आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७
जूलै २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
राष्ट्रीय
चाचणी संस्था अर्थात एनटीएनं काल राष्ट्रीय पात्रता तथा प्रवेश परीक्षा अर्थात नीट
युजी परीक्षेच्या अंतिम गुणपत्रिका प्रसिद्ध केल्या आहेत. नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना
एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल आणि गुणपत्रिका पाहता येतील. या परीक्षेत
१७ उमेदवारांनी पहिला क्रमांक पटकावला असल्याची माहिती एनटीएनं दिली. यावर्षी ५ मे
रोजी देशातील ५७१ शहरांमधील ४ हजार ७५० हुन अधिक केंद्रांवर झालेल्या या परीक्षेला
२४ लाखांच्यावर विद्यार्थी बसले होते. परीक्षेवेळी ज्या १ हजार ५६३ विद्यार्थ्यांचा
वेळ वाया गेला होता, त्यांची
२३ जूनला फेरपरीक्षा घेण्यात आली.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपल्या आकाशवाणी वरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून उद्या सकाळी ११
वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. हा ‘मन
की बात’ चा ११२ वा भाग आहे.
****
नवी
मुंबईतल्या सेक्टर १९ इंथल्या शहाबाज गावातली चार मजली इंदिरा निवास ही इमारत आज पहाटे
पावणेपाचच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्यात
अग्निशमन दलाला यश आलं आहे. या दोघांना वाशी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे तर एका व्यक्तीचा शोध सुरू आहे. एनडीआरएफची
तुकडी घटनास्थळी हजर असून शोधकार्य सुरू आहे. या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडवणीस यांनी दिले आहेत.
****
छत्रपती
संभाजी नगर महानगरपालिकेनं किटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी मॉस्क्यूटो अबेटमेंट
समिती स्थापन केली आहे. डास उत्पत्ती शून्यावर आणणं हा या समितीच्या स्थापनेचा मुख्य
उद्देश आहे.
****
गेल्या
काही दिवसांत झालेल्या पावसामुळे बीड, लातूर आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात ४७ दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. अंबाजोगाई
लगतचा काळवटी तलावही पूर्ण क्षमतेनं भरला आहे.
****
No comments:
Post a Comment