आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ जूलै २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाची
बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार या बैठकीत सहभागी झाले
होते. संसदेत कामकाजादरम्यान होत असलेल्या गदारोळाबद्दल तसंच विरोधी पक्षांना प्रत्यूत्तर
देण्याच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाली.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी
सह सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. सरसंघचालक डॉ मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय
होसबाळे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि उमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदनदास देवी यांच्या पार्थिव देहाचं
अंत्यदर्शन घेतलं.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडे
तिनशेव्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक ३५० चं बोधचिन्ह, राज्यातल्या सर्व शासकीय पत्रव्यवहारात वापरण्यात येणार
आहे. यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
परभणी विधी आणि सेवा प्राधिकरण तसंच
परभणी जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त काल
कायदेविषयक जनजागृती व्याख्यान घेण्यात आलं. प्राधिकरणाचे सचिव एस. जी. लांडगे यांनी
यावेळी विधी सहायविषयक माहिती दिली. यावेळी विधिज्ञ अमोल गिराम यांनी भारतीय राज्यघटनेत
नमूद कलमांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
नांदेड इथून सुटणारी नांदेड ते लोकमान्य
टिळक टर्मिनस मुंबई विशेष रेल्वे काल रद्द करण्यात आली होती, परिणामी आज लोकमान्य
टिळक टर्मिनस मुंबई इथून नांदेडला येणारी ही गाडी रद्द असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या
नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
****
उस्मानाबाद इथं काल रात्रीपासून रिमझिम
स्वरूपाचा पाऊस होता, आज सकाळी मात्र या पावसाने जोर धरला
आहे.
****
No comments:
Post a Comment