आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ जानेवारी २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
७३ व्या प्रजासत्ताक
दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज संध्याकाळी देशातल्या नागरिकांना
उद्देशून भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींचं भाषण सर्व राष्ट्रीय वाहिन्या तसंच आकाशवाणीच्या
सर्व केंद्रांवरून संध्याकाळी सात वाजता प्रसारित होईल. त्याचबरोबर हे भाषण आकाशवाणीच्या
सगळ्या केंद्रांवरून रात्री साडे नऊ वाजता प्रादेशिक भाषांमधून देखील ऐकता येईल.
****
राष्ट्रीय मतदार
दिन आज साजरा होत आहे. यंदाच्या राष्ट्रीय मतदान दिनाचं घोषवाक्य, ‘सर्वसमावेशक, सुलभ
आणि सहभागपूर्वक मतदान प्रक्रिया’ असं आहे. राज्य शासनाचा मतदार दिनाचा
मुख्य कार्यक्रम आज औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात
होत आहे. या कार्यक्रमात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळाचं, तसंच टेलिग्राम
बॉटचं लोकार्पण होणार आहे.
****
राष्ट्रीय पर्यटन
दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त चित्रपट विभागानं एका खास ऑनलाईन चित्रपट महोत्सवाचं
आयोजन केलं आहे. या महोत्सवात चित्रपट विभागाच्या संकेतस्थळावरून आणि युट्युब चॅनेलवर
आज ११ चित्रपट दाखवले जाणार आहेत.
****
केंद्र सरकारी
कर्मचाऱ्यांसाठीची आरोग्य योजना नव्या स्वरुपात कालपासून सुरु झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री
मनसुख मांडवीय यांनी नवीन संकेतस्थळाचं आणि माय सी जी एच एस या अॅपचं उद्घाटन केलं.
या नवीन संकेतस्थळ आणि अॅप मुळे बहुभाषा पर्याय, दूरध्वनीवरुन सल्ला मसलतीची सोय, माहितीची
उपलब्धता, वैद्यकीय विमा, उपचार खर्च परतावा अशा अनेक सुविधा कर्मचाऱ्यांना मिळणार
आहेत.
****
वर्धा जिल्ह्यात
देवळी तालुक्यातल्या सेलसुरामध्ये चारचाकीचा भीषण अपघात होऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या
सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जवळपास ४०
फूट पुलावरून गाडी खाली नदीत कोसळून हा अपघात झाला. मृत सर्वजण सावंगी इथल्या दत्ता
मेघे वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी होते.
****
नांदेड - अमृतसर
सचखंड एक्सप्रेस आज तिच्या निर्धारित वेळेपेक्षा चार तास उशिरा दुपारी एक वाजून तीस
मिनिटांनी वाजता सुटणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
No comments:
Post a Comment