आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ मे २०२२ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या हस्ते आज पुण्यातल्या प्रसिद्ध लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर
रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रारंभ होत आहे. या कार्यक्रमात मंदिराच्या १२५ वर्षांच्या
कालावधीचा आढावा घेणाऱ्या, लक्ष्मीदत्त, या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या
हस्ते होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रपतींचं काल
संध्याकाळी पुण्यात आगमन झालं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विमानतळावर त्यांचं
स्वागत केलं.
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरु यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. काँग्रेस
अध्यक्ष सोनिया गांधी आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी दिल्ली इथं शांती वन या पंडित नेहरु
यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं.
****
नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर
आयोजित करण्यात आलेल्या भारत ड्रोन महोत्सव २०२२ चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांच्या हस्ते आज होणार आहे. यावेळी पंतप्रधान ड्रोन पायलट सोबत चर्चा करणार असून,
ड्रोन प्रदर्शन पाहणार आहेत. स्टार्ट अप शी संबंधित नागरीकांना ते संबोधित करणार आहेत.
****
भारतीय लेखिका गीतांजली श्री
यांच्या टाँम्ब ऑफ सँड या कादंबरीला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. हे पुस्तक
हिंदी भाषेत असून, डेझी रॉकवेल यांनी याचा इंग्रजी अनुवाद केला आहे. भारतीय भाषेतल्या
पुस्तकांना प्रथमच बुकर पुरस्कार मिळाला आहे.
****
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या
निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान, आणि प्रदेश सरचिटणीस
माजी आमदार विधिज्ञ विजय गव्हाणे, यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीनं काल परभणीत
निदर्शनं करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी
केली.
****
अहमदनगर इथं छत्रपती शिवराय
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेला काल प्रारंभ झाला. या स्पर्धेचं उद्घाटन सर्व धर्मीय
धर्मगुरुंच्या उपस्थितीत करण्यात आलं. या स्पर्धेत राज्यातल्या ८०० हुन अधिक पुरुष
आणि स्त्री पैलवानांनी सहभाग घेतला आहे.
****
No comments:
Post a Comment