Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 August
2024
Time: 7.10
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· आशिया खंडातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराचं पंतप्रधानांच्या
हस्ते भूमिपूजन-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी क्षमायाचना
· देशातून पेट्रोल-डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय
मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून व्यक्त
· यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी मूर्तींवर बंदी नाही मात्र
धोरणात्मक निर्णय घेण्याचे न्यायालयाचे प्रशासनाला निर्देश
· जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये
प्रवेश
आणि
· पॅरिस पॅरालम्पिक स्पर्धेत भारताला काल चार पदकं-नेमबाज
अवनी लेखराचा सुवर्णवेध
सविस्तर बातम्या
केंद्रातील
एनडीए सरकार तसंच राज्यातील महायुती सरकार महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध
असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पालघर जिल्ह्यात वाढवण
इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बंदराचं, पंतप्रधानांच्या हस्ते काल
भूमिपूजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी
सर्वप्रथम, सिंधुदूर्ग
जिल्ह्यात राजकोट इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणी शिवाजी महाराजांच्या
चरणी नतमस्तक होत क्षमा मागितली.
वाढवण
हे आशिया खंडातलं हे सर्वात मोठं बंदर असेल या बंदरामुळे किमान १२ लाख रोजगाराच्या
संधी निर्माण होतील, रायगड जिल्ह्यात नव्यानं विकसित होणारं दिघी औद्योगिक क्षेत्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नांचं प्रतीक ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात
विविध क्षेत्रात महिला करत असलेल्या नेतृत्वाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
दरम्यान, मुंबईतल्या जिओ कन्व्हेंशन
सेंटरमध्ये काल ग्लोबल फिन्टेक फेस्टचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, जगभरातले जवळपास पन्नास
टक्क्यांहून अधिक डिजिटल व्यवहार भारतात होत असून, भारताचं युपीआय हे ॲप, फिन्टेकचं जगभरातलं उत्तम
उदाहरण असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. फिन्टेक अर्थात वित्तीय तंत्रज्ञानामुळे
भ्रष्टाचाराला आळा बसला, तसंच ग्रामीण आणि शहरी भागातली दरी कमी झाल्याचं पंतप्रधानांनी
सांगितलं.
****
छत्रपती
शिवाजी महाराजांच्या पुतळा दुघर्टनेसंदर्भात माफी नसते, मात्र ही माफी मागण्यासाठी सुद्धा बराच उशीर झाल्याची
टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. खासदार संजय राऊत
यांनीही काल मालवण इथं संबंधित परिसराला भेट देऊन पाहणी केली, हे सरकार पुतळा कोसळण्याचं
खापर नौदलावर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचं काम करत असल्याची टीका राऊत यांनी यावेळी
केली.
दरम्यान, पुतळा दुर्घटना प्रकरणी
पोलिसांनी चेतन पाटील याला अटक केली आहे. हा पुतळा करण्याचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स
आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून चेतन पाटील काम पाहात होता. या कंपनीचा मालक आणि
संबंधित पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार आहे.
दरम्यान, राजकोट इथं राज्य शासन आणि
नौदलाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात नांदगाव इथे उभारण्यात आलेल्या भव्य शिवसृष्टीचं
लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
****
sदेशातून
पेट्रोल आणि डिझेलचा वापर संपवण्याचा संकल्प केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी
व्यक्त केला आहे. ते काल अमरावती इथं एका वाहन चालक प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन
सोहळ्यात बोलत होते. चालकानं दिवसभरात फक्त आठ तास वाहन चालवण्यासंबंधी नियम लवकरच
करणार असल्याचंही गडकरी यांनी सांगितलं.
****
वक्फ
घटनादुरुस्ती विधेयक २०२४ च्या अभ्यासाकरता नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची काल नवी
दिल्लीत बैठक झाली. यामध्ये मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायुतुल उलेमा संघटनेच्या
प्रतिनिधींनी आपलं म्हणणं मांडल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
यंदाच्या
गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तींवरची बंदी तुर्तास टळली आहे. या संदर्भातल्या
याचिकेवर काल मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती
अमित बोरकर यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. गणेशोत्सव अवघा काही दिवसांवर आल्यामुळे
यंदा पीओपी मूर्तींवर बंदी घालता येणार नाही. मात्र, राज्य सरकारनं केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या २०२० च्या
मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिले. गणेश मूर्तींसंदर्भात
पीओपी बंदीचं पालन करण्यासाठी कोणती पावलं उचलली आहेत, त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावं, असे आदेश न्यायालयानं राज्य
सरकारसह सर्व महानगरपालिकांना दिले आहेत. सरकारनं याबाबत वेळीच धोरणात्मक निर्णय घ्यावेत, असंही न्यायालयानं म्हटलं
आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा
सदस्यत्वाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांच्याकडे त्यांनी काल राजीनामा सोपवला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अंतापूरकर यांचं स्वागत केलं.
