आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ जून २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
अमेरिकेच्या
तीन दिवसांच्या दौर्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, आज इजिप्तला रवाना झाले. तत्पूर्वी
पंतप्रधानांनी, अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथल्या रोनाल्ड रेगन केंद्रात, भारतीय समुदायाशी
संवाद साधला. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा
असलेला, एच-वन बी व्हिसाचा प्रश्न मार्गी लागला असून, आता त्याचं नुतनीकरण अमेरिकेतही
करता येणार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. अमेरिकेचे नवीन दूतावास, आता बंगळूरू आणि
अहमदाबाद इथंही सुरू होणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
गेल्या वर्षीच्या
तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात, कडधान्यं आणि भरडधान्याचं पेरणी क्षेत्र वाढलं आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयानं, खरीप पिकांसाठीच्या पेरणी क्षेत्राच्या वाढीबद्दलची आकडेवारी
जाहीर केली. तांदळाचं पेरणीक्षेत्र घटलं असून, ते १६ लाख हेक्टरवरून ११ लाख हेक्टर
झालं आहे.
****
राज्य शासनाने
वारकऱ्यांसाठी नुकतीच जाहीर केलेली, ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ राबवण्याकरता
विमा हप्ता भरण्यासाठी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
या कंपनीस विमा हप्त्यापोटी, दोन कोटी ७० लाख रुपये अदा करण्यास मान्यता देण्याचा शासन
निर्णय, महसूल आणि वन विभागानं जारी केला आहे.
****
जर्मनीत सुरु
असलेल्या विशेष ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत, भारतानं काल विविध प्रकारात २१ पदकं मिळवली.
ज्युदोमधे भारतीय खेळाडुंनी आतापर्यंत २६ सुवर्ण, ३० रौप्य आणि २० कांस्य पदकं जिंकली
आहेत. लेव्हल वन गोल्फ स्पर्धेत तीन, तसंच पॉवरलिफ्टिंग मध्ये भारतानं चार सुवर्ण,
तर रोलर स्केटिंग प्रकारात भारतीय चमूनं १७ पदकं मिळवली आहेत.
****
तैपेई खुल्या
बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत भारताच्या एच एस प्रणॉयला हाँगकाँगच्या
खेळाडुकडून १९-२१, आठ - २१ असा पराभव पत्करावा लागला.
****
No comments:
Post a Comment