Sunday, 28 February 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेच...

आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 28.02.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे ...

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** वनमंत्री संजय राठोड यांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर

** राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून

** औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे २५ रुग्ण

आणि

**`परिक्षा पे चर्चा`मध्ये सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

****

बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणी भारतीय जनता पक्षानं केलेले गंभीर आरोप आणि राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्र्वभूमीवर वनमंत्री, शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजिनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सादर केला. राठोड यांनी प्रसिद्धी माध्यमांना या संबंधी माहिती दिली. पूजा चव्हाण सोबतची त्यांची छायाचित्रं तसंच या प्रकरणासंबंधी ध्वनीफीत  सामाजिक संपर्क माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यापासून भारतीय जनता पक्षानं त्यांच्या राजिनाम्याची मागणी लावून धरली होती. मंत्रीपदापासून दूर राहुन या संदर्भातल्या चौकशीला सहकार्य करणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. चौकशीपूर्वीच विरोधी पक्षातर्फे आपली बदनामी करण्यात आली. पोलिस तपास करत आहेत, तपासातून सत्य बाहेर यावं ही आपली भूमिका असल्याचंही राठोड म्हणाले.  त्यांचा राजिनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे की नाही किंवा ते तो स्वीकारणार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, असं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी राजिनामा दिला पाहिजे होता. या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल नोंदवला जावा, अशी आपली मागणी असल्याचंही फडणवीस म्हणाले.

****

राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकार या अधिवेशनांतर्गत आपला दुसरा अर्थसंकल्प येत्या ८ मार्चला सादर करणार आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांचा ठेवण्यात आला आहे. सभागृहात आमदारांसाठी विशिष्ट आंतर राखत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  राज्याची आर्थिक घडी विस्कटली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही बिकट झाला असल्याची टीका

विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस यांनी केली आहे. उद्या सुरु होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. वाळू चोरी, पोलिसांच्या बदल्या, कोरोना विषाणू संसर्गाच्या परिस्थीतीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असून हे विषय अधिवेशनात मांडणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

भारताचं PSLV-C ५१ हे उपग्रह प्रक्षेपक अंतराळ यान आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून भारत, ब्राझील आणि अमेरिकेच्या १९ उपग्रहांना घेऊन अंतराळात झेपावलं. ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेडची’ ही पहिलीच व्यावसायिक मोहीम आहे. ब्राझीलचा ऍमेझोनिया १ हा उपग्रह सर्वात प्रथम PSLV-C ५१ या अंतराळ यानापासून चार टप्प्यांमध्ये वेगळा होऊन पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस रिसर्च या संस्थेच्या या उपग्रहाच्या मदतीनं अमेझॉनच्या जंगलातल्या जंगलतोडीवर लक्ष ठेवता येईल, तसंच अमेझॉन खोऱ्यातल्या कृषी विविधतेबाबतची माहिती उपलब्ध होईल.

****

औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २५ नवे कोविड बाधित रुग्ण दाखल झाले. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार १३५ झाली आहे.  जिल्ह्यातल्या दोन पुरुष कोविड बाधितांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या एक हजार २६८ झाली असून ४६ हजार ९२७ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, औरंगाबाद शहरात विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून महापालिकेचं पथक दंड वसूल करत आहे. आज ९१ व्यक्तींकडून ५०० रुपयांप्रमाणे ४५ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

****

ांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे नवे ९० रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या २३ हजार ६५४ झाली असून या पैकी २२ हजार २७५ रुग्ण संसर्ग मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातले ५० रुग्ण आज संसर्गावर उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.

****

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या जनता संचारबंदीला आज प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी काल आणि आज जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं होतं. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळलेल्या एका हॉटेलला आज टाळं ठोकलं. 

****

परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजनांची नागरिकांनी कठोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा प्रशासनाला टाळेबंदी सारखा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज दिला. जिल्ह्यात या संसर्गाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पुढल्या काळात नागरिकांनी मास्क लावणं, आस्थापना, व्यापारी दुकानं या ठिकाणी निर्जंतुकीकरण तसंच सामाजिक अंतराचं पालन यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केलं आहे.

****

राज्यात काल ३ हजार ६४८ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत २० लाख २० हजार ९५१ रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका झाला आहे. काल आठ हजार ६२३ नव्या रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे

राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या २१ लाख ४६ हजार ७७७ झाली आहे. सध्या राज्यात ७२ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ५१ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९२ झाली आहे. राज्याचा मृत्यूदर २ पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला आहे.

****

परीक्षांचा काळ येत असून लवकरचं ‘परीक्षा पे चर्चा करु’ त्यासाठी सूचना पाठवा, चर्चेत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाद्वारे आज केलं आहे. या मालिकेचा हा चौऱ्याहत्तरावा भाग होता. डॉ.सी.व्ही रमण यांच्या संशोधनकार्याच्या गौरवार्थ आज साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नाशिकच्या स्नेहिल यांच्या `रमण इफेक्ट` संदर्भातील संदेशाचा उल्लेख करुन देशाचा वैज्ञानिक इतिहास जाणून घेण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. देशभरातल्या वैज्ञानिक प्रयोगांचे दाखले देत प्रत्येकानं अशीच विज्ञानाची कास धरली तर विकासाच्या वाटा खुल्या होतील आणि देश आत्मनिर्भर बनेल असा विश्वास पंतप्रधानांनव्यक्त केला. जून मध्ये पावसाळ्याच्या अनुषंगानं जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान सुरू करण्यात येणार आहे. जेव्हा अणि जिथं पावसाचं पाणी पडेल, ते सावाहा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून पाणी बचत आणि नियोजनाची माहितीही पंतप्रधांनांनी दिली. आत्मनिर्भर भारत हे फक्त आर्थिक अभियान नसून भविष्यात ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल असं नमुद करत आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावा- गावांमध्ये पोहोचत असल्याबद्दल, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी माघ महिन्यापासूनच आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करुन, पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वांनी आत्तापासूनच १००दिवसांचं अभियान सुरू करण्याची गरज पंतप्रधानांनी  व्यक्त केली.

****

राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात देचलीपेठा आणि भामरागड तालुक्यात धोडराज या अतिदुर्गम आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल पोलिस ठाण्यांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. नक्षल्यांचा बीमोड करण्यासाठी शासन पोलिसांना सुरक्षाविषयक सर्व सुविधा पुरवणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अहेरी इथं पोलिस मुख्यालयात आढावा बैठक घेऊन शूर जवानांचा पोलिस महासंचालक नगराळे यांनी यावेळी सत्कारही केला.

****

केंद्रसरकारनं केलेल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीबाबत आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं पेट्रोलपंपावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकांखाली 'चूल मांडा' आंदोलन केलं. प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. एका महिन्यात करण्यात आलेली १०० रूपयांची गॅसदरवाढ सर्वसामान्य नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त करणारी असल्याची टीका चाकणकर यांनी यावेळी केली.

****

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट-क सरळसेवा भरतीसाठी आज राज्यभर परीक्षा घेण्यात आली. परिक्षेची प्रश्र्न पत्रिका एक तास उशिरा आल्यानं औरंगाबाद शहरातल्या काही परीक्षा केंद्रावर परिक्षार्थींनी गोंधळ घातला.

//*************//

 

 

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 28.02.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी ब...

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

आत्मनिर्भर भारत हे फक्त आर्थिक अभियान नसून भविष्यात ते एक राष्ट्रीय चैतन्य बनेल, आत्मनिर्भर भारताचा हा मंत्र, देशातल्या गावागावांमध्ये पोहोचत असल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आकाशवाणीवरील ’मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी आज देशवासियांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचा आजचा ७४वा भाग होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी देशवासियांना माघ पौर्णिमेच्या शुभेच्छा देत या दिवसाचं महत्व विशद केलं. उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवू नये यासाठी माघ महिन्यापासूनच आपल्या परिसरातल्या जलस्त्रोतांची स्वच्छता करुन, पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी, आपण सर्वजण आत्तापासूनच १००दिवसांचं एखादं अभियान सुरू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लवकरच जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जल शक्ती अभियान म्हणजेच ‘कॅच द रेन’ सुरू करण्यात येणार आहे. ‘जेव्हा अणि जिथं पावसाचं पाणी पडेल, ते साठवा’ हा या मोहिमेचा मूलमंत्र आहे असं सांगून पाणी बचत आणि नियोजनाची माहिती पंतप्रधांनांनी दिली. आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याचं स्मरण केलं. आजचा दिवस रमण यांनी शोधून काढलेल्या ‘रमण इफेक्ट’ला समर्पित असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या शोधामुळे विज्ञानाची दिशाच बदलली हे सांगतांना पंतप्रधानांनी नाशिकच्या स्नेहल यांच्या संदेशाचा आपल्या भाषणात उल्लेख केला. पंतप्रधानांनी देशात शेतीसह अन्य क्षेत्रात विज्ञानाच्या सहाय्यानं विविध प्रयोग करणाऱ्या व्यक्तींच्या कामांचा उल्लेख करत त्यांचं अभिनंदन केलं. मार्च महिन्यापासून परीक्षांचा हंगाम सुरु होतो, या काळात विद्यार्थ्यांनी तणावरहित असावं असं सांगून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनीही सहभागी व्हावं असं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही सर्व निरोगी असाल, आनंदी असाल, कर्तव्याच्या मार्गावर ठाम राहाल तेव्हाच देश वेगाने पुढे मार्गक्रमण करत राहील असं पंतप्रधान आपल्या भाषणाच्या समारोपात म्हणाले.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन आज सर्वत्र साजरा होत आहे. यंदाचा विषय ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नाविन्यता यांचा शिक्षण, कौशल्य आणि कार्यपद्धतीवर होणारा प्रभाव!’ असा आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी या दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. नायडू यांनी विज्ञानाचा उपयोग विश्वाच्या विकासासाठी आणि लोकांच्या सुख समृद्धीसाठी करण्याचा संकल्प सर्वांनी करावा असं आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

देशातल्या खेळणी उद्योगाला सरकारचा पूर्णपणे पाठिंबा असून हवं ते सहकार्य करण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे. भारतीय खेळणी मेळावा २०२१मध्ये ते काल बोलत होते. जिथे जिथे टॉय क्लस्टर उभारले जाणार आहेत, त्या ठिकाणी उत्पादनांच्या गुणवत्ता परीक्षणासाठी, भारतीय मानक ब्युरो प्रयोगशाळा स्थापित करेल अशी घोषणा गोयल यांनी यावेळी केली.

****

मराठा आरक्षणाविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय न्याय आणि विधी मंत्री रविशंकर प्रसाद, ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्यासोबत आज दुपारी ४ वाजता मंबईत सह्याद्री अतिथिगृहामध्ये बैठक घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य तसंच सरकारचे कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञ याबैठकीत सहभागी होणार आहेत.

