Sunday, 18 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 18 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

तेलंगणाच्या हैदराबाद इथं चारमिनार नजिकच्या गुलजार हाउस परिसरातील रहीवासी ठिकाणी आज सकाळी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी संबंधीत यंत्रंणांना आवश्यक ते निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटेनवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत तत्काळ स्वरूपात जाहीर केली आहे.

****

आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा होत आहे. या निमित्तानं भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग अर्थात ए.एस.आय.नं केलेल्या घोषणेनुसार देशभरातील सर्व ए.एस.आय.च्या अखत्यारीतील पुरातन स्थळं आणि संग्रहालयांमध्ये प्रवेश मोफत असेल. व्यापक जनसहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं ए.एस.आय.ची ५२ संग्रहालयं आणि सशुल्क प्रवेश असणारी स्मारकं जनतेसाठी विनामूल्य खुली राहणार असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं म्हंटलं आहे.

****

केंद्रीय हवामानशास्र विभागानं सूचित केल्यानुसार आज मराठवाडा, गुजरात, कोकण आणि गोव्यात मेघगर्जना-विजांच्या कडकडाटासह जोराचे वारे वाहून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर, दक्षिण-मध्यवर्ती महाराष्ट्र परिसरात जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात येत्या २१ मे पर्यंतच्या चार दिवसात पावसाचा येलो अलर्टजारी करण्यात आला आहे.

****

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर इथं ‘विकसित कृषी’ विषयावरील उच्चस्तरीय बैठकीतून कृषी विषयक आणि ग्राम विकास योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय मृदा वर्णक्रमीय ग्रंथालयाचं उदघाटन आणि कृषी क्षेत्रासाठी अभिनव असं नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरवही यावेळी केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विदर्भात कापसावर होणारा गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव पाहता, त्याला आळा घालण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता -ए.आयवर आधारित स्मार्ट सापळ्याचा शुभारंभही कृषीमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

****

लष्करी सामर्थ्यामध्ये भारतानं आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अंतर्गत निर्मित शस्त्रास्त्रांमुळं पाकिस्तान विरुध्दच्या युध्दात आपण विजयश्री प्राप्त केली. संपूर्ण जगानं ही शक्ती बघितली आणि त्यांची मागणी आता भारताकडे होत आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नागपूर जिल्ह्याच्या सावनेर इथं आज सकाळी आयोजित तिरंगा यात्रेत सहभागी झाल्यानंतर वार्ताहरांशी संवाद साधतांना ते बोलत होते. जालना इथं आज सकाळी ऑपरेशन सिंदूरच्या सन्मानार्थ तिरंगा यात्रा काढण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे यांच्यासाह माजी सैनिक आणि जालना शहरातील नागरिकांनी या यात्रेत मोठ्या संख्यनं सहभाग घेतला. मामा चौकातून सुरु होत बडी सडक इथल्या श्रीराम मंदिरात महाआरतीने यात्रेचा समारोप झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथंही आज सकाळी तिरंगा यात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं आज दुपारी चार वाजता तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे.

****

राज्य शासनाच्या राबवलेल्या शंभर दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत मराठवाडा महसूल विभागातून आठ जिल्ह्यातून संभाजीनगर कृषी कार्यालयाचा दुसरा क्रमांक आला आहे. कार्यालयातील सुधारणेसाठी प्रत्येक कार्यालयाला अर्थ सहाय्य करण्यात आलं होतं. छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी कार्यालयानं सात कलमी कार्यक्रम राबवला यात कार्यालयातली स्वच्छता, कर्मचारी आसन अद्यावत सुविधा तसंच चौकशीला आलेल्या शेतकऱ्याला योजने संबंधित माहिती देण्यासाठी सन्मान कक्ष अद्यावत करण्यात आला. क्षेत्रिय कृषी सहाय्यकांना दस्तावेज अद्यावत ठेवण्यासाठी तिजोरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी पीएम किसानकक्ष सुरू करण्यात आला.

****

राज्य परिवहन महामंडळ एस.टी.च्या बीड विभागानं एप्रिल-२०२५ मध्ये जवळपास पाच कोटी रुपयांच्या उत्पन्नातील भरीव वाढीतून छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक संरचनेत अव्वल स्थान पटकावलं. बीड विभागानं खर्चात बचत करून तसंच राज्यातल्या प्रमुख शहरांच्या मार्गावर अतिरिक्त बसगाड्यांची व्यवस्था करत ही लक्षणीय कामगिरी केली. विभागास प्राप्त वातानुकुलित ३७ ई-बसला उन्हाळी सुट्यांच्या या हंगामात प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिल्यानं उत्पन्न वाढण्यास मदत मिळाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सोलापूर नजिक सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर जुना पुणे नाका इथं आज पहाटे साडेपाचच्या सुमारास झालेल्या ट्रक अपघातामुळं वाहतुकीची काही काळ कोंडी झाली होती. छत्रपती संभाजीनगरहून सोलापूरला जात असलेल्या ट्रकचं टायर फुटून हा अपघात झाला होता. ट्रक उलटल्यानं त्यातली कांद्याची पोती रस्तावर विखुरल्यानं येथे वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक सुरळित झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

सौर ऊर्जा प्रकल्प स्वच्छ करणारा ड्रोन अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठ आणि भारतीय ड्रोन संशोधन आणि विकास प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातर्फे विकसित करण्यात आला आहे. एक मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प तीस मिनिटात स्वच्छ करणारा हा ड्रोन आहे. परंपरागत पद्धतीनं सौर पॅनलची स्वच्छता करताना वेळ, मनुष्यबळ आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र या ड्रोनद्वारे ही प्रक्रिया पूर्णतः आहे.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 30.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 30 December 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छ...