आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ जूलै २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रांचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लोकार्पण होत आहे. राजस्थानातल्या सिकर इथं होणाऱ्या या कार्यक्रमात, देशभरातल्या सुमारे दोन लाख ८० हजार खत विक्री दुकानांचं, पंतप्रधान किसान समृद्धी केंद्रामध्ये रुपांतर होणार आहे.
***
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज आठव्या
दिवशी राज्यसभेत माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे छायाचित्रण निर्माण
संशोधन विधेयक २०२३ मांडणार आहे. या विधेयकात चित्रपट क्षेत्रात वाङमयचौर्य मुद्दाबाबत
लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळं धरणात पाण्याची आवक वाढली आहे.
धरणात सध्या सात हजार ९२५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत आहे.
****
यवतमाळ जिल्हयात पावसामुळं सर्वच
शाळा बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत.
नागपूरमध्येही जोरदार वादळी पावसानं
अनेक भागात पाणी साचल्यामुळं अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात पुरेश्या पावसाअभावी
आतापर्यंत ७५ टक्केच खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यामुळं या भागात अजुनही पावसाची
प्रतीक्षा आहे.
****
जालना जिल्ह्यात अंबड पोलिस ठाण्याच्या
हवालदाराला दोन हजार रुपयांची लाच स्विकारतांना काल अटक करण्यात आली. महादू अप्पाराव
पवार असं त्याचं नाव असून, तक्रारदाराच्या पालकांवर प्रतिबंधक
कारवाई न करण्यासाठी आणि अदखलपात्र गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली
होती.
****
जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये
भारताच्या लक्ष्य सेननं उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं आज उप उपांत्यपूर्व
फेरीच्या सामन्यात जपानच्या कांता सुनेयामावर २१-१४, २१-१६
अशी सहज मात केली.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन
एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज बार्बाडोस
इथं खेळला जाणार असून, भारतीय वेळेमुसार संध्याकाळी सात
वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
No comments:
Post a Comment