Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 July
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ जूलै २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची
व्याप्ती वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
· राज्यात ८१ हजार १३७ कोटी
रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मान्यता, छत्रपती संभाजीनगर इथं इलेक्ट्रीक वाहन निर्मितीचा प्रकल्प उभारणार
· मराठवाड्यातल्या खालसा झालेल्या
वर्ग दोनच्या इनामी आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये आणण्याचा निर्णय
· आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या
दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास, तसंच नांदेडच्या श्री गुरुजी
रुग्णालयास शासकीय भाग भांडवल देण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
आणि
·
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनु भाकर आणि सरबजोत सिंग
जोडीला कांस्यपदक
सविस्तर बातम्या
मुख्यमंत्री
अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे, याअंतर्गत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र
लाभार्थी महिलेच्या कुटुंबाला, तसंच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या
राज्यातल्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना, घरगुती वापराच्या वार्षिक तीन गॅस सिलिंडरचं पुनर्भरण
मोफत करून दिलं जाणार आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेचा
लाभ मिळण्यासाठी सदर गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणं आवश्यक आहे. एका कुटुंबात फक्त
एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल, तसंच फक्त १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी
असलेल्या गॅसधारकांना हा लाभ लागू असेल असं शासन निर्णयात नमूद करण्यात आलं आहे.
****
राज्यात
८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या सात प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या
बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार
असून, सुमारे
२० हजार जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लिमिटेड
कंपनीचा, इलेक्ट्रीक
आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणारा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर
इथं होणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण २७ हजार २०० कोटी एवढी गुंतवणूक होणार असून, पाच हजार २०० पेक्षा अधिक
रोजगार निर्मिती होणार आहे.
****
मराठवाड्यातल्या
खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनामी आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग एक मध्ये आणण्याचा
निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या जमिनी मूळ मालकाला मिळणार असल्यानं
गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. यासंदर्भातला प्रस्ताव तातडीने
मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात यावा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले. या निर्णयामुळे छत्रपती
संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये
जवळपास ५५ हजार हेक्टर जमिनी खुल्या होणार आहेत.
****
विविध
विभागांची वसतीगृहं, तसंच आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात
भरीव वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. विविध विभागांमार्फत सुरु
असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित संस्थांमधलं अनुदान आता प्रति विद्यार्थी
दरमहा दीड हजार रुपयांवरून बावीसशे रुपये, तर एड्सग्रस्त आणि मतिमंद निवासी विद्यार्थ्यांना
देण्यात येणारं अनुदान सोळाशे पन्नास रुपयांवरून चोवीसशे पन्नास करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नांदेड इथल्या श्री गुरुजी रुग्णालयास विशेष बाब
म्हणून शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. आदिवासी सहकारी
सूत गिरण्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज, नव तेजस्विनी-ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला एक
वर्ष मुदतवाढ, आयुर्मान
पूर्ण झालेल्या जलविद्युत प्रकल्पांचं नूतनीकरण तसंच आधुनिकीकरण, यंत्रमाग सहकारी संस्थांना
अर्थसहाय्य, आदिम
जमातीतल्या कुटुंबांसाठी आवास योजना, आदी निर्णयांनाही कालच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मान्यता
देण्यात आली.
****
लुब्रिझोल
इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन औद्योगिक क्षेत्रात, आधुनिक वंगण आणि इंधन मिश्रीत
उत्पादन प्रकल्प उभारला जाणार आहे. लुब्रिझोल कंपनी ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक वंगणासाठीच्या
मिश्रीत प्रणाली क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. सुमारे दोन हजार कोटी गुंतवणुकीच्या
या प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागण्याबरोबरच ९०० जणांना रोजगार उपलब्ध
होईल, असा
विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सामंत यांच्या हस्ते बिडकीन परिसरातील
१२० एकर जागेचे वाटप पत्र लुब्रिझोल कंपनीस सुपूर्द करण्यात आले.
****
केंद्र
सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात तोडगा काढत असेल तर आमच्या पक्षाचा पाठिंबा
असेल, असं
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यापूर्वी काल मराठा आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या
आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत त्यांनी
भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
****
मराठा
समाजातल्या गरीबांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवाव्यात, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे
अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं आरक्षण बचाव यात्रेसाठी आले
असता, पत्रकारांशी
बोलत होते. लातूरहून काल ही यात्रा बीड जिल्ह्याकडे रवाना झाली.
****
मावळते
राज्यपाल रमेश बैस यांना काल मुंबईत राजभवनात निरोप देण्यात आला. नौदलातर्फे राज्यपालांना
मानवंदना देण्यात आली. राज्याचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना आज सायंकाळी
राजभवनात पदाची शपथ दिली जाणार आहे.
****
रायगड
जिल्ह्यातल्या उरण इथल्या यशश्री शिंदे हत्याप्रकरणी, मुख्य आरोपी दाऊद शेख याला काल कर्नाटकातल्या अल्लर
गावातून अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली
आहे, मात्र
चौकशी अद्याप पूर्ण झाली नसल्यानं हत्या का केली याबद्दल कोणताही निष्कर्ष काढता येणार
नाही असं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
भारतीय
नेमबाज मनु भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीनं पॅरिस ऑलिपिंकमधे १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात
मिश्र दुहेरी गटातं कांस्य पदक पटकावलं आहे. त्यांनी दक्षिण कोरियाच्या संघाचा १६
-१० असा पराभव केला. मनू भाकरचं यंदाच्या ऑलिम्पिकमधलं हे दुसरं पदक असून, अशी कामगिरी करणारी ती पहिलीच
भारतीय स्पर्धक ठरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी या यशाबद्दल दोन्ही
नेमबाजांचं अभिनंदन केलं आहे.
या
स्पर्धेत काल हॉकीमध्ये भारतीय संघाने आयर्लंडचा दोन - शून्य असा पराभव केला.
नौकानयन
प्रकारात बलराज पवारने उपांत्यफेरीत तर बॅडमिंटनमध्ये चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज
जोडीने इंडोनेशियाई जोडीला हरवत, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तीरंदाजीमध्ये भारताच्या
भजन कौरने उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रानं फ्रान्सच्या
खेळाडुचा पराभव करत उप - उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला, अशी कामगिरी करणारी ती पहिली
महिला भारतीय खेळाडू ठरली आहे.
****
श्रीलंकेविरुद्ध
तीन टी - ट्वेंटी सामन्यांची मालिका भारताने तीन - शून्य अशी जिंकली आहे. काल पल्लेकेले
इथं झालेल्या मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा सुपर ओवरमध्ये
पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने निर्धारित षटकात १३६ धावा केल्या. श्रीलंकेनं
देखील २० षटकात १३६ धावा केल्यानं सुपर ओवर खेळवण्यात आली. या ओवरमध्ये श्रीलंकेचा
संघ केवळ दोन धावा करु शकला, तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं पहिल्याच चेंडुवर
चौकार मारुन सामना जिंकला.
****
लातूरमध्ये
भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
पक्षाची संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस लातूर, नांदेड, बीड, आणि धाराशिव जिल्ह्यातले पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी तसंच कर्यकर्ते
उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजना, अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी या जनमानसात पोहचवाव्यात
असंही या बैठकीत सुचवण्यात आलं.
****
वस्त्रोद्योग
आयुक्तालयाने घेतलेल्या राज्यस्तरीय "वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजने" चा
निकाल काल जाहीर करण्यात आला. विविध पाच प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. पैठणी साडी
वाणात छत्रपती संभाजीनगर इथले गिराम तालेब कबीर यांनी तयार केलेल्या ब्रोकेड पैठणी
साडीने पहिला क्रमांक पटकावला, हिमरु शाल वाणात छत्रपती संभाजीनगर इथले ईब्रान अहमद कुरेशी
यांनी पहिला तर फैसल इस्तीयाक कुरेशी यांनी दुसरा क्रमांक पटकावला.
****
सहकार
चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यंदाचा
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक
डॉ.प्रेमानंद गज्वी यांना जाहीर झाला आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
डॉ.समीर चव्हाण यांना, तर राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार- प्रफुल्ल
शिलेदार यांना जाहीर
झाला आहे. येत्या नारळी पौर्णिमेला अहमदनगर इथं या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या एका रुग्णालयातला जैविक कचरा उघड्यावर टाकल्या प्रकरणी, महानगरपालिकेनं २५ हजार
रुपये दंड ठोठावला आहे. मनपा उप आयुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख रविंद्र
जोगदंड यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.
****
आष्टी-नगर-पुणे-मुंबई
अशी रेल्वे शटल एक्स्प्रेस सेवा तातडीने सुरु करावी अशी मागणी युवासेनेचे राज्य सहसचिव
विक्रम राठोड यांनी केली आहे. याबाबतचं निवेदन त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
यांना पाठवलं असून, त्याची प्रत पाठपुराव्यासाठी खासदार निलेश लंके यांना
सादर केली आहे.
****
मध्य
रेल्वेच्या दौंड रेल्वे स्थानकावरील लाईन ब्लॉक मुळे पंढरपूर-निजामाबाद गाडी आज रद्द
करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment