आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
****
अयोध्येतल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयचं
लखनौतलं विशेष न्यायालय आज निर्णय सुनावणार आहे. या प्रकरणी सर्व ३२ आरोपींना न्यायालयात
हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र मुख्य आरोपी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,
मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह आणि अयोध्येतल्या
राममंदिराचे महंत नृत्यगोपालदास हे विलगीकरणात असल्यानं, हजर राहण्याची शक्यता कमी
आहे.
****
देशात कोविड बाधितांच्या संख्येनं ६२ लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या
२४ तासांत देशात या संसर्गाचे ८० हजार ४७२ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या
६२ लाख २५ हजार ७६३ झाली आहे. गेल्या २४ तासांतच या संसर्गाने १ हजार १७९ रुग्णांचा
मृत्यू झाल्यानं, मृतांची एकूण संख्या ९७ हजार ४९७ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ४११
झाली आहे. यापैकी २६ हजार ६५२ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत
जिल्ह्यात ९३० जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ५ हजार ८५७ रुग्णांवर
उपचार सुरू आहेत.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत एक हजार ७१३ कोविडग्रस्तांच्या नवीन रुग्णांची
नोंद झाली तर ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत रुग्णांची संख्या दोन लाख दोन हजार
४८८ झाली आहे. एकूण मृतांचा आकडा आठ हजार ८८० वर पोहचला आहे.
****
२०२०-२१ या हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावानं उडीद
खरेदीला उद्या एक ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी
१५ सप्टेंबरपासूनच नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, सोयाबीन खरेदीच्या नोंदणीला
उद्यापासून सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
****
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातल्या एक हजार ३९८ सहकारी
संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता या निवडणूका डिसेंबरपर्यंत पुढे
गेल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक, शिक्षक बँक, सांगली अर्बन बँक यासह अन्य संस्थांच्या
निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.
****
No comments:
Post a Comment