Monday, 30 May 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.05.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३० मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून मुलांसाठी गेल्यावर्षी सुरू केलेल्या पी एम केअर्स योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साध आहेत. कोविड साथीच्या काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना या योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. याच कार्यक्रमात शाळेत जाण्याऱ्या मुलांना शिष्यवृत्ती रक्कम पंतप्रधान हस्तांतरीत करतील. या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान मदत निधीचे पासबुक आणि आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य कार्ड मुलांना वितरित केले जातील.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या काळांत प्रत्येक योजनेचा लाभ शंभर टक्के नागरिकांपर्यंत पोहोचावा हा राष्ट्राचा संकल्प आहे. गरिबांच्या कल्याणासाठी कोणत्याही योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहाता कामा नये असं उद्दिष्ट आहे. यानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४२ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहोळा आज प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानात झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी याप्रसंगी बोलताना, युद्धाचं स्वरुप बदलत आहे त्याला सामोरं जाण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करुन तयार राहणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी छात्र अभिमन्यू सिंग राठोड यांना सुवर्ण, अरविंद चौहान यांना रौप्य आणि नीतीन शर्मा यांना कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं.

****

भारत बांगलादेश दरम्यान सुरु करण्यात आलेली मैत्री एक्स्प्रेस ही प्रवासी रेल्वे सेवा दोन वर्षानंतर काल पुन्हा सुरु करण्यात आली. बांगलादेशच्या रेल्वे मुख्याधिकाऱ्यांनी ढाका इथून जवळपास १७० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या मैत्री एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

****

 

 

 

No comments: