आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८डिसेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधीमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानानं
घेण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल आमान्य केला.
या आक्षेपानंतर राज्य सरकारकडून पुन्हा राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात, सरकारने नियमात
केलेले बदल योग्यच असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने सर्व सदस्यांना
आज विधीमंडळात हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केलं आहे.
****
त्रुटीपूर्तता
आणि अनुदाना अभावी राज्यातली कोणतीही शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण
मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल विधानपरिषदेत दिली. याबाबत वित्त विभागाकडून अभिप्राय
मागवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल असंही त्यांनी
सांगितलं.
****
१०० कोटी रूपयांच्या
खंडणी प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत सक्तवसुली
संचालनालयानं १४ दिवसांची वाढ केली आहे. १२ नोव्हेंबरला त्यांना अटक केल्यानंतर ते
मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहेत.
****
पंढरपूर इथल्या
विठ्ठल मंदिरात भाविकांना आता रात्री नऊ वाजेपर्यंतच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार
असून, दर्शन रांग दररोज रात्री साडे आठ वाजता बंद केली जाणार आहे. शिर्डी इथलं साईबाबा
मंदीरही आता सकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेतच दर्शनासाठी खुलं राहणार आहे.
****
औरंगाबाद शहरात
पोलीस आयुक्त डॉ निखील गुप्ता यांच्या आदेशानं प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले
आहेत. मध्यरात्रीपासून येत्या नऊ जानेवारीपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.
****
परभणी जिल्ह्यातल्या
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातले युवा नेते संतोष मुरकुटे यांनी काल भारतीय जनता पक्षात
प्रवेश केला. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या या प्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर
भागवत कराड उपस्थित होते.
****
पंढरपूर तालुक्यात
पोलिसांनी दोन बालविवाह रोखले. दोन्ही घटनेतल्या अल्पवयीन मुलींना सोलापूरच्या महिला
आणि बालकल्याण समितीकडे सोपवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment