आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशात कोरोना विषाणुचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ पूर्णांक १४ शतांश
टक्के झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
कोरोना विषाणुमुळे देशात होत असलेल्या मृत्यूंचा दर एक पूर्णांक ५८ शतांश
टक्के पर्यंत कमी झाला आहे. या संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या
४८ लाख ४९ हजार ५८४ झाली आहे.
****
अंमली पदार्थ सेवन आणि व्यवहार चौकशी प्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोन
आज मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - `एनसीबी`च्या चौकशीसाठी हजर झाली आहे. अभिनेता
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून पुढे आलेल्या अंमली पदार्थ सेवन आणि
व्यवहार प्रकरणात नाव आल्यानं तिची चौकशी सुरू आहे.
****
कोरोना विषाणू संसर्ग काळात जनतेची सेवा करणाऱ्या भारत आणि अमेरिकेतल्या
दात्यांचा आणि उद्योग संस्थांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत
सन्मान करण्यात आला. `इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स` तर्फे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात
टाटा समुहाचे मानद प्रमुख रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्यात काल दिवसभरात कोरोना विषाणू संसर्गाचे १७ हजार ७९४ नवे रुग्ण
आढळले असून एकूण रुग्णसंख्या १३ लाख ७५७ झाली आहे. राज्यभरात काल ४१६ रुग्णांचा या
ससंर्गामुळे मृत्यू झाला.
****
मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे २९ रुग्णांचा काल मृत्यू झाला,
तर नव्या एक हजार ६०८ रुग्णांची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात काल या संसर्गामुळे आठ
रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ३५८ रुग्णांची नोंद झाली.
****
ठाणे जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या एक हजार ६७१ नव्या रुग्णांची
नोंद झाली असून ३२ रुग्ण मरण पावले आहेत.
****
सांगली जिल्यात काल दिवसभरात कोरोना विषाणू संसर्गाचे ६०७ नवे रुग्ण आढळले
असून २६ रुग्ण या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. जिल्ह्यातली या प्रादुर्भावाच्या
एकूण रुग्णांची संख्या ३२ हजार ८३२ झाली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी
मोहन यादव यांचं आज पहाटे नाशिक इथं निधन झालं. ते ५३ वर्षांचे होते.
****
No comments:
Post a Comment