आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू आणि काश्मीर
या केंद्रशासित प्रदेशातल्या सुरक्षेशी संबंधित विविध बाबींचा आढावा केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांनी काल घेतला. नवी दिल्लीत आयोजित या बैठकीत शहा यांनी, दहशतवादाविरोधात
आवश्यक सर्व कठोर कारवाई करण्याचे नि र्देश दिले.
****
शिखांचे दहावे
गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना
अभिवादन केलं आहे. गुरु गोविंद सिंग यांची मानवतेची सेवा तसंच अतुलनीय शौर्य अनेक पिढ्यांना
प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळावर घेण्यात आलेल्या चाचणीत काल परदेशातून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित आढळून
आले. या चाचणीतील दोन्ही नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं आरोग्य विभागानं
सांगितलं आहे.
****
आंध्र प्रदेशात
कंदुकुरु नेल्लोर जिल्ह्यात तेलुगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या पदफेरीदरम्यान
काल संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत सात जण ठार आणि पाच जण गंभीर जखमी झाले. टीडीपीच्या
तीन कार्यकर्त्यांचा उघड्या नाल्यात पडून मृत्यू झाला तर अन्य चार जण चिरडून ठार झाले.
****
टपाल विभागानं
ग्रामीण टपाल सेवकांसाठी ऑनलाइन विनंती हस्तांतरण पोर्टल सुरू केलं आहे. टपाल सेवेचे
महासंचालक आलोक शर्मा यांनी दूरस्थ पद्धतीने काल याचं उद्घाटन केलं. याद्वारे अर्ज
मागवणं, मंजुरी देणं आणि बदलीचे आदेश जारी करणं अशा प्रक्रिया आता कागदविरहित करता
येईल.
****
लष्करात भरती
होण्यासठी उमेदवारांकडून दोन हजार रुपयांची मागणी करणाऱ्या राजस्थानातल्या एका माहिती
तंत्रज्ञान संस्थेवर कारवाई करण्यात आली आहे. या वर्षी मे महिन्यात ३२ जागांच्या भरती
प्रक्रियेसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या या संस्थेनं भरतीसाठी दोन हजार रुपयांची मागणी
करणारा व्हिडिओ यूट्यूब वर प्रसारित केला होता.
****
औरंगाबाद शहरातले
ज्येष्ठ आयुर्वेदमहर्षी वैद्य सुहास खर्डीकर यांचं काल वृद्धापकाळाने निधन झालं, ते
८३ वर्षांचे होते. खर्डीकर यांनी आयुर्वेद जीवनपद्धती जिवंत ठेवणं, नवीन वैद्य घडवणं,
शिष्य घडवणं, शिबिरांद्वारे आयुर्वेद प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं.
****
No comments:
Post a Comment