आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ सप्टेंबर २०२३ सकाळी ११.००
वाजता
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे.
जगभरात पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो.
पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची संकल्पना आहे.
****
आधार हे वैयक्तिक ओळखीचं विश्वासार्ह
साधन असल्याचं केंद्र रकारने म्हटलं आहे. आधारच्या विश्वासार्हतेबद्दल मूडीज या गुंतवणूकदार
सेवा कंपनीनं केलेल्या विधानाचं सरकारने खंडन केलं आहे. कंपनीनं कोणत्याही ठोस पुराव्याविना
आधारवर टीका न करता आपल्या अडचणींचं निवारण करण्यासाठी आधार प्राधिकरणाकडे संपर्क साधायला
हवा होता, असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे. माहिती खासगी राखण्यासाठी
भारतीय संसदेनं कठोर कायदे केले आहेत, असं सरकारने म्हटलं आहे.
****
क्षयरोगावरच्या औषधांचा तुटवडा निर्माण
झाल्याचं वृत्त निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं
आहे. ६ महिन्याहून जास्त काळासाठी पुरेल एवढा औषध साठा सध्या उपलब्ध असून, अगदी क्वचित राज्य सरकारांना मर्यादित काळासाठी औषधं खरेदी
करण्याची विनंती केली जाते, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
'आदिवासी विकास आणि संशोधन' या
विषयावर राज्यातल्या विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या दुसऱ्या परिषदेचं उदघाटन, काल मुंबईत राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झालं. आदिवासी
विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातला टक्का वाढवण्यासाठी या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं
सुरू करावीत, तसंच त्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबत
विचार करावा, अशी सूचना, राज्यपालांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज विभागीय
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विलंब, गैरव्यवहार, अकार्यक्षमता
आणि इतर कारणांनी होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या तक्रारी या समितीकडून स्वीकारण्यात
येतात आणि त्यांच्या स्थानिक चौकशीची तजवीज करण्यात येते. सकाळी साडेअकरा वाजता विभागीय
आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या करचुंडी गावातून
साडे सोळा लाख रुपये किमतीचा गांजाचा मोठा साठा काल जप्त करण्यात आला. याप्रकरणी चार
जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment