेवकांचं निलंबन केल्यासंदर्भात सदस्य राजेश पवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी
सूचनेला महाजन उत्तर देत होते.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील मुरूम उपसा प्रकरणी एका महिन्याच्या
आत चौकशी करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत
ही माहिती दिली. सदस्य हरिभाऊ बागडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला विखे पाटील
उत्तर देत होते.
जळगाव
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात एका टेकडीची संपूर्ण खोदाई करून ती भुईसपाट केल्याप्रकरणी
विशेष चौकशी समिती -एस आय टी नेमून चौकशी केली जाईल अशी घोषणा विखे पाटील यांनी केली.
मंदा खडसे यांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप चंद्रकांत निंबा पाटील यांनी यासंदर्भातील
लक्षवेधी सूचनेवर केला होता. सर्व प्रकारचे नियम उल्लंघन करून याबाबतच्या सर्व परवानग्या
देण्यात आल्या आणि सुमारे चारशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाटील यांनी केला.
****
No comments:
Post a Comment