Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 23 May 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
नवी दिल्ली इथं रायझिंग नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिटचं उद्घाटन करण्यात आलं. रायझिंग
नॉर्थ ईस्ट इन्व्हेस्टर्स समिट' 23-24 मे रोजी होणारा दोन
दिवसांचा कार्यक्रम असून केंद्र सरकारनं, ईशान्येकडील राज्य सरकारांच्या सक्रीय पाठिंब्यानं आयोजित केलेले विविध रोड शो, राज्यांच्या गोलमेज परिषदा, राजदूत बैठक आणि द्विपक्षीय चेंबर्स बैठक यांचा समावेश
आहे, अशा शिखर परिषद - पूर्व उपक्रमांचा हा सांगता समारंभ आहे.
****
दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत द्रमुक खासदार कनिमोळी
करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली तिसरं शिष्टमंडळ आज रशियाच्या मॉस्कोला पोहोचलं. रशिया
हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश असून दोन्ही देशांनी नेहमीच राजनैतिक आणि व्यापारी
मुद्द्यांवर एकत्र काम केलं आहे. भारतावर
वारंवार होणारे दहशतवादी हल्ले पाहता रशियाला येणं महत्त्वाचं आहे, असं कनिमोळी यांनी माध्यमांशी बोलतांना
म्हटलं आहे. हे शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया आणि लाटव्हियालाही भेट
देणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने काल संयुक्त अरब
अमिरातीत तिथले सलोखा विषयक विभागाचे मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान यांच्याबरोबर
चर्चा केली. या ऑपरेशन सिंदूरचा भाग म्हणून अशा प्रकारचं आयोजन करणारा युएई हा पहिलाच
देश आहे.
खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील
शिष्टमंडळ देखील काल जपानला पोहोचलं. दहशतवादाच्या
विरुद्धच्या लढाईत जपान भारताला दृढ पाठिंबा देईल, असा विश्वास जपानच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
****
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि पोलीस चकमकीमध्ये एक नक्षलवादी ठार झाल्याचं वृत्त आहे. काल रात्रीपासून
सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून यासंबंधी तपशील अद्याप यायचा आहे.
****
राज्यात अवकाळी पावसामुळं झालेल्या
नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई दिली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते
आज कोल्हापूर इथं माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं
मोठं नुकसान होत असून, नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात
आपण मंत्रिमंडळाला सुचना केल्याचं, मंत्री छगन भुजबळ यांनी
म्हटलं आहे. ते आज शिर्डी इथं श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री
पदाच्या वादात आपण पडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणीस हेच याबाबत निर्णय घेतील, असंही भुजबळ यावेळी म्हणाले.
****
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी
यांनी काल पुर्व सूचना न देत दिल्ली विद्यापीठाला दिलेल्या भेटीवर विद्यापीठाने आक्षेप
घेतला आहे. विद्यापीठाने एका निवेदनात म्हटले आहे की, राहुल गांधी एक तासाहून अधिक काळ विद्यापीठाच्या विद्यार्थी
संघटनेच्या कार्यालयात होते, या काळात सुरक्षा रक्षकांनी
कार्यालयाला वेढा घातला होता. गांधीं यांच्या भेटीचा विद्यापीठाने निषेध केला आहे.
****
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र
विकास मंडळाच्या वतीने वर्ष २०२४ मध्ये काढण्यात आलेल्या प्रधानमंत्री शहरी आवास योजना
अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातल्या सदनिकांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. ठाणे
जिल्ह्यातल्या कल्याणच्या शिरढोण आणि मौजे खोणी इथल्या ६ हजार २४८ पात्र लाभार्थ्यांना
या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार असल्याची माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी
रेवती गायकर यांनी दिली. प्रती सदनिका १ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी करण्यात आली
असून आता सदनिकेची सुधारित विक्री किंमत १९ लाख २८ हजार ७४२ रुपये करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात आज सलग चौथ्या
दिवशीही पाऊस सुरूच आहे. आज सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये गुहागर तालुक्यात
सर्वाधिक १९० पुर्णांक ४० मिलिमीटर, लांज्यात १२८ मिलिमीटर
, रत्नागिरीत १२४ पर्णांक ११, संगमेश्वरात ११६ पुर्णांक ४५, दापोलीत १०५ पर्णांक ७१, चिपळुणात ९९ पर्णांक
२२, खेडमध्ये ९४ पुर्णांक २८, राजापुरात ५०, तर मंडणगडमध्ये २७ पुर्णांक ७५ मिलिमीटर
पावसाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २६ मेपर्यंत रत्नागिरी
जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार
पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट
तर छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव जिल्ह्यासाठी येलो अलर्ट
जाहिर करण्यात आला आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या
कनिष्ठ क्रिकेट समितीने इंग्लंड दौऱ्यासाठी १९ वर्षा खालील क्रिकट संघाची घोषणा केली.
आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार असेल आणि अभिज्ञान कुंडू उपकर्णधार असणार आहे. १४ वर्षीय
वैभव सूर्यवंशीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ २४ जून ते २३ जुलै या
कालावधीत इंग्लंड दौऱ्यात ५० षटकांचा एक
सराव सामना आणि पाच एकदिवसीय सामने तसच दोन बहु-दिवसीय सामने खेळणार आहे.
****
No comments:
Post a Comment