****
पॅरिस
पॅरालम्पिक स्पर्धेत भारतानं काल एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं पटकावली. १० मीटर एअर
रायफल स्टँडिंग एस एच वन प्रकारात, अवनी लेखरा हिने सुवर्णपदक तर मोना अग्रवालने कांस्य पदक
पटकावलं. अवनीने सलग दुसऱ्या पॅरालम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं, अशी कामगिरी करणारी ती पहिलीच
भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल एस एच वन प्रकारात
मनीष नारवालनं रौप्यपदक जिंकलं तर महिलांच्या शंभर मीटर स्पर्धेत प्रीती पाल हिनं
काल कांस्यपदक पटकावलं.
****
परभणी
जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाच्या वतीने अमृत महा आवास अभियानांतर्गत
उत्कृष्ट कार्य केलेल्या व्यक्ती आणि संस्थांना जिल्हास्तरीय पुरस्कार काल प्रदान करण्यात
आले. मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्या हस्ते या सर्वांना सन्मानित करण्यात
आलं.
****
महिला
बचत गटांना मॉल मध्ये स्टॉल उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळेल, तसंच ग्राहकांना उत्तम वस्तू
उपलब्ध होतील, असं
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटलं आहे. लखपती दिदी संदर्भात
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काल ते बोलत होते.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महसूल तसंच पोलीस प्रशासन यांची संयुक्त आढावा बैठक
काल झाली. संवाद, समन्वय आणि प्रतिबंधात्मक कारवाई या त्रिसुत्रीचा अवलंब
केल्यास गणेशोत्सव हा आनंददायी आणि निर्विघ्न होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी स्वामी यांनी व्यक्त केला.
****
महास्वराज्य
अभियानांतर्गत नांदेड इथं काल भटक्या आणि विमुक्त जातीतील लोकांना जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी तसंच शिधापत्रिकांचं
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. भटक्या विमुक्तांना शासकीय
योजनांचा लाभ मिळवून त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा
असल्याचं मत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केलं.
****
जालना
जिल्ह्यातल्या सर्व शाळांच्या परिसरात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.
ते काल विद्यार्थी सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबत कार्यशाळेत बोलत होते. शाळेत स्वसंरक्षणासह
गुड टच, बॅड
टच याबाबत धडे देण्यात यावेत. मुख्याध्यापकांनी शाळेत एखादी अनुचित घटना घडूनही जाणीवपूर्वक
दुर्लक्ष केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पांचाळ यांनी यावेळी दिला.
****
धाराशिव
जिल्ह्यात क्षय रोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत प्रौढांच्या बीसीजी लसीकरण मोहिमेला तीन
सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचं
आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी केलं आहे
****
लाडकी
बहीण योजनेचा आगामी विधानसभा निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठीच निवडणुका पुढे ढकलण्याचं
षडयंत्र असल्याचा आरोप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला
आहे. ते काल लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रगतीशील शेतकऱ्यांना पुरस्कार
देण्यासाठी पैसे नसल्याचं सरकार सांगतं, मात्र लाडकी बहीण योजनेसाठी पैसे कुठून येतात असा
सवालही राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
****
शेतकऱ्यांच्या
विविध समस्यांसाठी काल बीड इथं भारतीय कम्युनिस्ट पक्षानं जिल्हाधिकारी कार्यालयावर
मोर्चा काढला. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. दरम्यान, आरोग्य मंत्री तानाजी सावंत
यांच्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काल बीड
इथं बिंदुसरा नदी पुलावर आंदोलन करण्यात आलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा साठा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला
आहे. दरम्यान, धरणाच्या
उजव्या कालव्यातून काल माजलगाव धरणासाठी शंभर घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात
आलं आहे.
****
No comments:
Post a Comment