आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२४ नोव्हेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
२०२३
हे ‘आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या निमित्ताने पुढील वर्षभर विविध कार्यक्रम
राबवण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून, आज नवी दिल्लीत,
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आणि कृषी मंत्री नरेंद्र
सिंग तोमर यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंतरराष्ट्रीय
स्तरावर तृणधान्यांबद्दल जागरूकता निर्माण करणं, आणि त्याच्या
वापरात अन्य राष्ट्रांना त्यात सामील करून घेणं, हा या कार्यक्रमाचा
मुख्य उद्देश आहे.
****
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायनं, भारतीय दूरसंचार सेवा कामगिरी अहवाल काल प्रसिद्ध केला. हा अहवाल, जून महिना अखेरपर्यंतच्या तीमाहीसाठीचा आहे. देशातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या
वाढली असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
****
अग्नी - 3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची
काल ओडिशातल्या ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून यशस्वी चाचणी करण्यात
आली. या चाचणी दरम्यान, सर्व प्रणालींची कार्यक्षमता तपासण्यात
आल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्यात लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये
काल उन्हाळी कांदा दरात घसरण झाली. त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देवळा इथं बाजार समितीत अर्धा तास लिलाव
बंद करून शासनाचा निषेध केला. यानंतर पाच कंदील इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.
****
औरंगाबाद इथं श्वानाच्या प्रजननासंदर्भात काम करणाऱ्या मरासिम
ग्रुप ऑफ केनल्सतर्फे काल पशुसेवा कृतज्ञता पुरस्काराचं
वितरण करण्यात आलं. यावेळी औरंगाबादमध्ये कार्यरत डॉ.अनिल भादेकर, मुकुंद जोशी, फारुख
शेख, जमीर पठाण यांना हा पुरस्कार सिल्क बाजारचे साबरे मिर्झा
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. औरंगाबाद केनल्स कल्ब आणि
श्वान प्रदर्शन जानेवारी महिन्यात घेण्यात येणार असल्याची घोषणा भादेकर यांनी यावेळी केली.
****
औरंगाबाद इथं नवीन विद्युत मीटरसाठी लाच घेणाऱ्या वीज वितरण कंपनीतल्या तंत्रज्ञाला
काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. साहेबराव घुगे
असं याचं नाव असून, त्याने पंचासमक्ष लाचेचे १६ हजार २०० रुपये
घेतल्यानं त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
//**********//
No comments:
Post a Comment