Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 03 December 2020
Time 18.00 to 18.10
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०3 डिसेंबर २०२० सायंकाळी ६.००
****
** पदवीधर आणि शिक्षक मतदार
संघ निवडणुकीची मतमोजणी सुरू
** राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ तारखेला मुंबईत
**
कोरोना विषाणू संसर्गामुळे औरंगाबादमध्ये तीन रुग्णांचा मृत्यू
आणि
**
दिल्लीत सुरू शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं
****
राज्यात
पदवीधर तसंच शिक्षक मतदार संघाच्या परवा झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता
सुरु झाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी, औरंगाबाद इथल्या चिकलठाणा
औद्योगिक वसाहतीत होत आहे. या मतदार संघात एकूण १ हजार २४८ मतदान टपालानं झालं आहे.
त्यापैकी १७५ मते अवैध ठरली आहेत. वैध ठरलेल्या १ हजार ७३ मतांची मोजणी सुरु करण्यात
आली आहे. रात्री आठ वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल येण्याची शक्यता आहे. अमरावती
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पहिल्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना
सर्वाधिक ३ हजार १३१ मत मिळाली आहेत तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना २
हजार ३०० मतं मिळवून दुसऱ्या स्थानी आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात एकोणीस उमेदवार
रिंगणात असून मुख्य लढत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संदीप जोशी आणि महाविकास आघाडीतर्फे
काँग्रेसचे उमेदवार अभीजित वंजारी यांच्यात आहे. पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीचा
निकाल हाती येण्यासाठी पहाटेचे पाच वाजण्याची शक्यता अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंग
देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
****
धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषदेच्या
पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे. पटेल
यांना ३३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना ९८ मतं मिळाली.
****
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ तारखेला मुंबईत होणार आहे.
याआधी हे अधिवेशन येत्या सात तारखेपासून नागपूर इथं होणार होतं. कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना
विषाणू संसर्गामुळे दोन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार १५३ रुग्णांचा या
संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातले ४१ हजार ३८८ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली आहे. सध्या
एक हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात हा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ५७२ झाली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज
कोरोना विषाणू संसर्गामुळे तीन रुग्णांचा मृत्यू
झाला असून मृत्यूंमुखी पडलेल्या
एकूण रुग्णांची संख्या ३२३ झाली
आहे. आज दिवसभरात या
संसर्गाचे १६ नवे रुग्ण आढळले
असून एकूण रुग्णसंख्या बारा हजार ५०० झाली आहे. उपचारानंतर
कोरोना विषाणूमुक्त झालेल्या नऊ रुग्णांना आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यातले अकरा हजार ८१४ रुग्ण या
आजारावर उपचार घेऊन बरे झाले आहेत तर ३६४
रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
****
देशात
काल दिवसभरात नव्यानं कोरोना विषाणू संसर्ग होणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत
वाढ झाली आहे. या काळात ३५ हजार ५५१ व्यक्तींना संसर्ग झाला आहे. तर ४०
हजार ७२६ रूग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेले
सहा दिवस सातत्यानं नव्या रूग्णांच्या
तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढत आहे. देशात
एकूण रूग्णांच्या तुलनेत सक्रिय रूग्णांची
संख्या चार पूर्णांक पाच दशांश टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. या
संसर्गाच्या रूग्णांची एकूण संख्या चार
लाख २२ हजार ९४३ आहे. एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांची टक्केवारी चार
पूर्णांक ४४ शतांश टक्के आहे.
****
केंद्र
सरकारच्या सुधारीत कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरु
असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज शेतकऱ्यांसोबत चौथ्या टप्प्यातली
चर्चा केली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंह बादल
यांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध आणि या आंदोलनला पाठिंबा देण्यासाठी आपला पद्मविभूषण
पुरस्कार परत केला. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस आणि अन्य संघटनांनी राज्यात
ठिकठिकाणी आंदोलनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आदोलन आणि निदर्शनं
करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांनी याचं नेतृत्त्व केलं. हिंगोली
शहरामध्ये महात्मा गांधी पुतळा परिसरात काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन
केलं. खासदार राजीव सातव यांनी या आंदोलनाचं नेतृत्त्व केलं. लातूर शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. धुळे, जळगाव,
बुलडाणा, नाशिक, मुंबई इथंही आंदोलन करण्यात आलं.
****
कोरोना
विषाणू संसर्गापुर्वी दरमहा सुमारे ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या राज्य परिवहन
महामंडळाला संसर्ग काळात दररोज सरासरी २२ कोटी रुपये याप्रमाणे सुमारे ३ हजार कोटी
रुपयांचा महसूल गमवावा लागल्याची माहिती परिवहन मंत्री आणि `एसटी` महामंडळाचे अध्यक्ष
अनिल परब यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली आहे. तोटा
भरून काढण्यासाठी भविष्यात सुमारे ३ हजार मालवाहू वाहने तयार करण्यासाठी प्रयत्न केले
जावेत. टायर पुन:स्थिरीकरण प्रकल्पाचा व्यवसायिक वापर करण्याच्या दृष्टीनं विस्तार
करण्यात यावा. इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्यातून, मार्च २०२१ पर्यंत किमान पाच
पेट्रोल/डिझेल पंप सर्व सामान्य जनतेच्या वापरासाठी राज्य परिवहन महामंडळानं प्रत्यक्ष
संचालित करावेत, अशा सूचना मंत्री परब यांनी यावेळी केल्या.
****
कोरोना
विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन वाशिमच्या
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक अतुल कानडे यांनी केलं आहे.
****
परभणी
शहरात आज सकाळी दहा पूर्णांक पाच दशांश सेल्सीअस तापमानाची नोंद झाली. गेल्या काही
दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात ढगांच्या गर्दीमुळे थंडी कमी झाली होती.
****
राज्यात
एकाच वेळी उच्च न्यायालय आणि त्यांची खंडपीठं, जिल्हा न्यायालयं, सर्व न्यायधीकरणं आणि तालुका न्यायालयांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोक
अदालतीचं येत्या बारा तारखेला आयोजन करण्यात येणार आहे. सर्व संबंधित पक्षकारांनी याचा
लाभ घ्यावा आणि राष्ट्रीय लोक अदालतीचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावं, असं
आवाहन करण्यात आलं आहे. लोक अदालत आयोजित करण्यामागचा उद्देश मोठ्या प्रमाणावर प्रलंबित
असलेली प्रकरणं, तसंच नवीन प्रकरणं किंवा महत्त्वाची प्रकरणं लोक न्यायालय सारख्या
यंत्रणेच्या माध्यमातून त्वरित निकाली काढून त्यांचे निवारण करणं हा आहे.
****
इतर
मागासवर्गीय आरक्षण वाचवण्यासाठी आज पुणे इथं ठिय्या आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय महात्मा
फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी यावेळी आंदोलकांच्या
मोर्चाला कोरोना विषाणू संसर्गामुळे परवानगी नाकारली होती. इतर समाजांना आरक्षण देताना
इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागल्यास त्याला विरोध केला जाईल, अशी माहिती
माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी दिली.
****
महाराष्ट्र
राज्य विशेष पोलीस महानिरीक्षक आणि महिला अत्याचार प्रतिबंधक विभागातर्फे राज्यात
`ऑपरेशन मुस्कान` राबवण्यात येणार आहे
****////****
No comments:
Post a Comment