Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29
August 2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
जम्मू
काश्मीरमध्ये दोन वेगवगेळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त
आहे. कुपवाडा इथं दोन, तर
तंगधार इथं एक दहशतवादी मारला गेला असून, अद्याप चकमक सुरु असल्याचं सुरक्षा दलानं सांगीतलं
आहे.
****
हॉकीपटू
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे.
केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या
मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर असलेल्या ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण
करून अभिवादन केलं. सर्व नागरीकांनी त्यांच्या व्यस्त वेळअपत्रकातून एक तास काढून, आपल्या आवडीचा एक खेळ खेळावा, असं आवाहन मांडवीय यांनी केलं आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी क्रिडा दिनानिमित्त समाजमाध्यमांवर दिलेल्या संदेशात, मेजर ध्यानचंद यांना अभिवादन केलं आहे. खेळाबद्दल आत्मियता असलेल्या
आणि खेळात देशाचं नाव उंचावलेल्या सर्वांचं कौतुक करण्याचा हा दिवस असल्याचं ते म्हणाले.
खेळाला समर्थन देऊन अधिकाधिक युवकांना खेळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कटीबद्ध
असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
****
४४
व्या ‘प्रगती’ बैठकीत महाराष्ट्रासह ११ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ७६ हजार
५०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सात प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. नवी
दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली.
****
देशभरातल्या
शिक्षण पद्धतीत अमूलाग्र सुधारणांच्या दृष्टीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला प्रतिसाद
मिळत असल्याचं, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पहिल्या पदवीप्रदान
समारंभात बोलत होते. बाजारपेठेतल्या गरजा, मागणीशी सुसंगता असणारा अभ्यासक्रम असणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले. या कार्यक्रमात २४६ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी, तर उत्कृष्ट कामगिरीसाठी नऊ पदवीधर विद्यार्थांना सुवर्ण पदक
प्रदान करण्यात आलं.
****
भारत
आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत
भारत विकसित करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्याला साडेतेराच्या आर्थिक विकास
दरानं पुढे जावं लागेल. यामुळे आपण केवळ आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही, तर आपल्या सर्व समस्याही दूर होतील, असं ते म्हणाले.
****
काँग्रेसच्या
निवड समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्री हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर
असून, त्यांनी काल राज्यातल्या वरिष्ठ
नेत्यांशी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा केली. या बैठकीला काँग्रेस
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ
पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
****
नोंदणीकृत
बांधकाम कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य विषयक लाभ देण्यासाठी असलेल्या विविध योजनांचा
लाभ घेण्याचं आवाहन, रत्नागिरीचे
पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. कामगार विभाग आणि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम
कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीनं काल रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना
अत्यावश्यक संच, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तूंचं
वाटप सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
****
आदिवासी
क्षेत्रातल्या म्हणजेच पेसा क्षेत्रातल्या भरतीसाठी नाशिकसह राज्यातल्या शेकडो आदिवासींनी
काल नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढला. आदिवासी भरती होणार नाही तोपर्यंत
आंदोलनं सुरुच राहतील असा इशारा यावेळी देण्यात आला. पंचवटीतील तपोवन इथून जिल्हाधिकारी
कार्यालय आणि तेथून आदिवासी आयुक्त कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मेार्चात तरुण
मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या अपर तहसील कार्यालयाने काल शहरानजिक मौजे देवळाई परिसरात गौण खनिजाचं
अनधिकृत उत्खनन आणि वाहतुक करणारी अकरा वाहनं जप्त केली. या वाहनांमध्ये ५ पोकलेन आणि
६ हायवा ट्रकचा समावेश असून, ही
सर्व वाहनं तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आली आहेत.
****
ब्राझीलच्या
रिओ दि जानेरिओ इथं झालेल्या १७ व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी ऑलिम्पियाड
स्पर्धेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई केली. बंगळुरूच्या
दक्ष तयालियानं सुवर्ण पदक जिंकलं, तर
पुण्याच्या आयुष कुठारी आणि सानिध्य सराफ, हैदराबादच्या बनिब्रता माजी आणि बिहारच्या पाणिनी, या विद्यार्थ्यांनी रौप्यपदकं जिंकली.
****
पॅरिस
पॅरालिम्पिक स्पर्धेचं काल उद्घाटन झालं. या समारंभात भालाफेकपटू सुमित अंतिल आणि गोळाफेकपटू
भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत २४ भारतीय खेळाडू विविध १२ प्रकारात
खेळणार आहेत.
****
No comments:
Post a Comment