****

नांदेड शहरात मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंड आकारण्यात येत असून आज आठव्या दिवशी पोलीस, महसूल आणि महानगर पालिका कर्मचाऱ्यांच्या संयुक्त मोहिमेत ५७ हजार ७०० रूपये वसूल करण्यात आले आहेत. शहरातील मंगल कार्यालयं, कोचिंग क्लासेस, हॉटेल्सला अचानक भेटी देऊन १०० निमंत्रितांपेक्षा अधिक लोक आढळून आल्यास दंड आकारण्यात येत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता, वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी ५ वाजल्यापासून संपूर्ण संचारबंदी सुरु झाली असून ती उद्या सकाळी ८ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

****

आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात कोरोना विषाणू बाधित १६ हजार ७५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर ११३ जण मरण पावले. दरम्यान, देशात आतापर्यंत १ कोटी ४३ लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे सकाळी 09.20 वाजेचे राष्ट्रीय मराठी बातमीपत्र

AKASHWANI AURANGABAD URDU NEWS BULLETIN 9.00 AM TO 9.10 AM

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 February 2021

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१० मि.

****

·      कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९च्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवाचे राज्यांना निर्देश.

·      जेष्ठ तसंच अन्य रोग असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तिंसाठी उद्यापासून लसीकरण नोंदणी.

·      हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून ७ मार्चपर्यंत संपूर्ण संचारबंदी, परभणी जिल्ह्यात सर्व धार्मिकस्थळे सात मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश, लातूर जिल्ह्यातील जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

·      महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीनं परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध.

·      राज्यात आठ हजार ६२३ तर मराठवाड्यात ८५८ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद.

·      प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचं एक गाव तयार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा.

आणि

·      पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचं राज्यभरात आंदोलन.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत असलेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी कोविड-19 नियंत्रणासाठीच्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी दिले आहेत. कोविड संदर्भात झालेल्या एका आढावा बैठकीत ते काल बोलत होते.  महाराष्‍ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश छत्तीसगढ़, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मु-काश्मीर या राज्यांमध्ये रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे, गौबा यांनी या राज्यांच्या मुख्य सचिवांसमवेत काल चर्चा केली.

दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमात ६० वर्षांहून अधिक वयाच्या तसंच अन्य रोग असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना लसीकरण केंद्रात नोंदणी करता येईल असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. देशभरातल्या १० हजार शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण केलं जाणार असून खाजगी रुग्णालय लसीकरणासाठी २५० रुपये शुल्क आकारु शकतात असंही मंत्रालयानं सांगितलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सात मार्चपासून ही लसीकरण मोहीम सुरु होणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात उद्या १ ते ७ मार्च दरम्यान पूर्णपणे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले. १ मार्च रोजी सकाळी ७ वाजेपासून ते ७ मार्चच्या रात्री बारा वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. सदर कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दूध विक्रेते तसंच दूध केंद्रांना व्यवसायाची मुभा देण्यात आली आहे. जिल्ह्यातली सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि बँका फक्त शासकीय कामकाजासाठी सुरू राहतील. संचारबंदी काळात जिल्ह्यातली सर्व धार्मिकस्थळं, प्रार्थनास्थळं, सर्व शाळा, महाविद्यालयं, सर्व मंगल कार्यालयं बंद राहतील. या काळात औषधी दुकानं चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी काळात सर्व नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

****

परभणी जिल्ह्यातली सर्व धार्मिकस्थळे येत्या सात मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यात कोविड बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही निर्बंध आवश्यक आहेत. धार्मिक स्थळांमध्ये होणारी गर्दी पाहता, काही कालावधीकरता धार्मिक स्थळं बंद करणं आवश्यक असल्याचं, या आदेशात म्हटलं आहे.

जिल्ह्यातली वरिष्ठ महाविद्यालयं तसंच शिकवणी वर्ग उद्या एक मार्च ते चार मार्च दरम्यान बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. प्राध्यापकांनी ऑनलाईन पध्दतीने अध्यापनाचे काम करावं, या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही माध्यमिक तसंच प्रथमिक शिक्षणाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त यांच्यावर राहील, असेही आदेशात नमूद केलं आहे.

****

लातूर जिल्हावासियांनी संपूर्ण जिल्ह्यात काल जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक कामाशिवाय लोक घराबाहेर पडलेले दिसले नाहीत. व्यापारी वर्गानेही स्वतःहून आपली दुकानं-आस्थापना बंद ठेवून सहकार्य केलं. नागरिकांनी आजही जनता संचारबंदी पाळून कोविड प्रतिबंधासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत लातूरकरांनी घरातच थांबून जनता संचारबंदीचं पालन केलं, याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूरकर जनतेचे आभार व्यक्त केले. दरम्यान, जनता संचारबंदी असल्यामुळे कुठेही पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी कोणाला अडवणूक करीत नसल्यामुळे काही नागरिक फिरताना दिसून येत होते, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे दहावी आणि बारावी वगळता अन्य वर्गांच्या शाळा तसंच कोचिंग क्लासेस येत्या १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी जारी केले आहेत. याआधी २८ फेब्रुवारीपर्यंत ही बंदी घालण्यात आली होती मात्र, वाढता संसर्ग लक्षात घेता या बंदीत वाढ करण्यात आली आहे.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पध्दतीने  परीक्षा  देऊ शकतील अशी घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल केली. ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्गा संदर्भातल्या सर्व नियमांचं पालन करुन परीक्षा देता येईल असं सामंत यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, अभियांत्रिकी आणि तंत्र शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मात्र पूर्णपणे ऑनलाईनच होणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

****

राज्यात कोविड रुग्णांचं प्रमाण दररोज वाढत असून, त्या तुलनेत रुग्ण कोविडमुक्त होण्याचं प्रमाण कमी आहे, यामुळे राज्याच्या कोविड मुक्तीच्या दरात सतत घट होत आहे, सध्या राज्याचा कोविड मुक्तीचा दर ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के इतका झाला आहे. काल आठ हजार ६२३ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २१ लाख ४६ हजार ७७७ झाली आहे. तर काल तीन हजार ६४८ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २० लाख २० हजार ९५१ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल ५१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ९२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ४३ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ७२ हजार ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत

****

मराठवाड्यात काल नव्या ८५८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, लातूर, नांदेड जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात २९७ रुग्ण आढळले. जालना जिल्ह्यात १७८, नांदेड ८०, लातूर ८२, बीड ७७, परभणी ७०, हिंगोली ४६, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २८ नवे रुग्ण आढळून आले.

****

पुढच्या मराठी दिनापर्यंत राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाचं गाव तयार करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून बोलत होते. मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित होते. शासकीय कार्यालयांमधून वापरल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं सुलभीकरण करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आपण आपल्या मातृभाषेबद्दलचा न्यूनगंड न बाळगता, सर्व क्षेत्रात मराठी बोलण्याचा प्रयत्न करावा, अनेक देशातले उच्चपदस्थ लोकही इंग्रजी न बोलता, मातृभाषेतून बोलतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी लक्ष वेधलं.

****

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्व महाराष्ट्राने आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मराठीतून देण्याचा संकल्प केला पाहिजे, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून काल साहित्य, संस्कृती तसंच समाजसेवा क्षेत्रातल्या मान्यवरांना राज्यपालांच्या हस्ते मुंबईत राजभवन इथं ‘वाग्धारा सन्मान’ देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.

****

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल सर्वत्र कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून विविध कार्यक्रम घेण्यात आले. औरंगाबाद इथं कवीसंमेलन, व्याख्यानं, ऑनलाईन व्याख्यानं झाली. उस्मानाबाद इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं शहरातल्या साहित्यिकांचा यानिमित्तानं सत्कार करण्यात आला.

लातूर इथं श्री केशवराज विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या शिक्षक तसंच विद्यार्थ्यांसाठीच्या विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना प्रसिद्ध साहित्यिक कवयित्री शैलजा कारंडे यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली. शहरातल्या दयानंद कला महाविद्यालयात मराठी विषयाच्या प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ७४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

बीड जिल्ह्यातल्या पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करून वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत, भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीनं काल राज्यभरात आंदोलन करण्यात आलं.

औरंगाबाद इथल्या जालना रस्त्यावर भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करत, संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महिला कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यात घेतलं.

उस्मानाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालय तसंच जिल्हा पोलीस निरीक्षक कार्यालय इथं या घटनेचा तीव्र निषेध करत, वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशा मागणीचं निवेदन मुख्यमंत्री तसंच गृहमंत्र्याकडे सादर करण्यात आलं.

हिंगोलीत भाजप महिला आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कोविडचे नियम पाळत फक्त पाच महिला पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं. यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन पूजा चव्हाणच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

परभणी इथं आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वसमत रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

राज्यात नवी मुंबई, मुलंड, नाशिक, धुळे, भंडारा इथंही करत भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.

****

हिंगोली इथं जवळा-पळशी रस्त्यावरच्या स्वप्नस्फूर्ती मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनाला पन्नास हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या मंगल कार्यालयाला जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता, तिथे ५० पेक्षा जास्त लोक विवाह समारंभासाठी उपस्थित असल्याचं दिसून आलं, अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

****

औरंगाबाद इथं हिमायतबाग चौकात चहा विक्रेते आणि खाद्यविक्रेत्यांवर कोविड प्रतिबंधात्मक नियमभंग केल्याप्रकरणी काल कारवाई करण्यात आली. या भागातील तीन लोखंडी टपऱ्या आणि पाच शेड, महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने जमीनदोस्त केले. मास्क न लावलेल्या नागरिकांवरही या ठिकाणी कारवाई करण्यात आली. मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी या नियमभंगाचा स्वत: अनुभव घेतल्यानंतर याप्रकरणी कारवाईचे आदेश दिले.

****

औरंगाबाद इथं बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीनं काल पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत कर्जवाटप करण्यात आलं, शंभर अर्जदारांना यावेळी सुमारे दहा लाखावर कर्जाचं वाटप करण्यात आलं.

****

Audio - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.02.2021 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Saturday, 27 February 2021

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2021 रोजीचे रात्री 09.15 ते 09.30 वाजेचे मराठी राष्ट्रीय बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – आकाशवाणी मुंबई केद्रांचे दिनांक 27.02.2021 रोजीचे सायंकाळी 07.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 February 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 February 2021

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०

****

** मराठी भाषा गौरव दिन आभासी उपक्रमांनी साजरा 

** जालन्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे नवे १७८ रुग्ण

** औरंगाबाद शहरात पंधरा मार्चपर्यंत शाळा, शिकवण्या बंद ठेवण्याचे आदेश

आणि

**`भारतीय खेळणी महोत्सव` हे आत्मनिर्भर भारत निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल - पंतप्रधान नरेंद्र मोदी  

****

आपल्या काव्यप्रतिभेनं मराठी भाषेचा गौरव वाढवणारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते वि. वा. शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन` आज कोरोना विषाणू संसर्ग पार्श्र्वभूमीवर आभासी उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. औरंगाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे प्रसिद्ध लेखक प्रसाद कुमठेकर यांचं प्रसार माध्यमातील मराठी भाषा या विषयावर व्याख्यान होत आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आज १४ पुस्तकांचं प्रकाशन करत आहे. यात मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङ्‍मयाच्या दुसऱ्या खंडाचा, तसंच `लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्‍मय`, `नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह`, `तिकडून आणलेल्या गोष्टी` आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे.

