आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
किल्ले प्रतापगड इथं शिवप्रताप दिनानिमित्त आज मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित केलेले विविध
कार्यक्रम जल्लोषात सुरू आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि पोलीस अधीक्षक
समीर शेख यांनी गडावरील भवानीमातेची पूजा करत अभिषेक केला. यानंतर गडावरील ध्वजस्तंभाचं
पूजन झालं.
****
टोयोटा किर्लोस्कर मोटारचे उपाध्यक्ष विक्रम एस
किर्लोस्कर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, ते ६४ वर्षांचे होते. ऑटोमेकरने
याबाबत माहिती दिली. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
विक्रम किर्लोस्कर यांच्या पार्थिवावर आज बंगळुरुमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार
आहेत.
****
देशातून निर्यात झालेल्या मोबाइल फोन्सची संख्या
गेल्यावर्षीच्या तुलनेत चालु आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान दुप्पट झाल्याबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सात महिन्यांमध्ये भारतानं
पाच बिलियन डॉलर किंमतीचे मोबाइल फोन निर्यात केले आहेत. उत्पादन क्षेत्रात भारताची
घोडदौड सुरूच असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
केंद्र सरकारच्या जीईएम या ऑनलाइन मंचावरून आर्थिक
वर्ष २०२२-२३ मध्ये आत्तापर्यंत झालेल्या विक्रीनं एक लाख कोटीचा टप्पा पार केला आहे.
विविध मंत्रालयं आणि विभागांनी या मंचावरून उत्पादनं आणि सेवांची खरेदी केल्यामुळे
ही वाढ झाली आहे.
****
भारतीय प्रशासकीय सेवेतल्या माजी अधिकारी प्रीती
सुदन यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या सदस्य म्हणून पद आणि गोपनीयतेची
शपथ घेतली. केंद्रीय लोक सेवा आयोगाचे अध्यक्ष डॉ मनोज सोनी यांनी त्यांना शपथ दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान क्राईस्टचर्च इथं सुरु असलेल्या तिसऱ्या
एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर २२० धावांचं
लक्ष्य ठेवलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघ ४८ व्या षटकात २१९ धावांवर सर्वबाद
झाला.
****
कतार इथं सुरु असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत
नेदरलँड आणि सेनेगल संघांनी अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं आहे. काल झालेल्या सामन्यात
नेदरलँड्सने कतारचा दोन - शून्य असा, तर सेनेगलनं इक्वेडोरचा दोन - एक असा पराभव केला.
//**********//
No comments:
Post a Comment