Saturday, 3 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 03 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०३ मे २०२५ दुपारी १.०० वा.

****

भारतानं पाकिस्तानमधून होणाऱ्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं एका अधिसूचनेत याची घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी ही बंदी घालण्यात आल्याचं या अधिसूचनेत म्हटलं आहे. बंदीमध्ये कोणतीही शिथिलता आणण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असेल.

****

मुंबईत आयोजित  वेव्हज् परिषदेत आज कम्युनिटी रेडीओवरील राष्ट्रीय संमेलनासह अनेक आकर्षक लोककला आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेत दहाव्या कम्युनिटी रेडिओ पुरस्कारांमध्ये सर्वाधिक नाविन्यता श्रेणीत, राज्यातल्या येरला वाणी या कम्युनिटी रेडिओला राष्ट्रीय पातळीवर पहिला पुरस्कार माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

****

गोव्यातल्या शिरगाव इथल्या प्रसिद्ध लैराई जत्रेत आज सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे; तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. शिरगाव मधल्या श्रीगाओमध्ये लैराई देवी मंदिर परिसरात ही दुर्घटना घडली. या जत्रेत मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. जखमींवर गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली तसंच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनातर्फे करण्यात येईल अशी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावंत यांच्याशी संवाद साधून या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून या कठीण प्रसंगात आपण पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.

****

दरम्यान, या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात शोकसंतप्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहे.

****

अंमली पदार्थ नियंत्रण विभाग-एनसीबीच्या अमृतसर युनिटनं चार राज्यांमध्ये चार महिन्यांच्या दीर्घ कारवाईनंतर अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. या कारवाईत तब्बल ५४७ कोटी रुपये जप्त करण्यात आले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

****

या वर्षीच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी आवेदनपत्र पाठवण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. ५ ते १८ वयोगटातील बालकांना किंवा त्यांच्या पालकांना येत्या ३१ जुलैपर्यंत हे आवेदन करता येणार आहेत. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हे राष्ट्र स्तरावरील प्रतिष्ठेचे पुरस्कार १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांच्या हस्ते प्रदान केले जातात. सामाजिक क्षेत्र, पर्यावरण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, विज्ञान तंत्रज्ञान, साहस, तसंच कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बालकांना या दिवशी गौरवण्यात येतं. संस्था किंवा व्यक्ती अश्या बालकांची शिफारस करु शकतात. awards.gov.in या संकेतस्थळावर आवश्यक कागदपत्रं आणि छायाचित्रांसह आवेदनपत्र पाठवावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

****

मराठवाडा विभागातील गरजू दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्या सोडवण्यासाठी दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ बाबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे, विभागातील दिव्यांगांशी येत्या बुधवारी  ७ मे  रोजी दुपारी ४ ते ६ या वेळेत ऑनलाईन चर्चासत्राद्वारे थेट संवाद साधणार आहेत. मराठवाडा विभागातील दिव्यांगांनी या संवादात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर इथं महावितरण लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा ड्रॉ ७ मे रोजी ऑनलाइन पद्धतीनं काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ६५१ विजेत्या ग्राहकांना बक्षीस म्हणून स्मार्टफोन देण्यात येणार आहे, तर प्रत्येक उपविभागात, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी प्रत्येकी १३०२ विजेत्या ग्राहकांना बक्षीस म्हणून स्मार्ट घड्याळ दिले जाईल. वीज बिल ऑनलाइन भरणाऱ्या ग्राहकांची टक्केवारी वाढवण्यासाठी महावितरणने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन किंवा तीनपेक्षा अधिक वीजबिलं ऑनलाईन पद्धतीनं भरणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

****

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग यांच्यात सामना होणार आहे. काल या अहमदाबाद इथं चर्चा गुजरात टायटन्सन सनरायजर्स हैदराबादचा ३८ धावांनी केला. प्रथम फलंदाजी करत गुजरात संघानं सहा गडी गमावून २२४ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल, सनरायझर्स हैदराबाद संघ निर्धारित षटकात १८६ धावाच करू शकला.

****

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 22 دسمبر 2025‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 22 December-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خب...