****

आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोना विषाणू संसर्गाचे सोळा हजार ४८८ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात ११३ रुग्णांचा मृत्यू झाला असून बारा हजार ७७१ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. या संसर्गाच्या रुग्णांची एकूण संख्या एक कोटी दहा लाख ७९ हजार ९७९ झाली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव वाढल्यामुळे औरंगाबाद महापालिका प्रशासनानं येत्या पंधरा मार्चपर्यंत सर्व शाळा तसंच खासगी शिकवण्या बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहे. प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आज यासंदर्भातले आदेश दिले आहेत. पाचवी ते नववीचे वर्ग तसंच अकरावीचे वर्ग आणि शिकवण्या या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये औरंगाबादमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे ३४ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात दोन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासानं दिली आहे. या रुग्णालयात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ९९२ झाली आहे. शासकीय रुग्णालयात सध्या २०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचंही प्रशासनानं म्हटलं आहे. 

****

जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या संसर्गानं दगावलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ३९२ झाली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १७८ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता १५ हजार ३२७ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ९७ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातले १४ हजार २५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत तर बाधित असलेल्या ९१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्र्वभूमीवर परभणी जिल्ह्यातली धार्मिक स्थळं येत्या सात मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं आज उपजिल्हा रुग्णालयात भाजी, फळं, मांस विक्रेते तसंच अन्य व्यावसायिकांची कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ चाचणी करण्यात आली. यावेळी सतरा जणांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात एकाही व्यक्तीला या संसर्गाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल नाही.

****

राज्यात आतापर्यंत सुमारे एकोणसाठ हजार जणांचं कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात आलं आहे.  आठ हजार एकशे एक आरोग्य कर्मचारी आणि २३ हजार २७५ आघाडी कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर २७ हजार ४३३ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

****

औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघानं दुधाच्या खरेदी दरात एक रुपयानं वाढ केली आहे. आता दूध उत्पादकांना प्रतिलीटर २८ रुपये दर दिला जाईल. काल झालेल्या संघाच्या बैठकीत दूध भुकटी प्रकल्प उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

****

`भारतीय खेळणी महोत्सव २०२१` हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आज पहिल्या भारतीय खेळणी महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर, भारताच्या पुरातन क्रीडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात, तसंच ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली जातात, त्यामुळे ती सुरक्षितही असतात असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

दक्षिण मध्य रेल्वेतर्फे दोन विशेष साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात येत आहेत. उद्यापासून दर रविवारी मध्यप्रदेशमधील डॉक्टर आंबेडकर नगर ते कर्नाटकमधील यशवंतपूर ही साप्ताहिक रेल्वे सुरू होत आहे. ही गाडी पूर्णा, नांदेड, मार्गे धावणार असून परतीच्या प्रवासात दर मंगळवारी धावणार आहे. विजयवाडा ते शिर्डी साप्ताहिक रेल्वे दर मंगळवारी सिकंदराबाद, विकाराबाद, परळी, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे शिर्डी अशी धावणार असून परतीच्या प्रवासात दर बुधवारी धावणार असल्याचं रेल्वेतर्फे कळवण्यात आलं आहे.

****

अनेक वर्षापासून अहमद नगर-मुंबई-परळी रेल्वेचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. या रेल्वेसाठी साकारण्यात आलेल्या अहमदनगर-आष्टी दरम्यानचा रेल्वेमार्ग कार्यान्वीत करण्याची मागणी अहमदनगरच्या पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि `मेरे देश मे मेरा अपना घर` आंदोलनाच्या वतीन करण्यात आली आहे. रेल्वे क्रांती आंदोलनाचा भाग म्हणून ही मागणी करण्यात आली असून, या मागणीच निवेदन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पाठवण्यात आल्याचं संघटनेनं म्हटलं आहे.

****

पुजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करावी. तसंच वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा तात्काळ घेण्यात यावा, या मागणीसाठी परभणी शहरातल्या वसमत रस्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली आज `रस्ता बंद` आंदोलन करण्यात आलं.

****

नांदेड इथले ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक माधव कृष्ण सावरगावकर यांचं काल रात्री पुण्यात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. `अलोन` या टोपण नावानं ते साहित्य निर्मीती करत. पिपल्स कॉलेज नांदेडचे मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.

****

परभणी-पाथरी रस्त्यावर आज पहाटे चारचाकी आणि दुचाकीमधल्या अपघातात एक जण ठार तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाथरी शहरा जवळ हा अपघात झाला. पोलिस दलाच्या दरोडा प्रतिबंधक विभागाच्या गस्ती पथकानं या अपघातल्या जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.

****

संत शिरोमणी संत रविदास महाराज यांची आज जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन केलं. 'समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मुल्यांचा पुरस्कार करणाऱ्या संत रविदास यांचा मानव धर्मच श्रेष्ठ आहे, हा संदेश मोलाचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

****

सार्वजनिक आरोग्य विभागातली रिक्त पदं भरण्यासाठी उद्या राज्यात परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुभेच्या दिल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गावर मात करून टोपे यांनी पुन्हा काम सुरू केलं असून या परीक्षेतून गुणवत्तेनुसार उमेदवार निवडले जाणार असल्याचं त्यांनी नमुद केलं आहे.

//********//

 

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 27.02.2021 रोजीचा सायंकाळी 06.35 वाजेचा वृत्तविशेष कार्यक्रम प्रासंगिक

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 27.02.2021 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2021 रोजीचे दुपारी 01.30 वाजेचे मराठी र...

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2021 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी ब...

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी बाणा जपू या, असं आवाहन केलं आहे. `छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही, पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच,` या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांनी या निमित्त पुनरुच्चार केला आहे.

****

आपल्या काव्यप्रतिभेनं मराठी भाषेचा गौरव वाढवणारे कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून जगभरातील मराठी भाषा प्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या आठ हजार ३३३ रुग्णांची काल नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या एकूण रुग्णांची संख्या २१ लाख ३८ हजार १५४ झाली आहे. काल या संसर्गाच्या ४८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

****

मराठवाड्यात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या ६८७ रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातल्या चार, नांदेड, बीड तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या परमाणू खनिज अन्वेषण तसंच अनुसंधान निदेशालय हैद्राबाद यांच्यात शैक्षणिक बाबींविषयी पाच वर्षांसाठी सामंजस्य करार झाला आहे. काल एका `ऑनलाईन` कार्यक्रमात याची पूर्तता करण्यात आली.

****

जालना इथं पाटबंधारे विभागात कार्यरत लिपिक महेश बाळकृष्ण रामदासी याला काल तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अंबड तहसील कार्यालयांतर्गत जामखेडचा मंडळ अधिकारी श्रीपाद मोताळे याला काल चार हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली.

//*************//

 

 

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.02.2021 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी सं...

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ:   27  ؍  فروری   2021 ؁وَقت...

آکاشوانی اَورنگ آباد علاقائی خبریں تاریخ: ۲۷ ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ ؍ فروری ۲۰۲۱ئ؁ وَقت: صبح ۰۰۔۹ سے ۱۰۔۹؍ بجے

 Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.

Date : 27 February 2021

Time:  09 : 00 to 09: 10 AM

آکاشوانی اَورنگ آباد

علاقائی خبریں

تاریخ:  ۲۷ ٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗٗ  ؍  فروری  ۲۰۲۱ئ؁

وَقت: صبح  ۰۰۔۹  سے  ۱۰۔۹؍ بجے 


پہلے خاص خبروں کی سر خیاں...

٭

مرکزی وزارت داخلہ نے کورونا وائرس کی روک تھا م کے لیے جاری کی گئی رہنما ہدایات کی  مدت31؍ مارچ تک بڑھائی

٭

ریاست میں کَل مزید8؍ہزار333؍ کورونا مریض پائے گئے ‘ مراٹھواڑے میں 11؍ مریض دوران علاج چل بسے جبکہ مزید674؍ مریضوں کا اندراج

٭

مادری زبان کی پاس داری سبھی کا فرض ہے‘ وزیر اعلیٰ اُدھو ٹھاکرے ‘ آج منایا جا رہا ہے مراٹھی زبان کا دن

 اور

٭

کورونا وائرس کے پھیلائو میں آئی تیزی کے پیش نظر شہر یان کو احتیا طی تدابیر پر

سنجیدگی سے عمل در آمد کرنے کی ضرورت ‘ نگراں وزیر سبھاش دیسائی


اب خبریں تفصیل سے....

مرکزی وزارت ِ داخلہ نے کورونا وائرس کی روک تھام سے متعلق جاری کی گئی احتیا طی ہدایات پر عمل در آمد کی مدت 31؍ مارچ تک بڑھا دی ہے۔وزارت نے کہا ہے کہ کووِڈ19؍ کا پھیلائو  پو ری طرح قابو میں آنے  تک احتیاطی تدابیر پر عمل در آمد کر نا ضروری ہے۔ وزارت نے تمام ریاستوں اور مرکز کے زیر انتظام علاقوں کو  ٹیکہ اندازی کے کام میں تیزی لانے کی صلاح دی ہے۔

***** ***** ***** 

لاتور ضلعے میں شہر یان سے آج اور کَل جنتا کرفیو لگا نے کی اپیل کی گئی ہے۔ ضلع انتظامیہ نے نہایت ضروری کام کے بغیر گھر سے باہر نہ نکلنے کی اپیل کی ہے۔اِس جنتا کرفیو میں زندگی کے لیے لازمی اشیاء کی دکانیں کھلی رہیں گی۔

***** ***** ***** 

ہنگولی ضلعے میں لاک ڈائون کرنے کا فیصلہ نہیں کیا گیا ہے ۔ ضلع کلکٹر روچیش جئے ونشی نے یہ وضاحت کی ہے۔ اُنھوںنے کہا کہ کورونا وائرس کے پھیلائو پر قا بو پانے کے لیے ہر ضروری اقدامات کئے جا ئیں گے۔

***** ***** ***** 

ریاست میں گزشتہ کَل مزید 8؍ہزار333؍ افراد کورونا وائرس سے متاثر ہوگئے۔ اِس اضا فے کے ساتھ ہی ریاست میں اب تک پائے گئے کورونا مریضوں کی مجموعی تعداد 21؍ لاکھ38؍ ہزار

154؍ ہو گئی ہے۔ اِسی دوران کَل 48؍ مریض علاج کے دوران وفات پا گئے ۔ 

دوسری جانب 4؍ہزار936؍ کورونا مریض علاج کے بعد کَل شفا یاب ہو گئے ۔ ریاست میں اب تک 20؍ لاکھ17؍ہزار303؍ کورونا متاثرین علاج کے بعد صحت یاب ہو چکے ہیں۔ فی الحال ریاست میں 67؍ہزار608؍ کورونا مریض زیر علاج ہیں۔

***** ***** ***** 

مراٹھواڑے میں گزشتہ روز 687؍ افراد کورونا وائرس سے متاثر پائے گئے۔ جبکہ

 11؍ مریض دورانِ علاج چل بسے ۔ وفات پا نے والوں میں جالنہ ضلعے کے4؍ ناندیڑ ‘ بیڑ ‘ اور  ا ورنگ آباد ضلعے کے-2 2؍ اور  پر بھنی ضلعے کا ایک مریض شامل ہیں۔ 

اورنگ آباد ضلعے میںکَل247؍ کورونا مریضوں کی موجود گی کا انکشاف ہوا۔ اِسی طرح جالنہ میں 171؍ لاتور میں62؍ ناندیڑ میں75؍ بیڑ میں51؍ پر بھنی میں33؍ ہنگولی میں32؍ اور عثمان آ باد ضلعے میں کَل مزید16؍مریض پائے گئے۔

***** ***** ***** 

وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے نے کہا ہے کہ مادری زبان سبھی کے لیے فخرکی بات ہوتی ہے اور اِس کی پا س د اری کر نا سبھی کا فرض ہے۔مقننہ میں  وی  سا  پا گے  تر بیتی مرکز  اور  شعبہ مراٹھی زبان کی جانب سے یومِ مراٹھی زبان کی منا سبت سے منعقدہ خصوصی سیمینار کا آغاز کَل وزیر اعلیٰ اُدھو ٹھا کرے کے ہاتھوںویڈیو کانفرنسنگ کے توسط سے عمل میں آ یا۔اِس موقعے پر وہ اظہار خیال کر رہے تھے۔اُنھوں نے اپیل کی کہ آئندہ یوم ِ مراٹھی زبان تک مراٹھی زبان کوElite Language  کا درجہ مل جائے

 اِس مقصد سے متحد ہوکر آگے بڑھیں۔اِس موقعے پر وزیر اعلیٰ نے  کُسو ماگرج کی  ’’  مراٹھی ماتی‘‘  نامی

 نظم بھی پڑھ کر سنائی۔

***** ***** ***** 

آج یومِ مراٹھی زبان منا یا جا رہا ہے۔ اِسی مناسبت سے مراٹھی زبان کے وزیر سبھاش دیسائی نے مراٹھی زبان کے پھیلائو ‘ تشہیر اور فروغ دینے کے لیے سبھی سے مراٹھی زبان کا استعمال کرنے کی اپیل کی ہے۔

وہ کَل اورنگ آباد میں یومِ مراٹھی زبان کی مبارکباد  دیتے ہوئے اظہار خیال کر رہے تھے۔ اِس مرتبہ کورونا وائرس کے پھیلائو کو مد نظر رکھتے ہوئے سبھی خصوصی پروگراموں کا آن لائن اہتمام کیا گیا ہے۔ اورنگ آباد میں ڈاکٹر با با صاحیب امبیڈکر مراٹھوارہ یو نیور سٹی کی جانب سے آج شام مشہور مصنف  

پر ساد کُم ٹھے کر  کے لیکچر کا اہتمام کیا گیا ہے اِس کا موضوع ہے  ’’ ذرائع ابلاغ میں مراٹھی زبان‘‘  شام 6؍ بجے  یو نیورسٹی کے فیس بک پیج پر اِس مذاکرے سے مستفیض ہو  سکتے ہیں۔

***** ***** ***** 


***** ***** ***** 

 یہ خبریں آکاشوانی اورنگ آ باد سے نشر کی جا رہی ہیں

***** ***** ***** 


اعلیٰ اور تکنیکی تعلیم کے شعبے نے ریاست میں اِنجینئرنگ  اور  پالی ٹیکنِک کا نصاب انگریزی زبان کے ساتھ ساتھ مراٹھی زبان میں بھی دستیاب کر وانے کا فیصلہ کیا ہے۔ اعلیٰ اور تکنیکی تعلیم کے وزیر اُدئے سامنت نے یہ اطلاع دی ۔ وہ  یومِ مراٹھی زبان کے موقعے پر منعقدہ خصو صی پروگرام کا

ویڈیو کانفرنسنگ کے ذریعے افتتاح کرنے کے بعد اظہار خیال کر رہے تھے۔ 

***** ***** ***** 

اشیاء اور خدمات ٹیکسGST  میں سے سخت شرائط منسوخ کرنے کے مطالبے پر

  Confidration of All Traders   کی جانب سے معلنہ بند کو کَل مراٹھواڑے میں ملی جلی حمایت حاصل ہوئی۔ اورنگ آ باد ضلع ویپا ری مہا سنگھ کے تحت  اِس بند میں 72؍ تنظیموں نے حصہ لیا ۔ ویپا ری مہا سنگھ کے جنرل سیکریٹری لکشمی نا رائن راٹھی نے یہ بات بتائی۔ 

اِسی طرح جالنہ کے نئے مونڈھے میں سبھی  بیو پاریوں  اور  کپڑے کے تاجروں نے کاروبار بند رکھا ۔  بیڑ شہر ضلع ویا پاری مہا سنگھ ‘ شہر کپڑا سنگھ  اور  آدرش مارکیٹ ایسوسی ایشن کی جانب سے بھی بند منا یا گیا۔ ہنگولی میں ضلع ویا پاری مہا سنگھ نے بھی بند منا یا ۔ پر بھنی ضلعے میں کچھ مقامات پر مکمل بند جبکہ کچھ مقامات پر معمو لی کاروبار جاری رہا ۔ ناندیڑ ضلعے میں بھی بند کو ملی جلی حمایت ملی۔

لاتور ضلعے میں ویا پاری مہاسنگھ نے اِس بند کی حمایت کی تاہم آج اور آئندہ کَل جنتا کر فیو ہونے کی وجہ سے تاجروں نے کَل کاروبار جاری رکھا ۔ عثمان آ باد شہر سمیت عمر گہ ‘ بھوم ‘ پرنڈا ‘ واشی‘ کلمب ‘ لوہاراشہر میں کَل پوری طرح بند منا یا گیا۔ 

سبھی علاقوں سے تاجروں کے وفود نے ضلع کلکٹر کی معروفت وزیر اعظم کے نام مکتوب روانہ کئے اِس میں در خواست کی گئی کہ قانون میںایسی ترامیم کی جا ئے جس سے سبھی تاجر آسانی سے  جی  ایس  ٹی فارم بھر سکیں ۔

***** ***** ***** 

رابطہ وزیر سبھاش دیسائی نے کہا ہے کہ کورونا وائرس کے پھیلائو میں آئی تیزی کے پیش نظر شہر یان کو مزید سنجید گی سے قوانین پر عمل در آمد کرنے کی ضرورت ہے ۔ وہ کَل اورنگ آ باد میں کورونا وائرس کی روک تھام کے لیے کئے گئے اقدامات کے جائزاتی اجلاس میں اظہار خیال کر رہے تھے۔

اِس موقعے پر وزیر موصوف نے شہر یان میں ماسک کا استعمال  اور  ہجوم سے گریز کر نا  وغیرہ قوانین پر موثر عمل در آمد سے متعلق اقدمات کرنے کی ہدایت دی۔نگراں وزیر کے ہاتھوں کل پولس کمشنر دفتر میں پولس افسران و ملازمین  کو  Corono Warrior  کی توصیفی سند د سے بھی نوازا گیا۔ 

اِسی دوران نگراں وزیر نے کل شہر میں قائم کئے جا رہے با لا صاحیب ٹھاکرے میمو ریل پارک کا معائنہ کیا ۔ اِس موقعے پر اُنھوں نے انتظامیہ کو اِس جگہ کا خاص خیال رکھنے کی تلقین کی۔ اِس دوران اِس جگہ پر سبھاش دیسائی کے ہاتھوں شجر کاری بھی کی گئی۔

***** ***** ***** 

شیئر بازار میں سر مایہ کاری کا جھانسہ دے کر کئی لوگوں کے کروڑوں روپئے ایٹھنے والے 

 تین افراد کو  ممبئی پولس نے مدھیہ پر دیش کے اندور سے گرفتار کر لیا ہے۔ ناگپور کے ایک فریادی کی جانب سے 17؍ لاکھ 85؍ ہزار روپئے  لوٹے جانے کی شکایت کئے جانے کے بعد اِس معاملے کی چھان بین کے دوران یہ انکشاف ہوا کہ اندور سے یہ ٹو لی شیئر بازار میں سر مایہ کار ی کے نام پر  پورے ملک میں لوگوں کو ٹھگ رہی تھی۔

یہ کار وائی ممبئی کے گِر گائوںسر کل کی سینئر پولس اِنسپکٹر سندھیا رانی بھونسلے   اور  تحقیقاتی افسر پولس اِنسپکٹر  اشوک  اُگلے کی رہنما ئی میں سائبر پولس کے اسسٹنٹ پولس اِنسپکٹر  نو ناتھ چو دھری  اور  اُن کے وفد نے  انجام دی۔

***** ***** ***** 

وزیر اعظم نریندر مودی کَل اتوار کے روز آکاشوانی سے نشر ہونے والے پروگرام من کی بات میں قوم سے خطاب کریں گے۔ اِس سلسلے کی یہ 74؍ ویں قسط ہوں گی ۔ یہ پروگرام آکاشوانی  اور  دور  درشن کے سبھی چینلز پر صبح11؍ بجے نشر کیا جا ئے گا۔

***** ***** ***** 

آخر میں اہم خبروں کی سر خیاں ایک مرتبہ پھر سن لیجیے 


مرکزی وزارت داخلہ نے کورونا وائرس کی روک تھا م کے لیے جاری کی گئی رہنما ہدایات کی مدت31؍ مارچ تک بڑھائی

٭

ریاست میں کَل مزید8؍ہزار333؍ کورونا مریض پائے گئے ‘ مراٹھواڑے میں 11؍ مریض دوران علاج چل بسے جبکہ مزید674؍ مریضوں کا اندراج

٭

مادری زبان کی پاس داری سبھی کا فرض ہے‘ وزیر اعلیٰ اُدھو ٹھاکرے ‘ آج منایا جا رہا ہے مراٹھی زبان کا دن

 اور

٭

کورونا وائرس کے پھیلائو میں آئی تیزی کے پیش نظر شہر یان کو احتیا طی تدابیر پرسنجیدگی سے عمل در آمد کرنے کی ضرورت ‘ نگراں وزیر سبھاش دیسائی

علاقائی خبریں ختم ہوئیں۔

٭٭٭٭٭