Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 28 September
2023
Time: 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ सप्टेंबर २०२३
सकाळी
७.१० मि.
****
· शिवसेना
आमदारांच्या अपात्रता याचिकांवर सहा ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान सुनावणी
· नांदेड, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि
बारामती इथल्या विमानतळांचा ताबा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेण्याचे निर्देश
· आज अनंत चतुदर्शी, राज्यभरात गणपती
विर्सजनाची जय्यत तयारी, उद्या ईद-
ए- मिलाद निमित्त राज्यशासनाकडून
सुटी जाहीर
आणि
· आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची काल दोन सुवर्णांसह सात
पदकांची कमाई
****
शिवसेना
आमदार अपात्रता याचिकांवर सुनावणीच्या कामकाजाचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी निश्वित केलं आहे. येत्या सहा ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान
अपात्रता याचिकांवर युक्तिवाद चालणार आहे. अपात्रतेच्या सर्व याचिकांवरची सुनावणी
एकत्रित घ्यायची की वेगवेगळी, याबाबत १३ ऑक्टोबरला सुनावणी होईल, त्यावर २०
ऑक्टोबर रोजी विधानसभा अध्यक्ष आपला निर्णय जाहीर करतील. २३ नोव्हेंबरपासून उलट
तपासणीच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर दोन
आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाणार असल्याचं विधिमंडळ सचिवालयानं
कळवलं आहे.
****
नारीशक्ती
वंदन अधिनियम २०२३ संदर्भात लोकसभेत झालेल्या मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहून, पक्षादेश - व्हीप
डावलणाऱ्या शिवसेना खासदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा, शिवसेना
लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिला आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत
बोलत होते.
संसदेच्या
या विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी खासदार भावना गवळी यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना
व्हीप जारी केला होता. मात्र शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला
समर्थन देणारे विनायक राऊत, राजन विचारे, ओमराजे
निंबाळकर आणि संजय जाधव हे चार खासदार, व्हीपचं उल्लंघन करून सभागृहात
अनुपस्थित राहिले. या चारही खासदारांचं निलंबन करण्याबाबतही
कायदेशीर सल्ला घेत असून याबाबत लोकसभाध्यक्षांना निवेदन देणार असल्याचं शेवाळे
यांनी सांगितलं.
****
राज्यात
नांदेड,
लातूर, उस्मानाबाद, यवतमाळ आणि
बारामती इथल्या विमानतळांचा ताबा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने
घेण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
यासाठीची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र
औद्योगिक विकास महामंडळाने या पाच विमानतळांची उभारणी सुरू केली होती, या
प्रक्रियेला वेग देण्याच्या दृष्टीने या पाच विमानतळांचं खासगी कंपनीकडे हस्तांतरण
करण्यास २००९ मध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र, गेल्या १४
वर्षांत याठिकाणी विमानसेवा सुरु होऊ शकली नाही. त्या पार्श्वभूमीवर
काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यात दळणवळणाचा
विकास तसंच महानगरांतील विमानतळांवरील भार कमी करण्यासाठी राज्याच्या उर्वरित
भागात,
विशेषत: छोट्या
शहरांमध्ये विमान सेवा सुरु करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
छत्रपती
संभाजीनगर महानगरात गॅस पाईपलाईनचं काम येत्या एक डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे
निर्देश,
केंद्रीय
अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं काल जिल्हाधिकारी
कार्यालयात गॅस पाईपलाईन कामाचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. सिलिंडरच्या तुलनेत
कमी दरात मिळणारा हा गॅस पर्यावरणपूरक आहे, या गॅसची गळती
झाल्यास,
तो
तात्काळ हवेत विरघळतो, अशी माहिती त्यांनी दिली. पाईपलाईनद्वारे
मिळणारा गॅस सध्याच्या सिलेंडरमध्ये मिळणाऱ्या गॅसच्या दरापेक्षा ३० ते ३५
टक्क्यांपर्यत स्वस्त असेल. गॅस पाईपलाईनच्या कामातल्या अडचणी
सोडवण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचं कराड यांनी सांगितलं.
****
आज अनंत चतुदर्शी, गेल्या १०
दिवसांपासून भक्ती आणि उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा आज समारोप होत असून, या
पार्श्वभूमीवर राज्यभरात विर्सजनाची जय्यत तयारी झाली आहे.
