Saturday, 27 February 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता

****

मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी मराठी, माझी मराठी बाणा जपू या, असं आवाहन केलं आहे. `छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला, महाराष्ट्राच्या या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळत नाही, पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच,` या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांनी या निमित्त पुनरुच्चार केला आहे.

****

आपल्या काव्यप्रतिभेनं मराठी भाषेचा गौरव वाढवणारे कवीवर्य तात्यासाहेब शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून जगभरातील मराठी भाषा प्रेमींना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या आठ हजार ३३३ रुग्णांची काल नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या एकूण रुग्णांची संख्या २१ लाख ३८ हजार १५४ झाली आहे. काल या संसर्गाच्या ४८ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

****

मराठवाड्यात काल कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या ६८७ रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातल्या चार, नांदेड, बीड तसंच औरंगाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन तर परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

****

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या परमाणू खनिज अन्वेषण तसंच अनुसंधान निदेशालय हैद्राबाद यांच्यात शैक्षणिक बाबींविषयी पाच वर्षांसाठी सामंजस्य करार झाला आहे. काल एका `ऑनलाईन` कार्यक्रमात याची पूर्तता करण्यात आली.

****

जालना इथं पाटबंधारे विभागात कार्यरत लिपिक महेश बाळकृष्ण रामदासी याला काल तीन हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अंबड तहसील कार्यालयांतर्गत जामखेडचा मंडळ अधिकारी श्रीपाद मोताळे याला काल चार हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली.

//*************//

 

 

No comments: