आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ मार्च २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
हुतात्मा
निनाद
मांडवगणे
यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक इथं, लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
परवा काश्मीरमध्ये वायूदलाच्या हेलिकॉप्टर अपघातात मांडवगणे यांचं निधन झालं.
दरम्यान,
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले वायूदलाचे वैमानिक अभिनंदन वर्तमान यांच्या स्वागतासाठी
पंजाबमधल्या वाघा सीमेवर नागरिक गर्दी करत आहेत. अभिनंदन, आज दुपारपर्यंत भारतात परत
येण्याची शक्यता आहे. परवा सकाळी काश्मीरमध्ये घुसखोरी केलेलं पाकिस्तानचं विमान पिटाळून
लावताना, अभिनंदन यांचं मिग विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळलं, त्यानंतर त्यांना
पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं होतं.
भारतानं अभिनंदन
यांना, तत्काळ बिनशर्त सुरक्षितरित्या, परत पाठवण्यास पाकिस्तानला बजावलं होतं. पाकिस्तानचे
पंतप्रधान इम्रान खान यांनी काल पाकिस्तान संसदेत अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली
होती.
****
केंद्र शासनाच्या पुणे इथल्या
रिजनल आऊटरिच ब्युरोतर्फे औरंगाबाद इथं आज स्वच्छता आणि एकता या विषयावर बहुमाध्यम
चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या प्रोझोन मॉल इथं सकाळी दहा वाजेपासून
हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. प्रदर्शनात महात्मा गांधी आणि सरदार वल्ल्भ भाई पटेल यांचा
जीवन प्रवास दृक श्राव्य पद्धतीनं दाखवण्यात येणार आहे. तसंच लहान मुलांसाठी प्रश्नमंजुषा
आणि काही खेळांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
उद्या आणि परवा राज्यभरात मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी
सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात
होत आहे. या परीक्षेसाठी नऊ मंडळातून १७ लाख ८१३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये
औरंगाबाद विभागातल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या पाच जिल्ह्यांतल्या
एक लाख ८६ हजार ६६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. २२ मार्चपर्यंत या परीक्षा चालणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment