आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ सप्टेंबर २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
ऑक्टोबर महिन्यात
कोविड प्रतिबंधक लसीच्या ३० कोटींहून अधिक मात्रांची निर्मिती होणार असून, त्यानंतर
महिन्याला १०० कोटी मात्रांचं उत्पादन होईल अशी माहिती, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख
मांडवीय यांनी दिली आहे. इतर देशांना कोविड प्रतिबंधक लस निर्यात करण्याच्या “व्हॅक्सीन
मैत्री” या उपक्रमाला, पुढच्या महिन्यापासून पुन्हा सुरुवात होणार असल्याची घोषणाही,
त्यांनी केली. लसीच्या अतिरीक्त मात्रा इतर देशांना निर्यात करणार असल्याचं मांडवीय
यांनी सांगितलं.
****
शनिवारपासून
दहशतवादविरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या संशयित झाकीर हुसैन याला मुंबईतल्या विशेष
न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात रविवारी अटक केलेल्या
रिझवान मोमीन यालाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
परभणी जिल्ह्यात
सोनपेठ तालुक्यातल्या डिघोळ तांडा इथल्या सामुहिक बलात्कारानं पीडित तरुणीनं आत्महत्येचा
प्रयत्न केला. तिच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १२ सप्टेंबरला
ही घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी पोस्कोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला
असून, पोलिस अधीक्षकांनी वेगानं तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात
श्रीरामपूर तालुक्यात कान्हेगाव इथं काल तीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. हे
तिघे खेळण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र पोहता येत नसल्यानं तिघांचाही बुडून मृत्यू
झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात
सांगोला इथं काल शेततळ्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला. पाय घसरून शेततळ्यात पडलेल्या
पत्नीला वाचवण्यासाठी पतीनेही शेततळ्यात उडी घेतली, मात्र दोघांनाही पाण्यावर न येता
आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला.
****
हिंगोली जिल्ह्यात
वसमत तालुक्यातल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा अॅड.शिवाजीराव
जाधव यांची निवड झाली आहे. ते दहा विरुद्ध सहा मतांनी निवडून आले. राजीनामा दिल्यानंतर
जाधव यांनी पुन्हा निवडणूक लढवली.
****
मराठवाड्यात
काल १२१ नवीन कोविड बाधितांची नोंद झाली, तर पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment