आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशभरात गेल्या २४ तासांत कोविड बाधा झालेले नवे ८६ हजार ५०८ रुग्ण आढळले,
त्यामुळे देशभरात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ लाख ३२ हजार
५१८ झाली आहे. गेल्या २४ तासात या संसर्गानं एक हजार १२९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे
मृतांची एकूण संख्या ९१ हजार १४९ झाली आहे.
****
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत
एक दहशतवादी मारला गेला. सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू असताना, हा दशतवादी ठार झाला.
या दहशतवाद्याची तसंच त्याच्या संघटनेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
****
भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं बचावकार्य
आज पहाटेच्या सुमारास पूर्ण झालं. या इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३८ मृतदेह बाहेर काढण्यात
आले, तर २५ जणांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. सध्या एका अडीच वर्षाच्या बालकाचा
तपास सुरू असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ७७२
झाली आहे. यापैकी २४ हजार ६९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या संसर्गानं जिल्ह्यात
आतापर्यंत ८९० जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ६ हजार १९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने उद्या २५ तारखेच्या
नियोजित देशव्यापी आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील होणार आहे. संघटनेचे बीड
जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी ही माहिती दिली. उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार असल्याचं, करपे यांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात आज सकाळी साडेनऊ वाजता संपलेल्या २४ तासांनंतर पावसानं
विश्रांती घेतली असून लख्ख सूर्यप्रकाश पडला आहे. जिल्ह्यात अनेक दिवसानंतर ऊन पडल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment