आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
तेलंगणा - छत्तीसगढ
सीमेवर आज सकाळी झालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी मारले गेले. त्यापैकी सहा जणांचे मृतदेह
सापडले असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
काश्मिर खोऱ्यात
काल सुरक्षा दलानं दहशतवाद्यांविरूद्ध केलेल्या कारवाईत, ‘आय एस जे के’चा दहशतवादी
रफीक अमहद याच्यासह पाच दहशतवादी ठार झाले.
दरम्यान, काल
जम्मू-काश्मीर मध्ये पुलवामा जिल्ह्यातल्या एका पोलीस ठाण्यावर काल दहशतवाद्यांनी ग्रेनेड
हल्ला केला. यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यानंतर, हल्लेखोरांच्या शोधासाठी
परिसरात नाकाबंदी करण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांनी काल मन की बात या कार्यक्रमात
ही माहिती दिली. या चर्चेसाठी आजपासून २० जानेवारी पर्यंत माय जी ओ व्ही डॉट इन या
संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. यामध्ये नववी ते बारावीचे विद्यार्थी, पालक आणि
शिक्षकांसाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, यात मोठ्या संख्येनं सहभागी
होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांच्या हस्ते काल विविध क्षेत्रातल्या दिग्गजांना, महाराष्ट्राची गिरीशिखरे
हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या हीरक वर्षाच्या समारोपानिमित्त, पिपल्स
आर्ट सेंटरच्या वतीनं हे पुरस्कार देण्यात आले. प्रसिद्ध गायिका उषा मंगेशकर, शास्त्रीय
गायिका आशा खाडिलकर, गजल गायक भीमराव पांचाळ, पार्श्वगायक सुरेश वाडकर, संगीतकार अशोक
पत्की, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्यासह अनेक मान्यवरांना, यावेळी गौरवण्यात आलं.
****
नागालँड इथं
होणाऱ्या ५६ व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्यातून ३२ खेळाडूंची निवड करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातल्या जत इथं निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये राज्यातून सातशे
पाच खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते यावेळी
विजेत्या खेळाडूंना बक्षीसं प्रदान करण्यात आली.
****
मराठवाड्यात
काल २९ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर औरंगाबाद जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
No comments:
Post a Comment