आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३१ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
दहा दिवसीय गणेशोत्सवाला
आजपासून सुरवात होत आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या मोठ्या गणेशमूर्ती मंडपात
आणल्या असून आज त्यांची विधीवत प्रतिस्थापना करण्यात येईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,
उपराष्ट्रपती जगदीप धनखड ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गणेशोत्सवानिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनीही सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
***
राज्यातल्या
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनातर्फे स्पर्धेचं आयोजन करण्यात
आलं आहे.अधिकाधिक मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता यावा यासाठी २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
***
सांगली जिल्ह्यातील
मिरज शहरात ३५० सार्वजनिक मंडळात आज गणेशमूर्तींची प्रतिस्थापना होत आहे.शहरात गणेश
चतुर्थीच्या पूर्व संध्येला अनेक मंडळांच्या उंच गणेशमूर्तींच आगमन सह वाद्य मिरवणुकांसहित
करण्यात आलं. यावर्षी गणेशोत्सव साजरा करताना शासनाने निर्बंध शिथिल केल्याने अनेक
मंडळ उंच गणेश मूर्तीची प्रतिस्थापना करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***
केंद्र सरकारच्या
माध्यम शब्दकोश निर्मिती समितीमध्ये सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विभागाचे प्रमुख
डॉ. रवींद्र चिंचोलकर यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयातर्फे निवडीचं पत्र
चिंचोलकर यांना देण्यात आलं आहे. या समितीची येत्या ५ ते ९ सप्टेंबर दरम्यान वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
हिंदी विद्यापीठात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
***
आशिया चषक क्रिकेट
स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. या स्पर्धेतला भारतीय संघाचा
हा दुसरा आणि अखेरचा साखळी सामना असेल. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.
***
येत्या २४ तासात
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात काही भागांत विजांसह पावसाचा अंदाज
हवामान खात्याने वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment