आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
जल शक्ती मंत्रालयाच्या
पेयजल आणि स्वच्छता विभागानं आदर्श स्वच्छ स्थळांच्या चौथ्या टप्प्यात १२ आदर्श स्थळांची
घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातली अजिंठा लेणी, मध्य प्रदेशातलं सांची स्तूप, राजस्थानमधला
कुम्भलगढ तसंच, जैसलमेर किल्ला आणि रामदेवरा, तेलंगणमधला गोवळकोंडा किल्ला आणि ओडिशातल्या
कोणार्क सूर्य मंदिराचा समावेश आहे. या प्रसिद्ध स्थळांना भेट देणाऱ्या देशी आणि विदेशी
पर्यटकांना आकर्षित करून त्यांना चांगल्या सुविधा पुरवण्याचा यामागे उद्देश आहे.
****
अनारक्षित रेल्वे
सेवा सुरु करण्यात आली असून, यु टी एस ऑन मोबाईल हे अॅप पुन्हा सुरु करण्याचा निर्णय
रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. तिकीट केंद्रांवर होणारी गर्दी टाळून आणि सामाजिक सुरक्षित
अंतराचे नियम पाळता यावेत, यासाठी रेल्वे ही सुविधा पुन्हा सुरु करत आहे.
****
होंडा कार्स
या कंपनीच्या गाडीमध्ये त्रुटी आढळल्यानं ग्राहकाला आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा
लागल्यामुळे ग्राहकाला जुनी गाडी परत घेत नवी गाडी देण्याचा आदेश लातूर जिल्हा ग्राहक
मंचानं दिला आहे. गाडी प्रतिलिटर १९ किलोमीटर धावते या कंपनीच्या दाव्याविरोधात ग्राहकानं
वितरकाकडे तक्रार केली होती. त्याला कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यावर या ग्राहकानं लातूर
जिल्हा ग्राहक मंचांकडे दाद मागितली होती.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या
मेहकर तालुक्यातल्या सोनाटी इथं हरभरा काढण्यासाठी गेलेल्या युवकाचा काल मळणी यंत्रात
अडकून मृत्यू झाला. समाधान गिरी असं या युवकाचं नाव असून तो मळणी यंत्रावर कामाला असताना
यंत्राच्या टपात पडल्यानं त्याचा जागीच मृत्यू
झाला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
पैठणच्या गीता मंदिराचे संस्थापक बाजीराव महाराज जवळेकर यांचं काल निधन झालं. ते ८५
वर्षांचे होते. त्यांना समाजभूषण, समाजसेवक, आयुर्वेदाचार्य या पदव्यांनी सन्मानित
करण्यात आलं होतं. पैठण इथल्या वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
नांदेड जिल्ह्यात
राष्ट्रीय पशुधन अभियांतर्गत मुरघास निर्मितीसाठी सायलेज बेलर मशिन युनिट स्थापन करण्यात
येणार आहे. जिल्ह्यातील सहकारी उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, संस्था,
स्वयं सहायता बचतगट आणि गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्थाना या योजनेंतर्गत या मशिनसाठी
अर्थसहाय्य मिळणार आहे.
//****************//
No comments:
Post a Comment