Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 July 2024
Time: 01.00 to
01.05 PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ जूलै २०२४ दुपारी १.०० वा.
****
देशात बेरोजगारीचा दर तीन पूर्णांक दोन दशांश टक्के झाली
असून, रोजगाराची टंचाई नसल्याचं, केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं
आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या
विविध योजनांच्या माध्यमातून पुढच्या पाच वर्षांत चार कोटी रोजगार निर्मिती होणार असून, येत्या काहा वर्षांत बेरोजगारीचा दर तीन टक्क्यांपेक्षा
कमी होईल, असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त
केला आहे.
****
भूजलाच्या अमर्याद उपशाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारांनी
नियम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी, असं केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं आहे.
ते आज राज्यसभेत बोलत होते. सदार मेधा कुलकर्णी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. जलशक्ती
मंत्रालयाकडूनही पर्ज्यन जलपुनर्भरण योजनेत मोठ्या प्रमाणावर काम केल्याचं, पाटील यांनी सांगितलं. मुळा मुठा नदी विकासाचा मुद्दाही
कुलकर्णी यांची उपस्थित केला. मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित असलेल्या या योजनेचं
आतापर्यंत ४० टक्के काम पूर्ण झाल्याचं, पाटील यांनी सांगितलं.
मराठवाड्यातल्या पाणी टंचाई निवारणासंदर्भात मराठवाडा
वॉटर ग्रीड योजनेचर माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे सादर केल्याचं पाटील यांनी
सांगितलं. खासदार डॉ भागवत कराड यांनी मराठवाड्यातल्या पाणी टंचाईकडे सदनाचं लक्ष वेधलं.
त्याच्या उत्तरात पाटील बोलत होते.
खासदार संजय राऊत यांनी या चर्चेत सहभागी होत, राज्यात सध्याच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुराच्या
अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाचा मुद्दा उपस्थित केला.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं
अजित पवार गटाला नोटीस जारी केली आहे. पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात
शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं ही
नोटीस जारी केली.
****
प्रसिद्ध शल्यविशारद, शिक्षणतज्ज्ञ आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहलता देशमुख यांचं आज
मुंबई इथं निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांनी गर्भसंस्कार, नवजात शिशू आणि माता यांचा आहार या विषयांवरील त्यांचे
ग्रंथलेखन प्रसिद्ध आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू तसंच लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या
अधिष्ठाता, टिळक विद्यालय संस्थेच्या संचालक
मंडळ विश्वस्त म्हणुनही त्यांनी कार्य केले. त्यांना ‘डॉ. बी.सी. रॉय पुरस्कार’, ‘धन्वंतरी पुरस्कार’ सन्मानित करण्यात आलं होतं.
****
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज
योजना - २०२४ शासनाने लागू केली आहे. त्यामुळे आता साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या शेतीपंपाचा
वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. या योजनेचा ३ वर्षांत आढावा घेऊन
पुढील निर्णय घेण्यात येईल, असं या संदर्भातल्या शासन निर्णयात म्हटलं आहे. या योजनेमुळे, सध्या देण्यात येणारे वीज दर सवलतीचे ६ हजार ९८५ कोटी
रुपये तसेच वीज दर माफीनुसार ७ हजार ७७५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे एकूण
१४ हजार ७६० कोटी रुपयांची वीज दर माफी राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली जात आहे.
****
यवतमाळसह अनेक जिल्ह्यात एका नामांकित कंपनीच्या खाद्यतेलाचा
होलोग्राम आणि लेबल वापरून बनावट तेलाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
आला आहे. कंपनीने केलेल्या तक्रारीवरून स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ इथल्या अनेक दुकानांमध्ये
धाडी घातल्या. या धाडीत पोलिसांनी बनावट तेलाचे १५ लिटरचे ६४ कॅन जप्त केल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त
नागपूर इथं घोषवाक्य आणि भित्तीपत्रक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वनसंरक्षक
भरतसिंह हाडा यांनी वाघाचे संवर्धन म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेचे संवर्धन असल्याचं सांगितलं.
रोटरी क्लब आणि आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटीतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्पर्धेतल्या विजेत्यांना हाडा यांच्या हस्ते
बक्षिस वाटप करण्यात आले.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज नेमबाजीत १० मीटर एयर रायफल प्रकारात
भारताची रमिता जिंदाल अंतिम फेरीत खेळत आहे. पुरुषांच्या १० मीटर एयर रायफल प्रकारातही
अर्जुन बबुता आज अंतिम फेरीत खेळणार असून, दुपारी साडे तीन वाजता या फेरीला सुरुवात होईल.
हॉकीमध्ये भारतीय पुरुष संघाचा सामना आज अर्जेंटिना सोबत
होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सव्वा चार वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना आज बेल्जियमच्या
खेळाडुसोबत होणार आहे.
तिरंदाजीच्या उपान्त्यपूर्व फेरीत आज धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप रॉय, आणि प्रवीण जाधव खेळणार आहेत.
****
No comments:
Post a Comment