आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय
औषध नियामकांनी मॉडर्ना या कोविड लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. या लसीच्या
दोन मात्रा दिल्या जाणार असल्याचं, नीति आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी सांगितलं.
देशात आता कोविड प्रतिबंधासाठी कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सीन, स्पुटनिक व्ही, आणि मॉडर्ना
या चार लसी उपलब्ध आहेत.
****
महाराष्ट्रात
डेल्टा प्लस प्रकाराचे सर्वाधिक नऊ रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले असून, या विषाणूची
बाधा झाल्यानं पहिला मृत्यूदेखील, रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात झाला
होता. मात्र आता संगमेश्वर तालुक्यातल्या तीन मुलांनी डेल्टा प्लस संसर्गावर यशस्वी
मात केली असल्याचं, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र
गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाद्वारे, ई-बिलिंग संगणकीय प्रणालीचा
प्रारंभ; काल राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते झाला. सेवाशुल्क
देण्यासाठी ई-बिलिंग संगणकीय प्रणालीची सुरवात हा म्हाडासाठी एक ऐतिहासिक निर्णय असून,
नागरिक केंद्रित प्रशासनाचं उत्तम उदाहरण असल्याचं, आव्हाड म्हणाले.
****
चालू
शैक्षणिक वर्षासाठीची शालेय पाठ्यपुस्तकं पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. सर्वात
आधी आदिवासी भागात पाठ्यपुस्तकांचं वाटप केलं जाणार आहे. राज्यभरात अनेक शाळांनी १५
जूनपासून ऑनलाईन अध्यापन सुरू केलं आहे, मात्र विद्यार्थ्यांना नवीन वर्गाची पाठ्यपुस्तकं
अद्याप मिळू शकलेली नाहीत.
****
औरंगाबाद
शहरातल्या ऐतिहासिक बिबी-का-मकबऱ्यासमोरील अडीच एकर जागेवरचं अतिक्रमण महापालिकेच्या
अतिक्रमण हटाव पथकानं काल दूर केलं. या जागेवर दोन शाळा सुरू होत्या तसंच टपऱ्या, सिमेंटचे
खांब लावून जागेचा ताबा घेण्यात आला होता. ही जागा मोकळी करून जागेचा ताबा पुरातत्त्व
विभागाला देण्यात आला. या कारवाईला विरोध करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेत, पोलिसांनी
कारवाई पूर्ण केली.
****
परभणी
इथल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, सोनपेठ इथल्या सर्वोदय लोकसंचलीत साधन केंद्र यांच्या
वतीने सोनपेठ इथं अल्प दरात सोयाबीन बियाणे, खत, औषधें आणि फळझाडे वाटप करण्यात आले.
****
No comments:
Post a Comment