आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०४ सप्टेंबर २०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात कोरोना विषाणुचे नवे
८३ हजार ३४१ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ३९ लाख ३६ हजार ७४७ झाली आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गामुळे
आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे एक हजार ९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ६८ हजार ४७२ झाली आहे.
****
देशात कोरोना विषाणू संसर्गावर
आठ लाख ३१ हजार १२४ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या विषाणू संसर्गावर उपचार घेऊन बरे
झालेल्या रुग्णांची संख्या ३० लाख ३७ हजार १५१ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं
दिली आहे.
****
‘वंदे भारत’ अभियाना अंतर्गत
आतापर्यंतच्या पाच टप्प्यांमधे तेरा लाख नागरिकांना भारतात आणण्यात आलं आहे. २४ देशांमधून
दोन लांखांहून अधिक नागरिकांना सहाव्या टप्प्यात देशात आणलं जाण्याची शक्यता असल्याचं
विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला
जिल्ह्यात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमधे चकमक सुरू असून यात एक अधिकारी जखमी झाला
आहे. पट्टन भागातल्या येडीपोरा भागात ही चकमक सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली
आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत
मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीचा भाऊ
शोविक चक्रवर्ती तसंच सुशांतचं घर सांभाळणारा सॅम्युअल मिरांडा यांच्या निवासस्थानांची
झडती घेतली. अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं या दोघांना आजही चौकशीसाठी बोलावलं असल्याची
माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
सांगली जिल्ह्यात मिरज इथल्या
शासकीय रुग्णालयातल्या कोरोना विषाणुच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह पन्नास
कर्मचाऱ्यांना या विषाणुची लागण झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी
तालुक्यातल्या गोपाळवाडी चेडगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण चंद्रकांत
मंगलाराम यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्याला सलग तिसऱ्या
वर्षी मिळालेल्या या पुरस्काराचं वितरण उद्या शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे.
****
No comments:
Post a Comment