आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ जून २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
भारत आणि अमेरिकेला
विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी कुशल प्रतिभावंतांची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ही आवश्यकता व्यक्त केली.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यात वाशिंग्टन डीसी इथं व्हाईट हाउसमध्ये अमेरिकेचे
राष्ट्रपती जो बायडन यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी अमेरिकेतल्या प्रमुख उद्योगांच्या
कार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये आज भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय चर्चा होणार
आहे. पंतप्रधान आज अमेरिकेच्या संसदेमध्ये मार्गदर्शनही करणार आहेत.
****
जी-२०मधील श्रम
कार्य समुहाची दोन दिवसीय बैठक आज सुरू होत आहे. बिहारची राजधानी पाटणा इथं ही बैठक
होत आहे.
****
गृहमंत्री अमित
शाह यांनी मणिपूरच्या स्थितीवर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. परवा- शनिवारी
नवी दिल्लीमध्ये ही बैठक होईल.
****
मराठवाड्यात
उद्या आणि परवा अनेक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते
मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला
आहे. उद्यापासून एकोणतीस जून या कालावधीत मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची
शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात
त्र्यंबकेश्वर जवळ असलेल्या चिखलवाडी इथल्या आदिवासी वसतीगृहातील मुलींना पर्यटकांसमोर
सक्तीनं नृत्य करायला भाग पाडण्यात आल्या प्रकरणी सविस्तर चौकशी कली जाणार आहे. जिल्ह्याचे
पालकमंत्री दादा भुसे यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली.
****
ताईपेई खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये आज तृतीय मानांकित
भारताच्या एच. एस. प्रणॉयचा सामना इंडोनेशियाच्या टोमी सुगियार्तोविरुद्ध होणार आहे.
पी. कश्यप आणि तानया हेमनाथ आज उपउपांत्य फेरीचे सामने खेळणार आहेत.
****
अकोला शहरात
ई कचरा संकलन अभियान राबवण्यात येत आहे.
****
No comments:
Post a Comment