आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
आर्थिक
गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं आज सकाळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी छापा मारला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवानही
याठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. सचिन वाझे प्रकरणात याआधीही केंद्रीय अन्वेषण विभाग
- सीबीआयनं देशमुख यांची चौकशी केली होती.
****
भारतात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वेगानं सुरू असून, आतापर्यंत ३० कोटी ७९ लाख ४८ हजार ७४४
जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. काल दिवसभरात पहिली आणि दुसरी मात्रा
मिळून ६० लाख ७३ हजार ९१२ जणांचं लसीकरण करण्यात आलं.
****
कृष्णा
मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला परवानगी देण्यात आली असून, जून २०२३
पर्यंत उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल,
अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. उस्मानाबाद इथं जिल्ह्यातल्या पाटबंधारे
विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
राज्यात
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी वैकल्पिक सामाईक प्रवेश परीक्षा - सीईटी घेण्याचा निर्णय,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानं घेतला आहे. ही परीक्षा
पूर्णत: ऐच्छिक असून, राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.
****
राज्यात
गेल्या २२ तारखेपर्यंत खरिपाच्या सुमारे २७ टक्के पेरण्या झाल्या असल्याची माहिती,
कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन, आणि जमिनीतला ओलावा
पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
जळगाव
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस प्रकाराचे आढळलेले सातही रुग्ण बरे असून,
खबरदारीचा उपाय म्हणून येत्या तीन दिवसात शंभरापेक्षा अधिक नमुने दिल्ली इथं तपासणीसाठी
पाठवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या रामपुरी बुद्रुक या हरित ग्राम ग्रामपंचायतीमध्ये
वटपौर्णिमेनिमित्त युवकांनी सपत्नीक शंभर वटवृक्षाच्या लागवडीचा उपक्रम राबवून समाजासमोर
अनोखा आदर्श निर्माण केला आहे. वृक्षवल्ली फाउंडेशनच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात
आला.
****
No comments:
Post a Comment