Tuesday, 29 September 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.09.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशातल्या एकूण कोविड बाधित रुग्णांची संख्या ६१ लाख ४५ हजार २९१ झाली आहे, यापैकी ५१ लाख एक हजार ३९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ९ लाख ४७ हजार ५७६ रुग्णांवर देशभरात उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत देशात या संसर्गाचे नवे ७० हजार ५८९ रुग्ण आढळले, तर ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार १७४ झाली आहे. यापैकी २६ हजार ३५९ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ९२५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

महाराष्ट्रात गोचिडांमुळे क्रायमिन काँगो हेमोरेजिक फिव्हर या साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्यानं राज्याच्या सीमा भागातल्या पशुपालक आणि मांस विक्रेत्यांना सतर्क राहाण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. हा रोग गुजरात मधून महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या जिल्ह्यात पसरण्याची शक्यता असल्याचं पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयामार्फत सांगण्यात आलं आहे.

****

मुंबईत सचिवालयानजिकच्या आमदार निवासात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी आल्यानं, हे आमदार निवास काल रात्री तत्काळ रिकामं करण्यात आलं. या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर कोठेही बॉम्ब आढळला नाही, त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जागतिक हृदय दिवस आज पाळला जातो. लोकांमध्ये हृदय रोगांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी २००० सालापासून या दिवसाची सुरूवात करण्यात आली. लोकांच्या जीवन शैलीत बदल घडवून हृदय रोग थांबवण्याचा प्रयत्न या जागतिक हृदय महासंघातर्फे केला जातो.

****

पोषण आहार योजने अंतर्गत सांगली जिल्ह्यात महापालिका शाळेत वितरित करण्यात येत असलेला डाळीचा साठा अन्न आणि औषध विभागाने जप्त केला आहे. शालेय मुलांना देण्यात येणारी हरभरा आणि मुग डाळ निकृष्ट प्रतीची असून ती अप्रमाणित असल्याचं लक्षात आल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने महापालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये छापा टाकून या डाळीचा साठा जप्त केला.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...