आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत गुपकार पीपल्स अलायन्सचे सर्व
नेते सहभागी होणार असल्याची माहिती, गुपकारचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री
फारुख अब्दुल्ला यांनी दिली. आम्हाला पंतप्रधानांचं निमंत्रण प्राप्त झालं असून, या
बैठकीत जम्मू-काश्मीरबाबतची भूमिका मांडायची असल्याचं ते म्हणाले. गुपकार आघाडीच्या
निर्णयाचं प्रदेश भाजपनं स्वागत केलं आहे.
****
केंद्रीय
माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसई १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांची
वैकल्पिक परीक्षा घेणार असल्याची माहिती, सीबीएसईतर्फे काल न्यायालयात देण्यात आली.
जे विद्यार्थी मूल्यांकन निकषांवर नाराज आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा होणार
असून, यात उमेदवाराने मिळवलेले गुण अंतिम मानले जाणार आहेत.
****
राज्य
सरकार इतर मागासवर्गीय- ओबीसीच्या विरोधात काम करत आहे, असा आरोप, भारतीय जनता पक्षाचे
नेते, माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केला आहे. अकोल्यात ते काल
वार्ताहरांशी बोलत होते. आघाडी सरकारनं फडणवीस सरकारच्या अध्यादेशाला, विधानसभेत मान्यता
देऊन त्याला नियमित करण्याची गरज होती. मात्र सरकारनं पाठपुरावा तर केला नाही, उलट
न्यायालयानं संधी दिल्यावरही पुरावा मांडला नाही, असा आरोप अहिर यांनी केला.
****
कृषी
विज्ञान केंद्र आणि जिल्हा कृषी विभाग उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमान आधुनिक
तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यात २१ जून ते एक जुलै या कालावधीत
कृषी संजिवनी मोहिम राबवण्यात येत आहे. या कालवधीत प्रत्येक दिवशी महत्वाच्या मोहिमांवर
विशेष भर देऊन प्रचार आणि प्रसिध्दी करण्यात येत आहे. या मोहिमे दरम्यान कृषी विभागाच्या
महत्वाच्या योजनांची माहिती ब्लॉग स्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
****
नांदेडच्या
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित आणि प्रयोगजीवी कला संकुलच्या वतीनं
काल जागतिक संगीत दिनाच्या निमित्तानं स्वरसभा तसंच व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात
आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांचे हस्ते
झालं.
****
No comments:
Post a Comment