विसर्जन
मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या
वातावरणात गणेश विसर्जन करावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं
आहे. गणेश मंडळांनी विसर्जन मार्ग आणि आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्यास
प्रशासनाला मदत करावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्र्यांनी
ईद-ए-मिलाद निमित्तही जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ईद-ए-मिलादचं
पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस
लागावा,
असं
मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
****
राज्य सरकारने
ईद-
ए- मिलादची सुटी
आजच्या ऐवजी उद्या जाहीर केली आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने
यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. अनंत
चतुर्दशी तसंच ईद ए मिलादनिमित्त राज्याच्या विविध भागात मिरवणुका काढण्यात येत
असतात. हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस
यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन ईदची सुटी उद्या शुक्रवारी देण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरात महानगरपालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाची चोख तयारी केली
आहे.
शहराच्या
विविध भागात असलेल्या विसर्जन विहिरींच्या ठिकाणी आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली
असून,
भाविकांच्या
गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. शहराच्या विविध
भागात गणेश मूर्ती तसंच निर्माल्य संकलनासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास
टाळण्यासाठी गणेश मूर्ती महानगरपालिका प्रशासनास दान करण्याचं आवाहन मनपा प्रशासक जी
श्रीकांत यांनी केलं आहे. त्यांनी काल दूरदृष्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून
बैठक घेत विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
****
नांदेड
शहरासह १८ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. नागरिकांनी आपल्या
गणेश मूर्ती या संकलन केंद्रावर देण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं
आहे. पोलीस दलाच्या वतीने विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी बंदोबस्त ठेवला
जाणार आहे. विसर्जनादरम्यान शहरात वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, आजचे आठवडी
बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
****
बीड इथं गणेश
विसर्जन तसंच ईद ए मिलाद कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य
करावं,
असं
आवाहन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं आहे. जिल्हाभरात जवळपास तेराशे गणेश
मंडळ आहेत,
या
पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्तासह गृहरक्षक दलाच्या ७०० जणांची अतिरिक्त कुमक
पोलिस विभागाला उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
****
चीनमध्ये सुरू
असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत
भारताच्या खेळाडूंनी काल दोन सुवर्ण पदकांसह सात पदकांची कमाई केली.
महिलांच्या नेमबाजी
स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रकारात सिफतकौर समराने सुवर्ण पदक, तर आशी चौकसीनं
कांस्य पदक जिंकलं. ५० मीटर रायफल प्रकारात महिला संघाने रौप्य पदक पटकावलं. नेमबाजीतच २५
मीटर पिस्तुल प्रकारात भारताच्या महिला संघाने सुवर्ण पदक पटकावलं. तर याच प्रकारात
ईशा सिंह हिने रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या संघाने स्कीट स्पर्धेत कांस्य
पदक,
तसंच
नौकायन स्पर्धेत डोंगी प्रकारात विष्णू सर्वानन याने कांस्य पदक पटकावलं.
या स्पर्धेत पाच
सुवर्ण,
सात
रौप्य आणि १० कांस्य पदक, अशी एकूण २२ पदकं मिळवत भारतीय संघ पदकतालिकेत
सध्या सहाव्या क्रमांकावर आहे.
****
ऑस्ट्रेलियाविरुद्ध
राजकोट इथं काल झालेल्या तिसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताला ६६ धावांनी पराभव
पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियानं
प्रथम फलंदाजी करत निर्धारीत षटकांत सात बाद ३५२ धावा केल्या, प्रत्यूत्तरादाखल
भारतीय संघ शेवटच्या षटकात २८६ धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज
ग्लेन मॅक्सवेल सामनावीर पुरस्काराचा, तर शुभमन गील मालिकावीर पुरस्काराचा
मानकरी ठरला.
तीन
सामन्यांची ही मालिका भारतानं दोन - एकनं जिंकली आहे.
****
धाराशिव
जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी विविध यंत्रणांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या
विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश, केंद्रीय
वस्त्रोद्योग विभागाच्या सहसचिव तथा आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या प्रभारी
अधिकारी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले आहेत. आकांक्षित
जिल्हा कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या. आरोग्य, पाणी पुरवठा, शेतकर्यांच्या
विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
****
नांदेड इथला अनेक
वर्षापासून फरार असलेला गूंड अबू शूटर याला काल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी
थरारक कारवाई करत अटक केली. अबू हा दुपारच्या सुमारास डी मार्ट परिसरात आला असता, पोलिसांनी त्याचा
पाठलाग केला,
मात्र
हवेत गोळीबार करूनही तो न थांबल्यानं, पोलिसांना त्याच्यावर गोळी
झाडावी लागली.
जखमी
झालेल्या अबूला पोलिसांनी ताब्यात घेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
****
कोल्हापूर
महानगरपालिकेच्या हिंद विद्यामंदिर इथं काल मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत 'अमृत कलश यात्रा' काढण्यात
आली.
****
No comments:
Post a Comment